Monday, June 30, 2025

पुस्तक क्र . ११५ आदर्श शिक्षण


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११५

पुस्तकाचे नाव - आदर्श शिक्षण

लेखकाचे नाव - स्वामी विवेकानंद

प्रकाशन  व आवृत्ती-स्वामी ब्रम्हस्थानंद नागपूर

पृष्ठे संख्या–  १४५

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ 30

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११५||पुस्तक परिचय


आदर्श शिक्षण

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद हे भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान आणि जागतिक विचारसरणीचे द्रष्टे महामानव होते. त्यांच्या विचारांनी शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. "आदर्श शिक्षण" हे पुस्तक म्हणजे त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचे संकलन आहे. हे पुस्तक वाचकाला केवळ शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण इतक्यापुरते मर्यादित न ठेवता, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठीचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहायला शिकवते.

स्वामी विवेकानंद म्हणतात:


"शिक्षण म्हणजे मनुष्याच्या अंगभूत शक्तींचा पूर्ण विकास होय."


त्यांच्या मते, बाह्य ज्ञान भरवण्यापेक्षा अंतर्गत शक्ती जागृत करणे हेच खरे शिक्षण.


उदाहरण:

एका विद्यार्थ्याला जर आत्मविश्वास, निर्णयक्षमता, धैर्य आणि नैतिक मूल्ये शिकवली गेली, तर तो जीवनात अधिक सक्षमपणे यशस्वी होऊ शकतो, हे स्वामीजींनी वारंवार सांगितले आहे.

विवेकानंद यांना गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याकडून केवळ आध्यात्मिक नव्हे तर जीवनशैलीचे शिक्षण लाभले. ते म्हणतात,


"शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसून, आत्मा जागवणारा असावा."


उदाहरण:

स्वतः विवेकानंद हे गुरूच्या एका शब्दाने जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे उदाहरण आहेत.

शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल विकास हे खरे शिक्षण. ते म्हणतात,


"कमकुवतपणा हा पाप आहे."


उदाहरण:

ते विद्यार्थ्यांना व्यायाम, कुस्ती, खेळ यांचा आग्रह धरायचे, कारण शरीर मजबूत असेल तरच मनोबल वाढते.

ते म्हणतात की, शिक्षण आपल्या संस्कृतीशी जोडलेले असले पाहिजे. परकीय शिक्षणाची अंधानुकरण न करता भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण हेच उपयोगाचे आहे.


उदाहरण:

स्वामीजींनी वेद, उपनिषद, गीता, रामायण अशा ग्रंथांचा अभ्यास करून भारतीय विचारसरणीच्या आधारे शिक्षणदृष्टी मांडली.

स्वामी विवेकानंद म्हणतात:


"जर स्त्रीशक्तीला योग्य शिक्षण दिले, तर समाजाची प्रगती निश्चित आहे."


उदाहरण:

त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणसंस्था स्थापन कराव्यात, असा आग्रह रामकृष्ण मिशनकडून धरला.

आदर्श शिक्षण या पुस्तकामध्ये स्वामीजी आदर्श शिक्षण कसे असावे याची माहिती सांगतात. त्याबरोबरच शिक्षण प्राप्त करण्याची विविध उपाय शिक्षणाचा उद्देश नेमका कोणता आहे याचीही माहिती देतात. आजच्या शिक्षणातील दोष आणि त्या दोषांवर कोणती निवारण करायचे याचीही विस्तृत माहिती स्वामीजींनी या पुस्तकात अगदी सखोल दिली आहे .धार्मिक शिक्षणाची आवश्यकता आहे का याविषयी ते लिहितात .विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते कसे असावे विद्यार्थी कसे असावे शिक्षक कसे असावेत याची माहिती या प्रकरणातून त्यांनी छान दिली आहे .

स्त्री शिक्षण खरंच गरजेचे आहे का स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी आपले मोलाचे संदेश या पुस्तकात दिलेले आहेत खरोखरच स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे आणि हीच गरज त्यांनीही या पुस्तकातून मांडलेली आहे अमेरिकेतील स्त्रिया कशा आहेत याची माहिती दिलेली आहे वर्तमान आणि वैदिक काळात स्त्री-पुरुषात का भेद गेला हे त्यांनाही कळले नाही आदर्श सीतेचे चरित्र कसे आहे खरी शक्ती पूजा काय आहे याविषयी ती परखड माहिती देतात .या पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात सर्वसाधारण जनतेचे शिक्षण कसे होईल याविषयी ते लिहितात .

मातृभाषेतून शिक्षण हे त्यांनाही पटलेले आहे प्रचलित भाषेत शिक्षण द्या असे विचार ते मांडतात .

"आदर्श शिक्षण" हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर पालक, शिक्षक आणि शिक्षणधोरणकर्त्यांसाठी मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे. यातून व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीयता, नैतिकता आणि आध्यात्मिक उन्नती यांचे सुंदर चित्र उभे राहते.


अध्यापनापेक्षा आत्मोन्नतीचा मार्गच खरा शिक्षणाचा उद्देश आहे, असा संदेश हे पुस्तक देते.

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Sunday, June 29, 2025

पुस्तक क्रमांक 114 येते जगाया उभारी


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११४

पुस्तकाचे नाव - येते जगाया उभारी

लेखकाचे नाव - सचिन बेंडभर

प्रकाशन व आवृत्ती-यशोदीप पब्लिकेशन पुणे

पृष्ठे संख्या– १२०

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११४||पुस्तक परिचय


येते जगाया उभारी

सचिन बेंडभर

सचिन बेंडभर सरांनी लिहिलेला "येते जगाया उभारी" हा कविता संग्रह म्हणजे सामान्य जीवनातील असामान्य भावभावनांचा, संघर्षाचा, आणि आशेच्या उमेदीचा एक झरझर वाहणारा प्रपात आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिली जाणारी उभारीची साद आहे.

या संग्रहातील कविता आपल्याला खचलेल्या क्षणांत जगण्यासाठी प्रेरणा देतात, अंधारातही आशेचा उजेड दाखवतात. शिक्षक म्हणून सरांचा अनुभव, ग्रामीण जीवनातील संघर्ष, विद्यार्थी आणि समाजातील संवेदना यांचा संगम त्यांच्या प्रत्येक ओळींतून जाणवतो.

सरांनी वापरलेली भाषा ही सुलभ, सरळ पण प्रभावशाली आहे. त्या ओळी थेट हृदयात जाऊन बसतात. "येते जगाया उभारी" या शीर्षकातूनच त्यांच्या लेखणीचा आशावादी दृष्टिकोन जाणवतो.

"येते जगाया उभारी" म्हणजे जीवनाच्या प्रत्येक पडझडीला उत्तर देणारी, पुन्हा उभं राहण्याची हिंमत देणारी कवितांची शिदोरी आहे. सचिन बेंडभर सरांनी आपल्या प्रतिभेच्या ज्योतीने हा संग्रह उजळून टाकला आहे.


– हे पुस्तक म्हणजे शब्दांनी दिलेली उभारी आहे… जीवनाला भिडण्याची नवी तयारी आहे…


मातीशी नाळ जोडणारा हा कविता संग्रह आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच मातीत राबणाऱ्या हातांना समर्पित आहे. येते जगाया उभारी हा सचिन बेंडभर सरांचा तिसरा काव्यसंग्रह आहे . त्यांच्या लेखनात कायम सातत्य आहे .हे हे पुस्तक प्रकाशित झाले तोपर्यंत त्यांनी जवळपास 30 पुस्तकांच्या टप्पा पार केलेला होता.बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात कळो निसर्ग मानवा या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे .

आपल्या पहिल्याच कवितेत ते म्हणतात ,

शीळ वाजवितो वारा 

पक्षी कुजनाते करी 

अर्धपोटी कष्टातही 

येते जगाया उभारी ।।

या काव्यसंग्रहाचे शीर्षक येथे जागा उभारी का दिले असेल हे पंक्तीवरून सहज समजून येते .

सृष्टीची नवलाई या कवितेत बेंडभर सर सृष्टीतील अनोखे आणि नवख्या गोष्टींचे वर्णन करताना म्हणतात,

आता वाढेल रोपटे 

उद्या धरील पोटरा 

कणसावरी सोनसळी

 मग डोलेल फुलोरा ।।


अशी अद्भुत किमया

 कशी केली हो देवाने

 सोनियाच्या कोंदणात 

शुभ्र मोतीयाचे दाणे ।।

"सेवा धरतीची करू" या कवितेत ते म्हणतात,

आपण निसर्गाच्या ऋणात आहोत. ही धरती आपल्याला अन्न, पाणी, हवा, आश्रय अशा अनमोल गोष्टी निरंतर देत असते. तिचं संरक्षण, संवर्धन आणि सेवा करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे.

कवी या कवितेतून सांगतो की,

आपण धरतीच्या ऋणात आहोत, म्हणून आपलं जीवन तीची सेवा करण्यासाठी समर्पित असावं.

वृक्षारोपण, पाण्याची बचत, मातीचं संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक जीवनशैली हीच खरी सेवा आहे.

ही कविता केवळ एक सन्देश नव्हे, तर निसर्गाशी असलेलं आपलं नातं समजून घेण्याची आणि तिच्यासाठी काही करण्याची साद आहे.

शेवटी, धरतीचं रक्षण केल्यानेच मानवाचं रक्षण होतं — हाच या कवितेचा गाभा आहे.

बाप माझा शेतकरी या कवितेत सर आपल्या पित्याचे सुंदर वर्णन करतात .

बाप माझा वारकरी, त्याची शेतात पंढरी 

वारासुद्धा राही उभा, त्याची ऐकाया भल्लरी।।१।।


नसे अक्षरओळख, त्यासी शिकविले कोणी ?

 दिसभर आनंदाने, गातो मोटेवर गाणी।।२।।

येते जगाया उभारी" हा शेतीविषयक माहिती देणाऱ्या कवितांचा एक सुंदर संग्रह आहे. या संग्रहात आधुनिक शेती, शेतकऱ्यांचे जीवन, नैसर्गिक संकटे, कृषितंत्रज्ञान, बियाणं, खतं, शेतीतील नवे प्रयोग, शेतीप्रधान अर्थव्यवस्था यासारख्या विविध विषयांवर आधारित कवितांचा समावेश आहे.


या कवितांमधून शेतकऱ्यांची आशा, मेहनत, दु:खं, आणि नव्या युगातील बदलांची उभारी प्रकट होते.

"येते जगाया उभारी" या शीर्षकातच आशय दडलेला आहे – शेतकऱ्याच्या जगण्याला, शेतीच्या क्षेत्राला नव्याने उभारी देणारा हा काव्यसंग्रह आहे.

सर्वांनी संग्रही ठेवावा आणि वाचावा असा हा सुंदर काव्यसंग्रह .सचिन बेंडभर सरांचा लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा✒️💐🎊🎉

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्रमांक 113 निबंध तुमच्यासाठी


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११३

पुस्तकाचे नाव - निबंध तुमच्यासाठी

लेखकाचे नाव - डॉ. रश्मी घोलप

प्रकाशन व आवृत्ती-संवेदना प्रकाशन पुणे सहावीआवृत्ती

पृष्ठे संख्या– १८२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११३||पुस्तक परिचय


निबंध तुमच्यासाठी

डॉ. रश्मी घोलप यांचे “निबंध तुमच्यासाठी” हे २०१७ साली ‘संवेदना प्रकाशन’ यांनी प्रकाशित केलेले मराठी पुस्तक आहे. या पुस्तकात १८२ पानांवर लेखकाने विविध निबंधांच्या माध्यमातून वाचनांमध्ये रस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकातील प्रत्येक निबंध सोप्या, परंतु प्रभावी भाषेत मांडलेला आहे, ज्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरते.


विषयांच्या निवडीमध्ये समाज, संस्कृती, तसेच व्यक्तीमत्व विकास यांचा समावेश असेल, ज्यामुळे वाचक प्रत्येक निबंधातून काही तरी शिकतात 

हे पुस्तक मुख्यतः माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी लक्षात घेऊन लिहिलेले दिसते.


विद्यार्थांना परीक्षा लेखन, आत्मप्रस्तुती आणि विचार मांडताना येणाऱ्या अडचणींवर याचे निबंध उपयुक्त ठरतात.


शिवाय, सामान्य मराठी वाचन रस असलेल्या वाचकांसाठीही हे रुचकर आहे.विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमता वाढवण्यासाठी हे उदाहरणात्मक मॉडेल म्हणून उपयोगी आहे.

त्यातील निबंध कक्षा, अभ्यास, सर्जनशील विचार मांडण्यावर भर देतात.

शिक्षकांसाठी हे पुस्तक वर्गात चर्चा किंवा लेखन कार्यांमध्ये धोरणात्मक साहित्य म्हणून उपयुक्त आहे.

निबंध तुमच्यासाठी” हे मराठी शिक्षणात आणि व्यक्तिमत्व विकासात एक उपयुक्त संसाधन आहे. डॉ. घोलप यांनी सरळ, प्रभावी भाषेत समाज‑मानसशास्त्र, विकास, संस्कृती यांसारखे जटिल विषय विद्यार्थ्यांसाठी समोर आणले आहेत. त्यांच्या निबंधांमधून प्रेरणा, आत्मपरीक्षण आणि विचारांचा विकास होतो.

"निबंध तुमच्यासाठी" हे पुस्तक डॉ. रश्मी घोलप यांचे एक अभ्यासपूर्ण, भाषाशुद्ध आणि विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असे लेखन आहे. हे पुस्तक विविध शालेय, स्पर्धा परीक्षा आणि भाषिक उपक्रमासाठी उपयुक्त ठरते. खाली यातील काही निवडक निबंधांची संक्षिप्त माहिती दिली आहे:


१. माझी शाळा

मुख्य कल्पना: शाळेच्या आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन, सहाध्यायी मित्र, अभ्यासाचे वातावरण.


विशेषता: विद्यार्थी आपल्या शाळेप्रती असलेले प्रेम व्यक्त करतात. बालपणाची आठवण होईल असा हळवा निबंध.


२. स्वच्छ भारत अभियान

मुख्य कल्पना: स्वच्छतेचे महत्त्व, महात्मा गांधींचे विचार, स्वच्छ भारत मिशनची सुरुवात.


विशेषता: सामाजिक जाणीव निर्माण करणारा निबंध. कृतीशीलतेला प्रोत्साहन देणारी भाषा.


३. माझा आवडता सण – दिवाळी

मुख्य कल्पना: सणाचे सांस्कृतिक महत्त्व, फराळ, फटाके, दिवे, आकाशकंदील.


विशेषता: आनंदाचे आणि रंगांचे वर्णनात्मक चित्रण. सणामागील परंपरा आणि उत्साह दर्शवतो.


४. मी एक वृक्ष बोलतोय

मुख्य कल्पना: वृक्षाच्या भूमिकेतून पर्यावरणाचे महत्त्व सांगणे.


विशेषता: कल्पक मांडणी, संवादात्मक शैली, पर्यावरण विषयक जागृती.


५. पाण्याचे महत्व

मुख्य कल्पना: जलसंवर्धन, जलटंचाई, पाणी वाचवा हे संदेश.


विशेषता: सामाजिक आणि नैतिक मूल्य शिकवणारा, सजग नागरिक घडवणारा निबंध.

"निबंध तुमच्यासाठी" हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी व स्पर्धा परीक्षार्थींसाठी मार्गदर्शक ठरणारे लेखन आहे. यात विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय, नैतिक आणि सण-संस्कृतीशी संबंधित विषयांवर संपूर्ण, सुसंगत आणि समर्पक निबंध दिलेले आहेत.

"निबंध तुमच्यासाठी" हे केवळ एक पुस्तक नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक साहित्यिक आणि बौद्धिक दीपस्तंभ आहे.

हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची मशाल पेटवते, आणि मराठी भाषेतील निबंध लेखनाचे उत्कृष्ट दालन खुले करते. धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Wednesday, June 25, 2025

पुस्तक क्र . ११२ भारतीय नारी


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११२

पुस्तकाचे नाव - भारतीय नारी

लेखकाचे नाव - स्वामी विवेकानंद

प्रकाशन व आवृत्ती-स्वामी ब्रह्मस्थानंद नागपूर

पृष्ठे संख्या– ११७

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११२||पुस्तक परिचय

भारतीय नारी

स्वामी विवेकानंद

अनुवाद

कै .वि . शं . बेनोडेकर

स्वामी पितांबरानंद

प्रा.प्र .ग .सहस्त्रबुद्धे


स्वामी विवेकानंद हे केवळ संत नव्हते, तर एक तेजस्वी विचारवंत, युगपुरुष, आणि नवभारताच्या स्वप्नाचे शिल्पकार होते. त्यांच्या विचारधारेचा दीपस्तंभ आजही अनेकांच्या आयुष्याला दिशा दाखवतो. त्यांच्या "भारतीय नारी" या पुस्तकात त्यांनी स्त्रीशक्तीच्या दिव्य तेजाचा, तिच्या अध्यात्मिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक महत्त्वाचा भव्यतेने वेध घेतला आहे.

स्वामी विवेकानंद हे एक महाज्ञानी, तेजस्वी विचारवंत आणि आध्यात्मिक भारताचे जागतिक प्रतिनिधी होते. त्यांच्या विचारधारेत स्त्रीचं स्थान केवळ घराच्या चार भिंतींमध्ये मर्यादित नव्हतं, तर ती संस्कृतीची वाहक, शक्तीची मूर्ती आणि राष्ट्रनिर्मितीची खरी शिल्पकार मानली गेली आहे.


📖 "भारतीय नारी" या पुस्तकाविषयी:


हे पुस्तक म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या विविध भाषणांतील, पत्रांतील व लेखांतील स्त्रीविषयक विचारांचे संकलन आहे. यात भारतीय स्त्रीचे ऐतिहासिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व किती भव्य आहे, हे प्रभावीपणे व्यक्त केले आहे.


🌺 स्त्री ही शक्तीस्वरूपा:


स्वामी विवेकानंद म्हणतात,


"जिथे स्त्रियांचा सन्मान होतो, तिथे देवता नांदतात."

त्यांच्या मते स्त्री ही केवळ कोमलता नव्हे, तर असीम सामर्थ्याचं मूर्तस्वरूप आहे. ती दुर्गा आहे, सरस्वती आहे आणि लक्ष्मीही आहे.


🌼 भारतीय स्त्रीचा इतिहास – गौरवशाली परंपरा:

हिंदू स्त्रीचा आदर्श या आपल्या प्रकरणात स्वामी विवेकानंद खूप छान सुंदर विवेचन करतात ते म्हणतात, 

"हे भारता! विसरू नकोस की तुझ्या स्त्री-जीवनाचा आदर्श आहे सीता, सावित्री, दमयंती; विसरू नकोस की तुझा उपास्य देव आहे सर्वस्वत्यागी उमानाथ शंकर; विसरू नकोस की तुझा विवाह, तुझी धनदौलत, तुझे जीवन यांपैकी काहीही तुझ्या इंद्रियसुखासाठी नाही, वैयक्तिक सुखासाठी नाही; विसरू नकोस की जन्मापासूनच तुझ्या जीवनाचे जगदंबेच्या चरणी बलिदान झाले आहे. तुझा सारा समाज त्या विराट महामायेची केवळ छाया आहे याचा कधीही विसर पडू देऊ नकोस."


भारतीय स्त्रियांपुढे असणाऱ्या आदर्शात मातृत्वाचा आदर्शच सर्वश्रेष्ठ होय. पत्नीपदापेक्षाही मातृपदाचे श्रेष्ठत्वं आगळे आहे. पत्नी, पुत्र वेळच आली तर पुरुषाचा त्याग करू शकतील, पण मातेकडून मात्र पुत्राचा त्याग होणे केव्हाही शक्य नाही. सर्वांनी टाकून दिले तरी मातेचे प्रेम मात्र तशाही परिस्थितीत अंचल, अखंडच राहते; एवंढेच नव्हे तर अशा परिस्थितीतच अनेकदा मातृप्रेमाला उधाण येते. हास-वृद्धी मातृप्रेमाला माहीत नाही. खरेदी-विक्री, देवाण-घेवाण ही भाषा त्याला सहन होत नाही. जरा-मरण त्याला स्पर्श करू शकत नाहीत. फक्त मातृप्रेमच असे अढळ, अखंड व अचल राहू शकते. पुत्रकन्यादिकांचे व पत्नीचेही प्रेम या कसोटीला उतरणे शक्य नाही.

पुस्तकात प्राचीन भारतातील स्त्रियांच्या ज्ञान, शौर्य आणि समतेच्या कथा समाविष्ट आहेत – गार्गी, मैत्रेयी, अपाला यांसारख्या ऋषिकांपासून झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर यांच्यापर्यंत. या उदाहरणांनी विवेकानंद हे सिद्ध करतात की, स्त्री ही नेहमीच भारताच्या प्रगतीचा आत्मा राहिली आहे.


🌸 स्त्रियांच्या शिक्षणाविषयी आग्रह:


स्वामी विवेकानंदांनी स्त्रियांच्या शिक्षणास सर्वोच्च महत्त्व दिलं.


"देशाला सशक्त करायचं असेल तर पहिले स्त्रियांना शिक्षित करा."


त्यांच्या मते, शिक्षण हे स्त्रीच्या आत्मोन्नतीचं आणि स्वाभिमानाचं साधन आहे. शक्ती, आत्मविश्वास आणि विवेक हे स्त्रीच्या शिक्षणाचे तीन आधारस्तंभ त्यांनी मांडले.


🌷 नवभारताची नारी – विवेकानंदांची दृष्टी:


स्वामी विवेकानंद असेही म्हणतात की आधुनिक भारत घडवायचा असेल, तर त्या भारताच्या उभारणीत स्त्री-पुरुषांची समान भूमिका हवी. स्त्रियांना केवळ सहनशीलतेचं प्रतीक मानणं चुकीचं आहे; त्या निर्णयक्षम, कार्यक्षम आणि तेजस्विनी आहेत.


"भारतीय नारी" हे पुस्तक म्हणजे स्त्रीत्वाच्या तेजाची, करुणेची आणि शक्तीची गौरवगाथा आहे. स्वामी विवेकानंदांच्या लेखणीतून प्रकटलेली ही स्त्री एक जगदंबा आहे, राष्ट्रमाता आहे आणि संस्कृतीची वाहक आहे.


ही रचना केवळ वाचण्याची नाही, तर अनुभवण्याची, आत्मसात करण्याची आणि पुढील पिढीला सांगण्यासारखी आहे.

‘भारतीय नारी’ हे पुस्तक म्हणजे नुसतेच एक साहित्य नव्हे, तर ती एक ज्वालामुखी आहे — ज्यामधून विवेकानंदांच्या मनातील स्त्रीबद्दलचा आदर, प्रेम, आणि तिच्या उन्नतीसाठीचा जाज्वल्य आग्रह प्रकट होतो. हे विचार आजही तितकेच कालसुसंगत वाटतात.

या पुस्तकातून वाचकाला जाणवते की, भारतीय नारी ही केवळ सौंदर्याची नव्हे, तर तेजस्वी आत्म्याची मूर्ती आहे. तिच्या कर्तृत्वाला, त्यागाला, आणि सहनशक्तीला जो अभिवादन करतो, तोच खऱ्या अर्थाने भारतीय होतो.


"नारीचे गौरवगान म्हणजेच भारतमातेचे पूजन!"

— अशी अखेरची प्रेरक चितारवेल आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या विचारविश्वात अनुभवायला मिळते.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १११ यशाचा पासवर्ड


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १ १ १

पुस्तकाचे नाव - यशाचा पासवर्ड

लेखकाचे नाव - प्रा.नितीन बानुगडे पाटील

प्रकाशन व आवृत्ती-मुद्रा प्रकाशन रहिमतपूर सातारा

पृष्ठे संख्या– २२८

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१ ११||पुस्तक परिचय

यशाचा पासवर्ड

प्रा.नितीन बानुगडे पाटील



जगण्याचं गूढ उलगडणारे, आत्मविश्वासाचा दिवा मनात पेटवणारे आणि स्वप्नांची उंच भरारी घेणाऱ्यांसाठी दिशा दाखवणारे, असे हे अद्वितीय पुस्तक — "यशाचा पासवर्ड".


हे पुस्तक म्हणजे केवळ अक्षरांचे संकलन नव्हे, तर आयुष्याच्या अंधाऱ्या वळणांवर मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे. यशाच्या महासागराकडे नेणारी एक शिडी आहे, जिथे प्रत्येक पायरी अनुभवाने, चिकाटीने, स्वप्नांच्या ध्यासाने कोरलेली आहे.

यशाचा पासवर्ड हे पुस्तकं म्हणजे जणू आत्म्याच्या तळातून वाहणारा प्रेरणेचा झरा आहे. हताश झालेल्यांना नवी उमेद देणारा, आत्मविश्वास गमावलेल्यांना नवी उभारी देणारा, आणि खचलेल्या विचारांना नवा उभारी देणारा सच्चा सखा!

यशाचा पासवर्ड” हे पुस्तक प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे आत्मप्रेरक स्फूर्तीचे ग्रंथ आहे ज्यात ते यशाकडे जाऊन पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करतात.

“यशाचा पासवर्ड” म्हणजे आत्मविश्वासाचा चावी – साध्या, स्वाभाविक आणि स्वावलंबी विचारांनी भरलेलं पुस्तक, जे प्रत्येक वाचकाला स्वतःत बदल घडवून यशाच्या दालनात प्रवेश करण्याचा विश्वास देतं.

या पुस्तकातील महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे, 

यशासाठी योग्य मानसिकता –

पुस्तकात यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती यांचा कसा उपयोग करावा हे सुस्पष्ट केले आहे.


सोप्या व थेट भाषेतील लेखन –

लेखकाची शैली संवादात्मक आहे. उदाहरणांनी समृद्ध लेखन विद्यार्थ्यांच्या मनाशी सहज जुळते.


खास विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त –

अभ्यासाची तंत्रे, वेळेचे व्यवस्थापन, एकाग्रता टिकवण्यासाठी उपाय यांबाबत मार्गदर्शन देणारे हे पुस्तक स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः उपयुक्त ठरते.


यशस्वी लोकांच्या गोष्टींमधून प्रेरणा –

अनेक यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकथा आणि त्यातील शिकवण वाचकाला पुढे जाण्याची उमेद देतात.


यश म्हणजे केवळ पैशाचे नव्हे तर व्यक्तिमत्त्वाचे यश –

या पुस्तकात ‘यश’ या संकल्पनेचा समतोल अर्थ उलगडून दाखवण्यात आला आहे. आत्मविकास, मूल्ये, नैतिकता आणि संयम हेही यशाचे घटक आहेत, असे ठामपणे सांगितले जाते.

प्रत्येक वाचकाला स्वतःमध्ये यशाचे बीज शोधायला शिकवते.

हे केवळ वाचायचे पुस्तक नाही, जगायचे पुस्तक आहे.

निराशा, अपयश व गोंधळातून मार्ग काढून देणारा उजेडाचा किरण आहे.

"यशाचा पासवर्ड" हे पुस्तक म्हणजे यशाच्या दाराला उघडणारी गुरुकिल्लीच आहे. ते वाचताना वाचक आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायला प्रेरित होतो. या पुस्तकाचे प्रत्येक पान वाचकाला आत्मविश्वास, प्रेरणा व दिशा देणारे ठरते.


🔖 विद्यार्थ्यांपासून ते पालक, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांपर्यंत – साऱ्यांसाठीच हे पुस्तक जीवनदिशा देणारे आहे.या पुस्तकात एकूण 110 प्रसंग दिलेले आहेत . प्रत्येक प्रसंग हा नवी दिशा आणि नवीन ऊर्जा देणार आहे .

महाकवी कालिदास यांचे या पुस्तकातील कथा विशेष आवडणारी आहे .त्याचे शीर्षकही खूपच छान आहे . अढळ निश्चयच यशाच्या अढळ पदावर नेतो .ही संपूर्ण कथा वाचकांसाठी मी मुद्दाम देत आहे .

एक तरुण गुराखी रिकामपणाचा उद्योग म्हणून झाडाची फांदी तोडत होता. पण ज्या फांदीवर तो बसला होता तीच फांदी तोडण्यांचा त्याचा अजब उद्योग त्या राज्याच्या प्रधानाने बघितला. दिसायला देखणा असलेला पण बुध्दी अन् ज्ञानाचा लवलेश नसलेला हा गुराखी पाहून त्याच्या मनात एक कल्पना आली. त्या राज्याच्या राज्यकन्येने त्याचा अपमान केला होता. राज्यकन्या मोठी विद्वान आणि प्रकांड पंडीत होती. प्रधानाने या गुराख्याचं तिच्याशी लग्न लावून देऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याचे ठरवलं. मोठ्या हुशारीने त्याने गुराख्याला विद्वान पंडिताचे रुप दिलं. साऱ्यांना चतुराईने तयार करुन त्याचं राज्यकन्येशी लग्न लावलं व आपलं ईप्सित साध्य केलं.


मात्र या साऱ्याबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या राज्यकन्येने लग्न झाल्यावर एकांतात आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित् वाग्विशेषः ? म्हणजे वाड्:मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का..? अजिबातच न शिकलेल्या आणि कमी बुध्दी असलेल्या या गुराखी पतीला काहीच कळत नव्हतं. परिणामी, त्याचं बिंग फुटलं. त्याच्या या अडाणीपणाबद्दल त्याची पत्नी झालेली राजकन्या त्याला प्रचंड टाकून बोलू लागली, चेष्टा करु लागली... आपल्या पत्नीने केलेला हा अपमान त्याला सहन झाला नाही. त्याने तिथेच विद्वान नि प्रकांड पंडीत व्हायचा निश्चय केला आणि सरळ जंगलाची वाट धरली. कालिमातेच्या मंदिरात तो ज्ञानसाधना करु लागला. त्याने प्रयत्नपूर्वक आपला निश्चय तडीस नेला. अत्यंत विद्यासंपन्न होऊन तो परतला. आपल्या प्रतिभा गुणांवर तो संस्कृत भाषेतील कविकुलभूषण ठरला. कालीमातेच्या समोर ज्ञान संपादन केले म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य गुराखी आपल्या निश्चयाच्या जोरावर 'महाकवी कालिदास' म्हणून विश्वप्रसिध्द झाला.


तुम्ही कोण आहात याने काही फरक पडत नाही. तुमचा निश्चयच तुम्ही कोण होणार, हे ठरवत असतो. तुमच्यातील उणिवा तुमच्या अडचणी ठरतातच, पण त्याच अडचणीचं पंखात रुपांतर करुन यशाच्या आभाळात भरारी मारता येते. फक्त झेप घेण्यााचा ठाम निश्चय हवा. तुमच्यात गुण असोत वा नसोत तुम्ही सबल असो वा दर्बल. तुमच्याकडे फक्त दृढ निश्चय हवा. तोच तुम्हाला साऱ्या संकटातून यशाच्या सर्वोच्च स्थानी पोहचवत असतो. न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र प्रचंड अवघड जात होते. चार्ल्स डार्विनच्या उनाडपणमुळे त्याचे वडील वैतागले होते. जेम्स वॅटला त्याच्या शाळेने मुर्ख ठरवलं होतं. पण निव्वळ निश्चयाच्या बळावर या साऱ्यांनी स्वतः च्या दुर्बलता, अक्षमतांना गाडून त्यांच्या उरावर यशाचा ध्वज फडकावला. ते सांगतात, एकदा तुम्ही निश्चय केलात की, त्याच्या परिपूर्णतेसाठी तुमच्या साऱ्या शारिरीक, मानसिक शक्ति एकवटल्या जातात. त्या तुमच्या निश्चयाभोवती केंद्रिभूत होतात. निश्चयात अद्भुत शक्ति असते. ती पूर्ण दृढतेने आणि झोकून देऊन काम करायला भाग पाडते. तुमचा निश्चयच माघारी जाण्याचे सारे दोर कापून टाकतो. पुढे येणाऱ्या संकटांना उध्वस्त करण्यासाठी सामर्थ्यशील बनवतो. निश्चय मन, मेंदू, मस्तिष्क पूर्ण एकाग्र बनवतो. मनाची द्विधा अवस्था संपवतो.


नेपोलियन यशस्वी ठरायचा याचं कारण तो द्विधा अवस्थेत कधी अडकला नाही... तो लक्ष निश्चित करायचा अन् सरळ निशाण्यावर वार साधायचा !


परिस्थितीपेक्षा आपण प्रबळ बनणे, हाच परिस्थितीवर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग! ही प्रबळ बनण्याची शक्ति निश्चय बहाल करतो. जी संकटं तुमच्या शक्तीपुढे झुकत नाहीत, ती तुमच्या दृढनिश्चयापुढेच झुकत असतात. तुमचा निश्चयच तुम्हाला हरु देत नाही. अब्राहम लिंकनने स्वातंत्र संघर्षावेळी आपल्या डायरीत लिहिलं होतं, हे काम मी अवश्य पूर्ण करीन..! परिस्थिती भयानक होती पण त्यांच्या या निश्चयानेच त्यांना बळ दिलं अन् देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे आले. आपले ठरवलेले कार्य त्यांनी पूर्ण केले.


एखादी गोष्ट करायचीच हे ठरलं की मग तो निश्चय होतो. तो दृढनिश्चय झाला की मग झपाटलेपण येते. मग टीका, निंदा, अपयश काही येवो निश्चयी व्यक्ती ढळत नाही. अढळपद मिळवण्याचा निश्चय करणाऱ्या ध्रुवासारखाच तो अढळ असतो तोच निश्चय तुम्हाला यशाच्या अढळ उंचीवर नेतो..!

बघितली नाही छोटीशी गोष्ट किती सुंदर मनाला भावणारी आहे .नक्कीच हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यात नक्कीच बदल जाणवेल .प्रत्येकाने वाचावं आणि संग्रही ठेवावं .खूप सुंदर पुस्तक . धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Sunday, June 22, 2025

पुस्तक क्र ११० येते जगाया उभारी


 

पुस्तक क्र १०९ आनंदयात्री डॉ बाबा आमटे


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १०९

पुस्तकाचे नाव - आनंदयात्री डॉ. बाबा आमटे

लेखकाचे नाव - डॉ सोमनाथ शंकर रोडे

प्रकाशन व आवृत्ती-आदर्श विद्यार्थी प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या– १९२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१०९||पुस्तक परिचय

आनंदयात्री

डॉ. बाबा आमटे

डॉ. सोमनाथ रोडे


"आनंदयात्री डॉ.बाबा आमटे" हे केवळ एक व्यक्तिमत्त्वाचं वर्णन नाही, तर एक युगाचा मंत्र आहे. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी 'आनंदवन' उभारलं, ते केवळ उपचारकेंद्र नव्हतं, तर एका नवजीवनाचा झरा होता. त्यांच्या जीवनयात्रेचा प्रत्येक टप्पा हा संघर्षाचा, समर्पणाचा आणि मानवतेच्या सेवा-संकल्पाचा आहे.


त्यांचा आत्मा जिथे गेला, तिथे नवा प्रकाश फाकला, माणसातला 'माणूस' जागा झाला .त्यांचं जीवन म्हणजे सहृदयतेचा महायज्ञ.

आनंदयात्री : डॉ.बाबा आमटे" या शीर्षकात एक सर्जनशील, प्रेरणादायी आणि अलंकारिक भाव सामावलेला आहे.

डॉ.सोमनाथ शंकर रोडे यांना भावलेले हे व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्या शब्दात आनंदयात्रीच्या रूपात या पुस्तकातून रेखाटलं आहे .

जगात अनेक थोर व्यक्तिमत्त्वे झाली, ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले. पण काही माणसे अशी असतात, की त्यांच्या जीवनाचा प्रत्येक श्वास समाजासाठी वाहिलेला असतो. असेच एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबा आमटे. त्यांच्या जीवनयात्रेला 'आनंदयात्रा' असे म्हणणे अतिशय समर्पक ठरते, कारण त्यांनी आयुष्यभर दुःखदीन, वंचित, उपेक्षितांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.


बालपण व शिक्षण :

बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात, समृद्ध घरात झाला. मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते, त्यामुळे त्यांना लहानपणापासून सुखसोयी मिळाल्या. इंग्रजी शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात समाजसेवेची बीजं रोवली गेली. कायद्याची पदवी घेऊन त्यांनी काही काळ वकिली केली. पण अंतःकरणातील सामाजिक जाणीव त्यांना या मार्गाने पुढे जाऊ देईना.


कुष्ठरोग्यांसाठी लढा :

बाबा आमटे यांचे जीवन पालटणारी घटना म्हणजे कुष्ठरोग्यांशी झालेली त्यांची पहिली भेट. एक दिवस रस्त्यावर एका कुजलेल्या अवस्थेतील कुष्ठरोग्याला पाहून सर्वजण बाजूला झाले, पण बाबा मात्र थांबले. मनात भीती असतानाही त्यांनी त्या रुग्णाला उचलले, त्याची सेवा केली. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोगाच्या उपचारांची माहिती घेतली, स्वतःवर प्रयोग करून भीती दूर केली आणि पूर्णपणे कुष्ठरोग्यांच्या सेवेस वाहून घेतलं.


आनंदवनाची स्थापना :

१९४९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील हेमलकसा येथे त्यांनी 'आनंदवन' या संस्थेची स्थापना केली. हे फक्त एक उपचारकेंद्र नव्हते, तर एक नवे जीवन देणारे, स्वाभिमान जागवणारे संकल्पस्थान होते. येथे येणाऱ्या कुष्ठरोग्यांना केवळ औषध नव्हते, तर आत्मसन्मान, शिक्षण, रोजगार, आणि समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळाले. बाबा आमटे यांनी दाखवून दिले की, कुष्ठरोग्यांना फक्त सहानुभूती नको, तर संधी, आत्मनिर्भरता आणि माणूस म्हणून सन्मान मिळाला पाहिजे.

१९४९ साली बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक वेगळं जग निर्माण करण्याचा निर्णय घेतला. समाजाकडून दूर लोटलेल्या, अपमानित आणि उपेक्षित कुष्ठरुग्णांना एक सन्मानाचं जीवन मिळावं, यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलातल्या एका ओसाड जागेत 'आनंदवन' सुरू केलं.

“ज्यांच्या शरीराला जगाने नाकारलं, त्यांचं मन उभं राहिलं पाहिजे, म्हणून आनंदवन उभं राहिलं.”


“ही जमीन नाही तर एक स्वप्न फुलवणारी माती आहे.”


पर्यावरण आणि अन्य लढे :

बाबा आमटे यांचे कार्य केवळ कुष्ठरोग्यांपुरते मर्यादित नव्हते. नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण रक्षण, जंगलातील आदिवासींचे हक्क, जल-जमिनीच्या लढ्यातही त्यांनी सक्रिय भाग घेतला. "भारतमातेच्या भूमीचा बाजार होऊ देणार नाही" हा त्यांचा निर्धार होता.


पुरस्कार आणि सन्मान :

त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारसह अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला. त्यांना पद्मविभूषण, रामन मॅगसेसे पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.


बाबा आमटे म्हणजे केवळ एक नाव नाही, तर मानवतेचा आदर्श. त्यांनी आपले संपूर्ण जीवन उपेक्षितांच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. त्यांची आनंदयात्रा आजही अनेकांच्या आयुष्यात प्रेरणादायी प्रकाश झोत बनून मार्गदर्शन करत आहे.


"ज्यांच्या हृदयात माणुसकी असते,

त्यांच्या जीवनाची प्रत्येक पायरी ही 'आनंदयात्रा' ठरते!"


या पुस्तकात भारताचे महान समाजसुधारक, मानवतेचे खरे सेवक आणि कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात नवजीवन फुंकणारे बाबा आमटे यांच्या जीवनाची, कार्याची आणि तत्त्वज्ञानाची संपूर्ण झलक साकारली आहे.

डॉ. सोमनाथ रोडे यांची भाषा प्रभावी, ओघवती आणि सुबोध आहे. त्यांची लेखनशैली वाचकाच्या मनाला भिडणारी, भावनिक आणि प्रेरणादायी आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, समाजसेवकांसाठी, संशोधकांसाठी तसेच समाजकार्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आदर्श व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.

"डॉक्टर बाबा आमटे" हे केवळ चरित्र नसून भारतीय समाजसेवेच्या इतिहासात एक तेजस्वी अध्याय आहे. डॉ. सोमनाथ शंकर रोडे यांनी अतिशय समर्पणाने साकारलेलं हे पुस्तक वाचकाच्या मनात परिवर्तन घडवण्याची क्षमता ठेवतं. बाबा आमटे यांचे कार्य व विचार आजही ताजे वाटावेत, इतकी प्रभावी रचना लेखकाने केली आहे. नक्की वाचा हे पुस्तक . धन्यवाद


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १०८ योगप्रवेश


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १०८

पुस्तकाचे नाव - योगप्रवेश

लेखकाचे नाव - डॉ. विश्वास मंडलीक

प्रकाशन व आवृत्ती- योगचैतन्य प्रकाशन विभाग नाशिक

पृष्ठे संख्या– २२१

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१०८||पुस्तक परिचय


योग प्रवेश

डॉ. विश्वास मंडलिक

योग ही केवळ व्यायामपद्धती नव्हे, ती एक जीवनशैली आहे, अंतःकरणाच्या शुद्धीची वाटचाल आहे. या वाटचालीस प्रगल्भतेची दिशा देणारे, गूढतेच्या अंधारात ज्ञानाचा दिवा उजळणारे पुस्तक म्हणजेच "योग प्रवेश".


डॉ. विश्वास मंडलिक हे योगविज्ञानाच्या क्षेत्रातले ज्येष्ठ संशोधक, आचार्य आणि योगाचार्य. त्यांच्या अनुभवी लेखणीतून उतरलेलं हे पुस्तक म्हणजे योगसाधनेसाठी एक दीपस्तंभच. जणू ज्ञानगंगेचा अखंड झरा त्यांच्या लेखणीच्या प्रवाहातून वाचकांपर्यंत पोहोचतो.

अतिशय सुंदर असं लेखन या पुस्तकात मंडलिक सरांनी केलेला आहे. या पुस्तकाची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 

📖 पुस्तकाची वैशिष्ट्ये:


योगदर्शनाची उकल: पतंजलीच्या अष्टांगयोगाचे मूलभूत सूत्र, यम-नियमांपासून समाधीपर्यंतचा प्रवास त्यांनी अत्यंत सुगम, वैज्ञानिक आणि भावनिकतेने मांडला आहे.


तत्त्वज्ञानाची प्रगल्भता: योगाचे तात्त्विक व आध्यात्मिक आयाम त्यांनी इतक्या सहजतेने उलगडले आहेत की वाचक अज्ञाताच्या वाटेवरही निर्भयतेने पाऊल टाकतो.

एकूण 18 प्रकरणातून या पुस्तकात आपल्याला योग अभ्यासाची पूर्ण माहिती दिलेली आहे. योग विद्या धाम महाराष्ट्र या संस्थेचा परिचय पहिल्याच प्रकरणात देण्यात आलेला आहे. या संस्थेची स्थापना ही संस्था करत असलेले कार्य या संस्थेकडून घेण्यात येणारे विविध अभ्यासक्रम आणि कार्यक्रम यांची विविध माहिती पहिल्याच प्रकरणात आपल्याला दिलेली आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच या पुस्तकाविषयी करंबेळकर यांनी विस्तृत माहिती दिली आहे. 

ते आपल्या प्रस्तावनेत सांगताना म्हणतात,

योग विद्या धामच्या 'योग प्रवेश' या योगाभ्यासाकरिता प्रामुख्याने योगासनांची माहिती देणारे हे पुस्तक लिहिण्याचे एक प्रयोजन, योग विद्या धामच्या कार्यवाहांनी भूमिकेत पृ. १७/१८ वर सांगितले आहे. योगासनांवरील इतर पुस्तकात पुष्कळ योगासनांची माहिती देण्याच्या धोरणामुळे प्रत्यक्ष उपयुक्त माहिती त्रोटक दिली जाते, त्यामुळे आसनादि योगप्रक्रिया त्या पुस्तकांवरून शिकू इच्छिणाऱ्यांच्या पदरी निराशाच येते अथवा तो चूक व प्रसंगी हानीकारक पध्दतीने त्या प्रक्रिया करतो. या पुस्तकात हा दोष टाळला आहे. थोड्याच आसनांची माहिती पण पुरेशा विस्ताराने व एकाच आसनाच्या अनेक अवस्थांच्या विपुल आकृती दाखवून दिल्याने पुस्तकावरूनच ती आसने शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्यासही ती बिनचूक शिकता येतील असा त्यांचा मानस असावा, व तो उद्देश बराच सफल झाला आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अर्थात ही योगासने गुरूजवळच करावी हा नेहेमीचा नियम त्यांना डावलायचा नाही, उलट तो स्पष्टपणे त्यांनी मांडलाही आहे.

मंडलिक सर या पुस्तक निर्मितीमधील प्रेरणा घेताना सांगतात की हे पुस्तक विद्यार्थ्याला काय हवे आहे हे लक्षात घेऊनच या पुस्तकात तपशीलवार माहिती दिलेली आहे योगाच्या अभ्यास टप्प्याटप्प्याने शिकण्याचा आहे त्यामुळे योगप्रवेश योग्य परिचय योग प्रवीण असे तीन भागात योगाच्या अभ्यासक्रमावून प्रत्येक भागाकरिता त्यांनी स्वतंत्र पुस्तक लिहिले जावे असे ठरले .अशाप्रकारे या पुस्तकातून त्यांनी योगप्रवेशाला सुरुवात केली आहे .

योग प्रवेश अभ्यासक्रमात पुरखालचालीन सूर्यनमस्कार योगासने प्राणायामाची पूर्वतयारी उपासना आणि योगाचा तात्विक अभ्यास यांच्या विषयी माहिती दिली आहे .

आहार नियंत्रण कसे करावे याचीही माहिती शेवटच्या प्रकरणात पुस्तकात खूप छान रित्या दिली आहे .योगशिक्षकाच्या शिक्षण क्रम आणि स्वाध्याय काय याची माहिती सरांनी पुस्तकात दिलेली आहे .मंडलिक सर योग शिक्षकांचेही करताना दिसतात .


डॉ. मंडलिक यांची भाषा ही ज्ञानाची दीपमाळ आहे, जिच्या प्रत्येक शब्दात आध्यात्मिक गंध आहे. ही भाषा न केवळ बौद्धिक समाधान देते, तर वाचकाच्या मनात शांतीची पालवी फुलवते.

"योग प्रवेश" हे पुस्तक म्हणजे एका साधकासाठी आत्मशोधाचा नकाशा आहे. आत्मजागृतीची वाट दाखवणारी, विवेक आणि वैराग्याच्या द्वारातून मोक्षाकडे नेणारी ही ग्रंथसंपदा आहे.


हे केवळ पुस्तक नाही – ही एक अंतर्मनातली यात्रा आहे, जिथे प्रत्येक पानावर ध्यान आहे, प्रत्येक ओळीत श्वास आहे आणि प्रत्येक संकल्पनेत आत्मबोधाचा झराच आहे.

या पुस्तकाच्या मलपृष्ठावर मंडलिक सरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा दिलेला आहे . श्री. विश्वास मंडलीक हे एक यशस्वी योग प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. योग विषयक अनेक पुस्तकांचे लिखाण आणि प्रकाशन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातच नव्हे, भारताबाहेर परदेशातही योग विद्या धामची स्थापना व त्यांचे संचालने, वाढत्या योग कार्याची धुरा वाहण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची निर्मिती, नवनवीन कार्यकर्त्यांची भर टाकण्याची व्यवस्था, योग प्रचार आणि प्रसार यातील उद्बोधन आणि संकल्प अशा अनेक गोष्टी एकाच वेळी कुशलतेने हाताळणे हे त्यांचे वैशिष्टय आहे.


त्यांच्या आत्मविश्वास दुर्दम्य आहे. अल्प काळातच एका योग वर्गापासून ते योग विद्यापीठ स्थापनेपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. योग कार्यातील त्यांची ही घोडदौड अव्याहतपणे चालू रहाणार आहे. योगा बरोबर निसर्गजीवन आणि निर्गोपचार यांची सांगड घालून नाशिक परिसरात आदर्श असे योग व निसर्गोपचार रुग्णालय सुरू केले आहे. बिहार स्कुल ऑफ योगाचे परमाचार्य परमहंस स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी श्री. विश्वास मंडलीक यांना ऋषि परंपरेची दीक्षा देऊन "ऋषि धर्मज्योती" असे नुतन नाव प्रदान केले.


मार्च २०१४ मध्ये वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी 'डॉक्टरेट' (विद्या वाचस्पती) पदवी मिळवून योग प्रचार कार्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्थेचा योग प्रवेश अभ्यासक्रम दूरशिक्षण तंत्रातून शिकविण्याच्या विषयावरच त्यांनी मोठे काम करून ही पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे सर्व योग शिक्षकांना योग प्रचाराचा वेगळा मार्ग दाखवून योग प्रचार कार्यात व्यस्त राहण्याची दिशा दाखविली आहे.


डॉक्टर मंडलीकांच्या या संशोधनामुळे योगप्रचार कार्याची गति वाढविली गेली आहे. एका महिन्यात एक योगप्रवेश वर्ग घेऊ शकणारा योग शिक्षक आता एका महिन्यात सात योग प्रवेश वर्ग घेऊ शकेल एवढी त्याची क्षमता या संशोधनामुळे वाढविली गेली आहे.


योग प्रवेशच्या वर्गाबरोबरच, योग प्रवीण व निसर्गोपचार प्रवेश हे दोन्ही अभ्यासक्रमही दूरशिक्षण तंत्रातून चालविले जात आहेत.


योग शाखाच्या प्रचार कार्याकरिता डॉ. मंडलीकांना २०१८ सालचा पंतप्रधान पुरस्कार प्राप्त झालेला आहे .

एवढ्या महान व्यक्तिमत्त्वाचे हे पुस्तक जागतिक योग दिनानिमित्त माझ्या हाती लागले आणि त्यांच्या कार्याचा या पुस्तकाचा मला परीचय झाला .

प्रत्येक योगाभ्यासकाने हे पुस्तक आपल्या संग्रहित ठेवावे . धन्यवाद .

ॐ असतो मा सद्गमय ।। तमसो मा ज्योतिर्गमय ।।

मृत्योर्मा अमृतम् गमय ।

सर्वेषाम् स्वस्ति र्भवतु । सर्वेषाम् शांति र्भवतु । सर्वेषाम् पूर्णम् भवतु । सर्वेषाम् मंगलम् भवतु । लोका समस्ता सुखिनो भवन्तु । नाहं कर्ता, हरिः कर्ता । हरिः कर्ता हि केवलम् ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः।


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Friday, June 20, 2025

पुस्तक क्र . १०७ मी एक स्वप्न पाहिलं


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १० ७

पुस्तकाचे नाव - मी एक स्वप्न पाहिलं

लेखकाचे नाव - डॉ.राजेंद्र भारूड  

प्रकाशन व आवृत्ती-दीपस्तंभ प्रकाशन जळगाव

पृष्ठे संख्या– १६२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १३०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१०७||पुस्तक परिचय

मी एक स्वप्न पाहिलं

डॉ.राजेंद्र भारूड IAS


"मी एक स्वप्न पाहिलं - डॉ. राजेंद्र भारूड" या पुस्तकात आदिवासी पाड्यावर जन्मलेला एक मुलगा, आपल्या जिद्दीने डॉक्टर होतो, आयएएस होतो आणि समाजासाठी दिवसरात्र कार्य करतो, ही प्रेरणादायी कहाणी मांडलेली आहे. 

डॉ. राजेंद्र यांचा जन्म साक्री तालुक्यातील एका छोट्याशा आदिवासी पाड्यावर. झोपडी, चुलीवरचा भात, डोक्यावर कर्ज, आणि घरात शिक्षणाचं नावही नाही.

परंतु त्यांचं भाग्य बदललं, कारण त्यांच्या आईने ठरवलं – "माझा मुलगा शिकणार!"


विजेचं दिवा नव्हता, पण डोळ्यात आशेचा उजेड होता.

पायात चप्पल नव्हती, पण पावलात स्वप्नांची दिशा होती.

म्हणूनच तो मुलगा झाला – डॉक्टर आणि आयएएस अधिकारी!

या प्रेरणादायी पुस्तकातील मुख्य विषय पुढीलप्रमाणे 

गरीबी, संघर्ष आणि जिद्द:

आदिवासी पाड्यावर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेला राजेंद्र भारूड यांचा प्रवास – विना वीज, विना पंखा, विना शाळेच्या सोयी – यामधून पुढे जाण्याची जिद्द दाखवते.


आईचा प्रभाव:

त्यांच्या आईचा त्यांच्यावर असलेला प्रचंड प्रभाव, तिने केलेला संघर्ष आणि शिकवण हे पुस्तकाचे भावनिक केंद्रबिंदू आहे.


शिक्षणाची ताकद:

त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर पदवी मिळवली आणि नंतर आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला, हे दाखवते की शिक्षण कशाप्रकारे जीवन बदलू शकते.


समाजसेवा आणि नेतृत्व:

आयएएस अधिकारी झाल्यावर त्यांनी आदिवासी भागात केलेली कामं – मद्यबंदी, शिक्षणवाढ, आरोग्य चळवळी – या सर्व गोष्टी लोकनेते म्हणून त्यांची ओळख निर्माण करतात.


प्रेरणा:

हे पुस्तक वाचणाऱ्याला स्वप्न पाहण्याची आणि ती सत्यात आणण्याची प्रेरणा देते.


या पुस्तका खूप प्रसंग लढण्याची प्रेरणा देणारे आहेत. 

राजेंद्र लहानपणी शाळेच्या पहिल्याच दिवशी जातो. त्याच्याजवळ वह्या-पुस्तकं नाहीत. शर्टला बटन नाहीत, पायात चपला नाहीत, पण डोळ्यात मोठं स्वप्न आहे.

आई त्याला डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते:

"तू शिकला तर आपलं आयुष्य बदलेल. शिक्षण हाच आपला देव आहे!"

आईच्या विश्वासाने राजेंद्रच्या मनात शिक्षणाची ज्योत तेव्हाच पेटते.

एमबीबीएस झाल्यावर ते UPSC ची तयारी करत होते. वीज नसल्याने दिवा लावून, कधी उंदीर फिरणाऱ्या खोलीत, कधी भिंतीवर लिहित लिहित त्यांनी अभ्यास केला.

"परिस्थिती नाही, तर माझी चिकाटी माझी ताकद होती."

साधनांची कमी असूनही संधी मिळवायची जिद्द असेल तर यश शक्य आहे.

एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी शहरात जाऊन कमावण्यापेक्षा आदिवासी भागातच रुग्णसेवा केली. चिखलात चालत, रात्रभर वाट धरत ते आजारी माणसांकडे पोहोचत.

"मी त्यांच्या जगण्यातूनच मोठा झालो. आता त्यांच्यासाठीच जगायचं ठरवलंय."

सेवा हेच खरं जीवन आहे.

"मी एक स्वप्न पाहिलं" हे केवळ आत्मचरित्र नाही, तर "मुलगा कोणताही असो, स्वप्न मोठं असेल तर आकाशही जवळ आहे" हे सांगणारं आयुष्याचं सजीव उदाहरण आहे.

डॉ. भारूड यांनी डॉक्टर झाल्यानंतर शहरी सुख सोडून आदिवासी रुग्णांसाठी रात्र रात्र चालत सेवा केली.

UPSC पास करून अधिकारी झाल्यानंतर त्यांनी दारूबंदी, शिक्षण, आरोग्य चळवळी उभ्या केल्या.

ते म्हणतात:


"मी गरिबीत जन्मलो, पण माझा विचार श्रीमंत होता."


या पुस्तकातील शब्द म्हणजे केवळ अक्षर नव्हे,

तर अश्रूंनी पुसलेलं भूतकाळाचं आरसपानी चित्र!


दारिद्र्याच्या अंधारात दिवा झाला तो शिक्षणाचा.


अडथळ्यांच्या वावटळीतही सरळ उभा राहिला तो निर्धाराचा.


पायात चप्पल नव्हती, पण विचारात उंच शिखर होतं!

हे पुस्तक म्हणजे…

जाणिवेचं जागरण आहे – समाज झोपलेला असताना एक तरुण जागा होता.


स्वप्नांची मशाल आहे – जी अंधाराच्या छातीत पेटलेली आहे.


तरुणांसाठी मंत्र आहे – "जिंकायचं असेल तर, आधी स्वतःवर विश्वास ठेवा!"

"जिथे वीज नव्हती, तिथे बुद्धी उजळली...

जिथे शाळा नव्हती, तिथे ज्ञानाची गंगा वाहू लागली...

चिखलाच्या पायवाटेवर चालणारा एक मुलगा, एक दिवस IAS च्या सिंहासनावर बसला!"


हे केवळ यशाचं पुस्तक नाही, तर स्वप्नांच्या उडणाऱ्या पंखांची गोष्ट आहे –

"मी एक स्वप्न पाहिलं" हे पुस्तक म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्तीची, आईच्या त्यागाची, आणि समाजासाठी प्राणपणाने झगडणाऱ्या पुत्राची प्रेरणादायी गाथा आहे.

हे पुस्तक त्यांनी का लिहलं हे त्यांच्या मनोगतामध्ये सांगताना म्हणतात ,

वादळ वाऱ्यांनी घोंघावणाऱ्या माझ्या जीवनात एखाद्या पुस्तकाची निर्मिती होईल, असे मला स्वप्नातही वाटत नव्हते. २०११-१२ साली जेव्हा यु.पी.एस.सी.च्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो, त्यावेळी दीपस्तंभचे कार्यकारी संस्थापक व माझे जवळचे मित्र श्री. यजुर्वेद्र महाजन सर यांनी मला माझे आत्मचरित्र लिहिण्यास सूचविले. पण मी त्यांना सांगितले की, आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा माणूस नाही. माझ्या जीवनात आत्मचरित्र लिहिण्यासाठी असे काही महान कार्यही मी केले नाही. पण सरांनी म्हटले की, तुझा जीवनप्रवास ग्रामीण व आदिवासी भागातील तरूणांना प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे आपण स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यांसाठी लिहू.

दुसऱ्यांना प्रेरणादायी ठरेल असे हे लिखाण .

मनाला भावलेलं अतिशय सुंदर असे हे पुस्तक. प्रत्येक माणसाने वाचलंच पाहिजे. आपल्याला वाटते आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे पण इतरांच्या आयुष्यातील दुःखही आपल्यापेक्षा खूप मोठ असते. या साऱ्याची प्रचिती या पुस्तक वाचनातून आपल्याला येते. पुस्तके हेच खरे आपले मित्र असतात हे यावरून जाणवते. 

राजेंद्र सरांची माय आणि मोठ माय या दोघींमुळे हे उत्तुंग व्यक्तिमत्व घडले. त्यांच्या आयुष्यात आलेले सर्व शिक्षक त्यांना योग्य मार्गदर्शन करून गेले यामुळे शिक्षकांचा ते आवर्जुन उल्लेख करतात.याचा विशेष अभिमान वाटतो .प्रत्येकाने वाचावं आणि आपल्या संग्रही काळीज कुपीत ठेवावं असं हे पुस्तक .

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾        

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र . १०६ माझ्या स्वप्नातील भारत


 


वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १०६

पुस्तकाचे नाव - माझ्या स्वप्नातील भारत

लेखकाचे नाव - डॉक्टर ए .पी .जे अब्दुल कलाम ए शिवाथानु पिल्ले

अनुवाद चंद्रशेखर मुरगुडकर

प्रकाशन व आवृत्ती-चिनार पब्लिशर्स पुणे चौथी आवृत्ती

पृष्ठे संख्या– २५१

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१०६||पुस्तक परिचय

माझ्या स्वप्नातील भारत

डॉक्टर ए .पी .जे अब्दुल कलाम ए शिवाथानु पिल्ले

अनुवाद चंद्रशेखर मुरगुडकर


माझ्या स्वप्नातील भारत" (My Vision for India) हे पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि ए. शिवाथानु पिल्लै यांनी लिहिले असून अनुवाद चंद्रशेखर मुरगुडकर यांनी मराठीत केला आहे. हे पुस्तक भारताच्या भविष्याबाबतची एक प्रेरणादायी आणि दूरदृष्टीपूर्ण मांडणी आहे.

हे पुस्तक भारत एक महासत्ता कसा बनू शकतो? यावर लक्ष केंद्रित करतं. डॉ. कलाम यांनी आपली दूरदृष्टी आणि विज्ञानाचा वापर करून भारताचं भविष्य कसं उज्ज्वल होऊ शकतं, हे अतिशय प्रेरणादायी शैलीत मांडलं आहे.

या पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे 

भारताच्या समृद्धीचे स्वप्न:


डॉ. कलाम भारताला 2020 पर्यंत विकसित देश बनवण्याचं स्वप्न पाहतात.


ते विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आणि नैतिक मूल्यांच्या आधारे विकासाचा मार्ग दाखवतात.


सामर्थ्यशाली तरुण वर्ग:


भारताच्या तरुण पिढीकडे प्रचंड क्षमता आहे, ती योग्य दिशेने वापरल्यास देशाचा कायापालट होऊ शकतो.

तंत्रज्ञानाचा वापर:


ग्रामीण भारतात तंत्रज्ञान पोहोचवण्याचा आग्रह.


माहिती तंत्रज्ञान, अंतराळविज्ञान, संरक्षण संशोधन यांचा विकास.


राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यभावना:


केवळ हक्क नव्हे तर प्रत्येक नागरिकाने कर्तव्य निभावणं गरजेचं आहे.


शिक्षण आणि आत्मशक्तीकरणावर भर.

महान भारताची संकल्पना:


आत्मनिर्भर, सुरक्षित, समृद्ध, आणि नैतिक मूल्यांनी परिपूर्ण भारत.

हे पुस्तक वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेले असून सर्वसामान्य नागरिकालाही ते समजेल अशा सोप्या भाषेत आहे.


वाचकांमध्ये देशाभिमान आणि कर्तृत्वाची प्रेरणा जागवते.


विद्यार्थ्यांना आणि युवकांना दिशा देणारे हे एक दिशादर्शक पुस्तक आहे.


या पुस्तकातून ते आपल्या मनोगत म्हणतात, 

मोहीम' या संकल्पनेत बसणारे अनेक यशस्वी कार्यक्रम राबवण्याचा सिद्ध अनुभव भारताकडे आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व आपण पुरेपूर जाणले आहे. शिवाय, 'मोहीम' कार्यक्रम राबवताना, आवश्यक असणारी धोरणं तयार करताना तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची देखील कल्पना आपल्याला आहे. कालमानाला आवश्यक अशी सोयीची परिस्थिती निर्माण करणे, भारताला ज्ञानाधिष्ठित समाज या नात्याने पुढे आणणे, ही आजच्या काळाची खरी गरज आहे. तरुणांमधली आणि साधनसंपत्तीच्या उपलब्ध स्त्रोतांमधली अंतर्गत शक्ती सुयोग्य तन्हेने वापरात आणणे, यासाठी कल्पक नेतृत्त्व महत्त्वाचे ठरते. विचारांचे जाळे व्यवस्थितपणे विणून, भारताला विकसित देशात रूपांतरित करण्यासाठी एक अब्ज नागरिकांची ताकद पणाला लावणे ही आजची अत्यंत तातडीची गरज आहे.

अतिशय मोलाचे आणि मार्मिक विचार या पुस्तकात मांडलेले आहेत .

या पुस्तकाचे अनुवाद करणारे मुरुगुडकर आपल्या मनोगत म्हणतात,

विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठीची त्यांच्या मनातली आंतरिक तळमळ


सतत आणि स्पष्टपणे जाणवत राहिली. त्या कळकळीमागचं केवळ राष्ट्रकल्याणाच्या विचारांनी भारलेलं डॉ. कलाम यांचं स्वच्छ व पारदर्शक मन वाचकाला जाणवेल यात शंकाच नाही. त्याचा मान आपण ठेवला पाहिजे. डॉ. कलाम यांच्यासारखा माणूस ज्या दिवशी या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला त्या दिवशी या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या समृद्धीची बीजे रोवली गेली, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. अनुवाद करताना माझं स्वतःचं मन प्रज्वलित झालं आहे. सर्व वाचकांचेही होवो आणि डॉ. कलामांच्या मनातलं विकसित भारताचं स्वप्न साकार होवो हीच मनोमन इच्छा !

खरोखर सर्व जनतेचे हेच म्हणणं आहे की डॉक्टरांच्या मनातील विकसित भारत लवकरात लवकर साक्षात येऊन आणि आपले भारत मातेचा असाच उत्तरोत्तर विकास होत राहो .

डॉक्टर कलाम या पुस्तकातून खूप छान संदेश सर्वांना देतात.

"स्वप्न तेच खरी, जी तुम्हाला झोपू देत नाहीत."

➡️ डॉ. कलाम म्हणतात की फक्त डोळे उघडे ठेवून पाहिलेली स्वप्नं नाहीत तर जी तुम्हाला काम करण्यासाठी प्रेरित करतात, तीच खरी स्वप्नं असतात.


"देश बदलायचा असेल, तर आपण स्वतः बदलायला हवे."

➡️ प्रत्येक नागरिकाने देशासाठी काहीतरी योगदान देणे हेच राष्ट्रसेवा आहे.

जर आपण आज वाचलो, शिकलो आणि विचार केला, तर उद्याचं भारत घडवू शकतो."


"भारताचं भविष्य हे त्याच्या गावांमध्ये लपलेलं आहे."

एवढे सुंदर संदेश डॉक्टर कलाम आपल्या सर्वांना देतात. त्यांची सर्वच पुस्तके हे प्रेरणादायी आणि आनंद देणारी आहेत .

“स्वप्न तेच खरी, जी तुम्हाला झोपू देत नाहीत.”

ही प्रेरणादायी ओळ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारसंपदेचं सार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे डॉ. कलाम हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर एक स्वप्नवत राष्ट्राचा विचार करणारे दूरदृष्टी असलेले देशभक्त होते. त्यांनी "माझ्या स्वप्नातील भारत" या पुस्तकात २१व्या शतकातील सक्षम, सुरक्षित आणि विकसित भारताची रूपरेषा मांडली आहे.

या पुस्तकात डॉ. कलाम आणि डॉ. ए. शिवाथानु पिल्लै यांनी विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, संरक्षण, नैतिकता आणि तरुणांची ऊर्जा यांच्या आधारे भारत कसा महासत्ता होऊ शकतो, हे स्पष्ट केले आहे. हे पुस्तक केवळ विचार नाही, तर कृतीची दिशा दर्शवते.

या पुस्तकातील प्रत्येक पानावरून डॉ. कलाम यांची भारतासाठीची तळमळ स्पष्ट होते. त्यांनी लिहिलं आहे, “जर प्रत्येक भारतीय आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल, तर भारत महासत्ता होणारच!”

या विचारांमधून प्रत्येकाला एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळते.

"माझ्या स्वप्नातील भारत" हे केवळ एक पुस्तक नाही, तर भारतीय जनतेला उद्देशून दिलेले आवाहन आहे. हे पुस्तक वाचताना प्रत्येक वाचकाला वाटते की “मीही या राष्ट्रनिर्माणात हातभार लावला पाहिजे.”

डॉ. कलाम यांचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार केल्यास, तो दिवस दूर नाही, की आपला भारत खरोखरच एक महान, विकसित आणि आदर्श राष्ट्र म्हणून ओळखला जाईल.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾         

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Tuesday, June 17, 2025

पुस्तक क्र १०५ राष्ट्रमाता अहिल्या


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १०५

पुस्तकाचे नाव - राष्ट्रमाता अहिल्या

लेखकाचे नाव - मा. राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर

प्रकाशन व आवृत्ती- काव्यमित्र प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या– ४१

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१०५||पुस्तक परिचय

राष्ट्रमाता अहिल्या

मा.राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर 


राष्ट्रमाता अहिल्या" हे पुस्तक अहिल्याबाई होळकर यांच्या महान कार्याचा आणि तेजस्वी जीवनप्रवासाचा विस्तृत आलेख मांडणारे एक प्रेरणादायी साहित्य आहे. लेखक राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर यांनी हे पुस्तक खूप छानरीत्या मांडलेले आहे.हे पुस्तक महाराष्ट्रात विशेषतः इतिहास, संस्कृती आणि नारीशक्ती याबद्दल रुची असलेल्या वाचकांसाठी महत्त्वाचे मानले जाते.

अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास:

जन्म: 31 मे 1725, चौंडी (जि. अहमदनगर)


वडील: माणकोजी शिंदे (एक साधा शेतकरी)


लग्न: मल्हारराव होळकर यांच्या पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी


पती व पुत्राच्या निधनानंतर: अहिल्याबाईंनी स्वतः कारभार हाती घेतला आणि एक न्यायप्रिय, जनकल्याणकारी, भक्तिपरायण आणि कुशल प्रशासिका म्हणून लौकिक मिळवला.

या पुस्तकात पुढील माहिती दिलेली आहे .

बालपण व संस्कार: ग्रामीण वातावरण, शिक्षण, धार्मिकता


कठीण प्रसंगांतील धैर्य: पती, सासरे आणि पुत्र गमावल्यावरही त्यांनी पत्थराचे मन न बनवता प्रजेसाठी मातेचे हृदय दाखवले.


राजकारण आणि न्याय: त्यांनी मुलकी कारभार योग्य रीतीने चालवला, शिस्तबद्ध प्रशासन दिले.


धार्मिक व सामाजिक कार्य: काशी, गंगा घाट, रामेश्वर, सोमनाथ, जगन्नाथ यांसारख्या अनेक धार्मिक स्थळांचे जीर्णोद्धार, धर्मशाळा, विहिरी, घाट, मंदिरांची उभारणी.


स्त्रीशक्तीचा आदर्श: त्यांची कार्यशैली, सहनशीलता, धैर्य हे स्त्रियांना आदर्श ठरतात.

खंडेराव आणि पुढे मल्हारराव यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई अत्यंत दुःखात होत्या. त्यांनी राज्यसत्ता स्वीकारण्यास सुरुवातीला नकार दिला. पण प्रजेच्या आग्रहावर, आणि सल्लागारांच्या विनंतीवर त्यांनी राज्यकारभार स्वीकारला.

प्रेरणा: दुःख कितीही मोठं असलं, तरी जबाबदारीपासून पळ काढायचा नसतो. संकटे आली की आपली भूमिका अधिक सशक्त बनवावी लागते.

एकदा त्यांच्या राज्यातल्या एका सरदाराचा मुलगा गुन्हेगारी कृत्यात दोषी आढळला. कोणीही त्याला शिक्षा होऊ नये म्हणून हस्तक्षेप केला नाही. अहिल्याबाईंनी स्पष्ट सांगितले की – "न्याय सर्वांसाठी सारखाच असतो, मग तो राजा असो की प्रजाजन."


प्रेरणा: न्याय देताना भेदभाव नको, सर्वांना समान वागणूक द्यावी.


एकदा त्यांच्या राज्यातल्या एका सरदाराचा मुलगा गुन्हेगारी कृत्यात दोषी आढळला. कोणीही त्याला शिक्षा होऊ नये म्हणून हस्तक्षेप केला नाही. अहिल्याबाईंनी स्पष्ट सांगितले की – "न्याय सर्वांसाठी सारखाच असतो, मग तो राजा असो की प्रजाजन."


प्रेरणा: न्याय देताना भेदभाव नको, सर्वांना समान वागणूक द्यावी.

अहिल्याबाईंनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र बाजार उभारले, जे त्याकाळात खूपच पुढारलेलं पाऊल होतं.

जरी त्या राणी होत्या, तरी अहिल्याबाई साधा पोशाख करत, आणि गरजूंसोबत वावरण्यास अजिबात संकोच करत नसत. त्यांचा जीवनशैली अत्यंत नम्र आणि सेवाभावी होती.

राष्ट्रमाता अहिल्या" हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आहे. हे पुस्तक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, जीवनमूल्यांचा, शौर्याचा आणि न्यायप्रियतेचा ठसा उमटवते.

अहिल्याबाईंचे जीवन म्हणजे संयम, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि प्रजासत्ताक नेतृत्व यांचे आदर्श उदाहरण आहे. हे पुस्तक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण दर्शन घडवते.

अहिल्याबाईंचे जीवन हे एक झळाळते दीपस्तंभ आहे – ज्यातून आपण स्त्रीशक्ती, कर्तव्यभावना, न्याय, धर्मनिष्ठा, आणि सेवाभाव शिकू शकतो.

लेखक सगर म्हणतात की ,

शिवरायांचे प्रजावात्सल्य व बुद्धाची करूणा ज्या व्यक्तीत एकत्रित सामावलेल्या होत्या, त्या अहिल्यादेवी होळकर हीच भारतीय दर्शनांची सर्वांगीण ओळख आहे. एवढे अफाट व चिरस्थायी काम अहिल्यादेवींच्या हातून झालेले आहे.


अशा या थोर राज्यकर्त्या लोकमाता राजमाता अहिल्यादेवींवर परदेशी लेखक-लेखिका व कवींनी विपुल लेखन इंग्रजी-फ्रेंच भाषांमधून केलेले आहे. स्कॉटलँडमधील कवयित्री जोना बेली यांनी दीर्घ काव्य रचले आहे. त्यातील चार ओळी अशा आहेत.


'Fo Thirty Years Her Reign of Peace The Land in Blessings Did Increase ! And She was Blessed by Every Tongue.... By Stern And Gentle: Old and Young!"


पॉलिटिकल एजंड सर जॉन माल्कम, व्हाईसरॉय लॉर्ड एलनबरो यांनी अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराबद्दल अत्यंत प्रशंसनीय लिखाण केलेले आहे. मोरोपंतांनी आपली सारी काव्यप्रतिभा अहिल्यादेवींच्या चरणी अर्पण केली होती.


अहिल्यादेवी होळकर या जगाला एक उत्तम प्रशासक, एक प्रजावत्सल लोकमाता, एक आदर्श राज्यकर्त्या, एक मराठेशाहीतील सुवर्णकाळाच्या निर्मात्या, एक स्त्रीत्वाचे जोखड झुगारून देऊन प्रचंड त्याग वा विश्वासाने राज्यकर्त्या म्हणून शिस्तप्रिय शासक, एक सामान्य लोकांच्या भाव-भावनांचा मानसन्मान करणारी राज्यकर्ता..... अशा अनेक अंगांनी माहीत आहेत. राज्यकर्त्यांची ओळख जगभर त्यांच्या कार्यामुळेच होत असते. तशी ओळख आजही अहिल्यादेवींची सर्वदूर आहेच; परंतु आमच्या देशातील इतिहासकार, चरित्रकार, चित्रकार, कलाकार, चित्रपट निर्माते, नाट्यनिर्माते इत्यादींनी आपल्या प्रतिभांचा वापर करून या महान लोकमाताविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केलेली नाही, हा कृतघ्नपणा आहे. लोकमाता अहिल्यादेवींच्या आपल्या जीवनात या सर्व लोकांसाठी केलेले लोककार्य आजही इतिहासाच्या पानापानावर परदेशी इतिहासकरांनी नोंदवलेले आहेच. याशिवाय होळकर संस्थानासह सर्वच देशात आजही खूणा, वस्तू, वास्तू, चित्र, पद्य, काव्य इत्यादी रूपाने शिल्लक आहे. अशा या महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे महानिर्वाण महेश्वर (मध्यप्रदेश) येथे दि. १३ ऑगस्ट १७९५ रोजी झाला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतवर्ष हळहळला. जय मल्हार !!

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Saturday, June 14, 2025

पुस्तक क्र १०४ व्यसनांशी एक हात


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १०४

पुस्तकाचे नाव - व्यसनांशी दोन हात

लेखकाचे नाव - सिंधुताई दहिफळे

प्रकाशन  व आवृत्ती-काव्य मित्र प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या–  ४१

किंमत -- ₹ ५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१०४||पुस्तक परिचय

व्यसनांशी दोन हात

सिंधुताई दहिफळे

व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीची सतत आणि अनावश्यक गरज वाटणे, ती गोष्ट न मिळाल्यास अस्वस्थ वाटणे आणि ती सवय आपल्या शरीराला, मनाला, आणि समाजिक आयुष्याला हानीकारक ठरणे. व्यसन ही एक मानसिक, शारीरिक आणि सामाजिक सवय असते जी व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेर जाते.

व्यसनाचे प्रकार:

दारूचे व्यसन


तंबाखू / गुटखा / सिगारेटचे व्यसन


मादक द्रव्यांचे (ड्रग्स) व्यसन


मोबाईल, सोशल मीडियाचे व्यसन


जुगार, सट्टा यासारख्या वाईट सवयींचे व्यसन

व्यसनाचे दुष्परिणाम:

शारीरिक: आरोग्य खराब होते, विविध आजार होतात.


मानसिक: चिडचिड, नैराश्य, आत्महत्येचे विचार


सामाजिक: कुटुंबात भांडणे, समाजात अपमान, नोकरी/शाळा गमावणे

व्यसन ही एक सवय नसून एक आजार आहे, जो योग्य उपचार, समुपदेशन, आणि आत्मबलाने दूर केला जाऊ शकतो.

व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अतिसेवनाची अशी सवय जी शरीर, मन आणि समाजजीवन यावर नकारात्मक परिणाम करते. यात तंबाखू, सिगारेट, दारू, ड्रग्स (अंमली पदार्थ), मोबाइल, सोशल मीडिया, जुगार, अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

व्यसन का "आजार" मानले जाते?

मेंदूवर परिणाम: व्यसन मेंदूच्या डोपामिन प्रणालीवर परिणाम करते, त्यामुळे त्या गोष्टीकडे पुन्हा पुन्हा आकर्षण वाटते.


सहज सोडता येत नाही: व्यसन असलेल्या व्यक्तीला ते सोडणे कठीण जाते, अगदी इच्छा असूनही.


शारीरिक व मानसिक नुकसान: व्यसनामुळे हृदय, यकृत, फुफ्फुसे यांच्यावर ताण येतो; मानसिक तणाव, नैराश्य निर्माण होते.


सामाजिक परिणाम: कुटुंब, नातेसंबंध, नोकरी/शिक्षण यावर परिणाम होतो.


चिकित्सक उपचार आवश्यक: यासाठी वैद्यकीय व मानसोपचार उपचार आवश्यक असतात, जसे की इतर आजारांसाठी लागतात.

अशाच विविध व्यसनांशी कसा लढा द्यायचा हे या छानशा पुस्तकातून सिंधुताई आपणा सर्वांना माहिती सांगतात .शक्तिशाली आणि सामर्थ्यवान मन व्यसनमुक्त असते या शीर्षकाखाली पहिल्याच प्रकरणात त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे .यामध्ये त्या म्हणतात,

उकिरड्यावर जशी डुक्कर लोळतात तसेच काही व्यसनी माणसे शरीराचा आणि मनाचा तोल हरवून रस्त्यावर लोळत असतात. उकिरड्यावर लोळणाऱ्या डुकरांमध्ये आणि माणसांमध्ये फारसा फरक राहत नाही. माणसे व्यसने करतात तरी का ? काही जणांना भूतकाळातील आठवणींची गिधाडं छळत असतात त्यापासून सुटका करण्यासाठी व्यसनाला जवळ करतात, डोळ्यात कोजागिरीच्या चांदण्यासारखी स्वप्न साठवून ठेवावी आणि अचानक स्वप्नभंग होऊन काळ्याकुट्ट अमावस्येने जीवनाभोवती विळखा घालावा आणि त्यापासून सुटण्यासाठी हातात कुणीतरी मद्याचा प्याला घ्यावा. प्रेमभंगामुळे सुरीसारखं काळज कापत जावे आणि जखमी मन सतत सलत रहावं या मनाला शांत करण्यासाठी कुणी तरी ग्लास घेऊन तो गळ्याखाली रिकामा करावा. दुःखाचे, निराशेचे, वेदनेचे ढग दाटून यावेत त्यावेळी कुणीतरी या साखळदंडातून सुटण्यासाठी व्यसनाच्या आहारी जावे. व्यसन करण्यासाठी व्यसनी माणसे फक्त कारण शोधत असतात. धडपडीतून जीवनाचा मार्ग शोधून जी माणसे वाट शोधून गरूडभरारी घेतात ती माणसे प्रयत्नवादी असतात. प्रयत्नवादी माणसे व्यसनापासून दूर राहतात आणि व्यसनी माणसे कुजलेले मांस खाणाऱ्या गिधाडाप्रमाणे दुःखाला चिटकून बसतात.

व्यसनाविषयी किती परखड मत त्यांनी या पुस्तकातून मांडल आहे .खरंतर हे व्यसन आपल्या स्वतःचे तर आयुष्य उध्वस्त करतच पण आपल्याबरोबर आपल्या जिवलग आणि कुटुंबाचेही आयुष्य उध्वस्त करून टाकतं .या पुस्तकात त्यांनी विविध अकरा प्रकरणातून या व्यसनाविषयी खूप छान मोलाचे मार्गदर्शन केले आहे .

१. शक्तीशाली आणि सामर्थ्यवान मन व्यसनमुक्त असते


२. कडूलिंबाची झाडं कमी झालीत पण व्यसनामुळे नात्यात कडूपणा वाढला आहे


३. सुख नाही जीवा तर इस्टेटीला आग लावा


४. बेकायदा दारू जप्तीसाठी ग्रामसुरक्षा दलाला अधिकार मिळाले पाहिजेत


५. व्यसनमुक्त समाजरचनेचा प्रचार शिक्षणातून झाला पाहिजे


६. व्यसनमुक्त भारतासाठी आपले योगदान


७. व्यसनी असलेली श्रीमंत माणसे विचाराने दरिद्रीच असतात


८. संहारक अस्त्र- मादकद्रव्य हशीश, कोकन, ब्राऊन शुगर


९. संविधानाचे कलम ४७ वे व्यसनमुक्तीसाठीच


१०. व्यसनी मनुष्य प्रथम स्वतःच्या नजरेतून उतरतो नंतर समाजाच्या


११. आदर्श जीवनमूल्ये नैतिमूल्ये समाजात रूजली पाहिजेत .

या प्रकरणांच्या शीर्षकावरूनच या पुस्तकाची माहिती आपल्याला कळून आली असेल .एका महिलेने व्यसनाविषयी लिहिणं खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे .व्यसनाशी दोन हात या पुस्तकातून येणारी पिढी व्यसनातून मुक्त झाली पाहिजे यासाठी लेखिका प्रयत्न करताना दिसून येते .प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे इतकं हे पुस्तक सुंदर आहे .व्यसन हे चांगल्या गोष्टीचा असलं पाहिजे पण वाईट व्यसन ते आपल्यातला चांगुलपणा कधी घालवून टाकतो हे समजतही नाही .म्हणून व्यसन चांगले करा ज्याने आपल्या जीवनाचा उद्धार आणि उत्कर्ष झाला पाहिजे . तरुणांसाठी खास . तुमच्या डोळ्यांत चमक आहे, स्वप्न आहेत, जिंकायची जिद्द आहे... मग का बरं या क्षणिक नशांना आयुष्याची दिशा ठरवू देता?


व्यसन हे पहिल्या वेळी आकर्षक वाटतं, पण त्याच्यात एक अशी विळख्याची ताकद असते जी हळूहळू माणसाला स्वतःपासून दूर नेत जाते. शरीर, मन, कुटुंब, करिअर – सगळं काही गमावण्याची सुरुवात ही फक्त एक सिगारेट, एक पेग, एक गोळी यापासून होते.


आज ज्याचं तुम्ही "टाईमपास" म्हणता, उद्या तेच तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा पास आऊट होण्याचं कारण ठरू शकतं.

जगाला बदलायचं स्वप्न बघा, पण आधी स्वतःला वाईट सवयींपासून बदलायला शिका.

एकदाच ठरवा – "मी व्यसनमुक्त जीवन जगणार!" आणि त्यावर ठाम रहा.

सिंधुताईंच्या या लेखन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा .खूप छान पुस्तक आपण लिहिलं आहे .हे पुस्तक वाचून अनेक जण व्यसनापासून दूर राहतील हे मात्र खरं .वाचा हे पुस्तक नक्की !धन्यवाद🙏


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Friday, June 13, 2025

पुस्तक १०३ जडे जीव ज्याचा


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १० ३

पुस्तकाचे नाव - जडे जीव ज्याचा

लेखकाचे नाव - प्रवीण दवणे

प्रकाशन व आवृत्ती-नाविन्य प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या– ६८

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१० ३||पुस्तक परिचय


जडे जीव ज्याचा

प्रवीण दवणे


प्रवीण दवणे यांच्या जडे जीव ज्याचा तरलीका म्हणजेच चारोळी संग्रह खूप छान आहेत. एका कार्यक्रमात त्यांच्या सहीने हे पुस्तक माझ्यापर्यंत पोहोच झाले. मला हे पुस्तक हवच होते. या पुस्तकातील तरलीका अनेक भावभावनांचा अलगद वेध घेतात .कधी कधी वाचताना या आपल्या आयुष्याशी निगडित होतात .प्रवीण दवणे सर यांचीही खास शैली आहे .वाचकाच्या मनाला अलगद भुरळ घालते .वाजता वाजता आपण या पुस्तकाशी कधी एकरूप होतो हे समजतही नाही आणि उमजतही नाही .

प्रवीण दवणे यांची लेखनशैली ही अत्यंत हृदयस्पर्शी, भावनिक आणि अलंकारिक अशी आहे. त्यांची शैली वाचकाच्या मनावर गारुड घालणारी असून, ती अनुभवांवर आधारलेली आणि जीवनातील सूक्ष्म भावनांना स्पर्श करणारी असते.

कविता, ललित लेख, आत्मकथन, भाषण लेखन, निबंध अशा विविध साहित्यप्रकारांत ते लेखन करतात.


प्रत्येक प्रकारात त्यांची शैली सुसंगत राहते, पण भावनिक प्रभाव कायम राहतो.

त्यांच्या लिखाणातून जीवनाबद्दल आशावाद, सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते.

त्यांची भाषा ही सौंदर्यपूर्ण आणि काव्यमय असते. ते शब्दांना जणू आत्मा देतात.


उदाहरणार्थ, ते "आई" या विषयावर लिहिताना शब्दांतूनच आईची माया, वात्सल्य, त्याग दाखवतात.

त्यांच्या लेखनात सामान्य माणसाच्या संघर्षांची, भावना, मूल्ये, संस्कार यांची झलक दिसते.


उदाहरणार्थ, शिक्षक, विद्यार्थी, आई-वडील, ग्रामीण जीवन हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय आहेत.

क्लिष्ट शब्दांपेक्षा ते सहज समजणारी, प्रवाही भाषा वापरतात.


त्यांच्या शैलीत एक प्रकारचं “बोलकं लेखन” असतं, जणू ते वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत.

प्रवीण दवणे यांची लेखनशैली ही भावनाशील हृदयातून आलेली शैली आहे. ती वाचकाच्या मनाचा ठाव घेते, विचार करायला लावते आणि नकळत डोळ्यात पाणी आणते. म्हणूनच त्यांचे लेखन काळजाला भिडणारे आणि मनात घर करणारे असते.

प्रसिद्ध मराठी कवी, लेखक व व्याख्याते प्रवीण दवणे सर यांच्या तरल, हृदयस्पर्शी शैलीतील एक अत्यंत भावविवश करणारे पुस्तक म्हणजे "जडे जीव ज्याचा". या पुस्तकात त्यांच्या ‘तरलीका’ या सदरातील निवडक लेखांचा आणि चारोळ्यांचा संग्रह आहे.

जडे जीव ज्याचा" हे पुस्तक भावनिक तरलतेने ओतप्रोत भरलेले आहे. यात त्यांनी आपल्या अनुभवातून, भेटलेल्या माणसांमधून, समाजातील घटनांमधून घेतलेल्या क्षणांना शब्दरूप दिले आहे. त्यांच्या शैलीला विशेष स्थान लाभले आहे—ती एकाच वेळी कविता, गद्य, चारोळी, व्याख्यान आणि आत्मकथनाचे मिश्रण आहे.

या पुस्तकातील काही निवडक चारोळ्यांसह आपण या पुस्तकाला अधिक समजून घेऊ शकतो .

मुक्या हुंदक्यांचे गाणे कुणाला कळावे ? छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे ! जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे नशिबी असे घाव यावे !

पुस्तकाच्या सुरुवातीलाच या पुस्तकाचे नावावरून त्यांनी अतिशय समर्पक अशी ही चारोळी दिली आहे .

इतक्या गडद झोपेतून

मला कोणी जागवलं

कवितेनेच येण्यासाठी

कागद पेन मागवलं

कविता निर्मितीची किती सुंदर कल्पना या ठिकाणी प्रवीण सरांनी केली आहे .अशाच अनेक सुंदर सुंदर चारोळी या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतील .

वाट पाहतात पाऊलवाटा

जीव जडल्या मनांची

त्यांनाही तर ओढ असते उन्हामधल्या पावसाची

खरंच प्रेमात पडल्यावर जी ओढ असते ती या काव्यातून आपल्याला नक्कीच समजते .

शब्दांमधल्या आकाशात

चंद्र माझा भिजेल का ?

आकाशाचा शब्द होऊन

चांदण्यात रुजेल का ?

आपले शब्दांवर प्रेम करताना त्यांनी ही चारोळी खूप छान दिली आहे .

प्रेम किती उत्कट निरपेक्ष निष्पाप आणि अमाप असतं हे या पुढील चारोळी वरून आपल्याला समजून येईल

मी नाही राधा नाहीच मीरा

झुरणारी पण भोळी गवळण

श्वासामध्ये एक नाम जप

घट्ट जुळावा देवकीनंदन !

किती छान प्रेम यातून व्यक्त झाले .मला आवडलेली खूप सुंदर चारोळी आहे .

प्रवीण दवणे सरांच्या या पुस्तकातील सर्व चारोळी खूपच छान आहेत .प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे एवढे सुंदर हे पुस्तक .नक्की वाचा . धन्यवाद .

  

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Thursday, June 12, 2025

पुस्तक क्र . १०२ ताई मी कलेक्टर व्हयनू

 


वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १०२

पुस्तकाचे नाव - ताई मी कलेक्टर व्हयनु

लेखकाचे नाव - राजेश पाटील

प्रकाशन  व आवृत्ती- ग्रंथाली प्रकाशन मुंबई

पृष्ठे संख्या–  १५४

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१० २||पुस्तक परिचय

ताई मी कलेक्टर व्हयनु


ताई, मी कलेक्टर व्हयनू!’ — राजेश पाटील यांचं आत्मकथन, एक संघर्षमय प्रेरणादायी कथा, जी खेड्यातून आयएएस अधिकारी बनण्याच्या कठीण वाटचालीचं स्पर्शपूर्ण वर्णन करते.

राजेश पाटील ताडे (ता. एरंडोल, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र) या अत्यल्प साधनसंपन्न कुटुंबातून आलेले. शेतमजुरी, भाजी–पाव विकणे, ट्रॅक्टर–विहिरीचे काम अशा विविध नोकऱ्यांमधून शिक्षणाची पायरी चढली.

पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण. २००० मध्ये भारतीय सांख्यिकी सेवा व वायुदलात प्रतिष्ठापित निवड; २००५ मध्ये IAS मध्ये प्रवेश.

त्यांच्या या जीवन प्रवासातील आठवणी या पुस्तकात आपल्याला दिसून येतात .एखाद्या व्यक्तीला अधिकारी होईपर्यंत किती संघर्ष कष्ट करावे लागतात हेही पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल . ज्याला आयुष्यात काहीतरी करायचे त्यांनी नक्की हे पुस्तक वाचावे .स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हे पुस्तक तर संजीवनी ठरेल .आदरणीय पाटील सरांनी आपल्या बोलीभाषेत खूपच छान विविध उदाहरणे देऊन या पुस्तकाची समस्त वाचक वर्गासाठी छान रचना केली आहे .

या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा आपण आढावा घेऊया .

बालपणातील अडचणी – 'पाववाला राजू' म्हणून चळवळीची आयुष्ययात्रा. खेळ, चोरी, व्हिडिओचे जवळचे मित्र, हे सर्व कथा वाचताना लेखकाचं जीवन जवळून जाणवते 


स्व-विश्लेषणाची क्षणं – आई–अण्ण्यांचा लेखी हिशोब, चोरीतील पकड, आणि आत्म-दंडप्रक्रिया – सर्वात जुना काही बदल घडवणारा क्षण ठरतो.


उद्येशाच्या दिशेची झेप – संघ लोक सेवा आयोगाच्या तयारीसाठी पुणे–दिल्लीच्या प्रवासाचा तपशीलवार उलगडा. परीक्षेतील भय, आशा, रणनीती 


यशस्वितेचा क्षण – IAS मध्ये निवड झाल्यानंतर 'ताई, मी कलेक्टर व्हयनू!' असा आनंदाचे घोष घोषित होते 


भावनिक सूत्र – मातृभावना (‘ताई’), शिक्षिकेचे मार्गदर्शन—यांचे मनोगत, लेखकाच्या दृढ वृत्तीसोबत प्रेरक आहे .

शून्यातून विशाल अवकाशाकडे झेप’ या वाक्याने  स्वप्नांची उंची व्यक्त होते 


डॉ. नरेंद्र जाधव लिखित प्रस्तावनेत सांगितलंय: “प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंगभूत गुणवत्ता असते... ती शोधून मेहनत केली तर कर्तृत्वाची शिखरे गाठता येतात” 


पुस्तक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी दीपस्तंभ ठरतं; सामाजिक विषमता, आर्थिक संघर्षावर मात करणाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरतं .

अनेक वृत्तपत्र, ब्लॉग, कलाकारांनी हे आत्मकथन प्रेरणादायी, उर्जादायी, आणि भावनेने परिपूर्ण म्हणून वाखाणलेले आहे .


विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या आणि कष्टकरी घरी वाढलेल्या व्यक्तींच्या वाचन यादीत हे पुस्तक अगदी वरच्या स्तरावर आहे.

राजेश पाटील यांचे बालपण अत्यंत गरीब कुटुंबात गेले. वडील हमाल काम करत आणि घरात शिक्षणाचे वातावरण नव्हते. त्या परिस्थितीतून बाहेर पडून शिक्षण घेणे हीच सर्वात मोठी लढाई होती.

त्यांना शिकण्यासाठी पोषण, पुस्तकं, फी, वीज, पाणी या मूलभूत गरजांशी संघर्ष करावा लागला. त्यांनी अंगमेहनतीची कामं केली – जसं की दूध विकणे, वर्तमानपत्र टाकणे, विटा वाहणे – हे सर्व करत करत शिक्षण पूर्ण केलं.

ते सदैव स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत राहिले. ग्रामीण मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन त्यांनी इंग्रजीतून UPSC सारखी स्पर्धा परीक्षा दिली. ही एक मानसिक आणि बौद्धिक लढाई होती.

अखेर त्यांनी IAS (भारतीय प्रशासकीय सेवा) मध्ये यश मिळवले आणि 'कलेक्टर' होण्याचे स्वप्न साकारले.

राजेश पाटील यांचा संघर्ष म्हणजे गरिबी, अशिक्षण, आत्मशंका, आर्थिक अडचणी आणि सामाजिक आव्हानांवर मात करून केलेला यशस्वी आत्मोद्धार आहे.

"ताई मी कलेक्टर व्हयनू" हे पुस्तक केवळ त्यांच्या यशाची गोष्ट नाही, तर लाखो तरुणांना प्रेरणा देणारी जीवनगाथा आहे.

का वाचाल हे पुस्तक?

प्रेरक कथा: गरीबीपासून आयएएस पदापर्यंतचा संघर्ष.


भावनिक गुंतवणूक: आई–मुलग्याचं नातं, शिक्षकांचं मार्गदर्शन.


युवांसाठी आदर्श: स्पर्धा परीक्षांसाठी ठोस प्रेरणा आणि रणनीती.


सामाजिक संदेश: प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेली क्षमता, ती शोधण्याची प्रेरणा.

ताई, मी कलेक्टर व्हयनू!’ हे पुस्तक केवळ आत्मकथा नाही, तर आत्मप्रेरणेचं एक शक्तिशाली स्त्रोत आहे. ज्या वाचकातील कोणत्याही व्यक्तीमध्ये हिम्मत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे, त्यांना हे पुस्तक जीवनात मोठ्या बदलासाठी मदत करणारी प्रकाशपुंज ठरेल.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १०१ जगायचय प्रत्येक सेकंद


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १०१

पुस्तकाचे नाव - जगायचंय प्रत्येक सेकंद

लेखकाचे नाव - मंगला केवळे

प्रकाशन व आवृत्ती- ग्रंथाली प्रकाशन मुंबई

पृष्ठे संख्या– १३८

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ 200

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१०१||पुस्तक परिचय

जगायचंय प्रत्येक सेकंद

मंगला केवळे


जगायचयं प्रत्येक सेकंद हे पुस्तक म्हणजे आयुष्याच्या रंगमंचावर घडणाऱ्या अनेक भावनिक, संघर्षमय आणि सकारात्मक क्षणांचं साहित्यिक प्रतिबिंब आहे. लेखिका मंगला केवळे यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव, प्रसंग, आणि मनात उमटलेल्या तरल भावना शब्दबद्ध करताना वाचकांच्या मनाला भिडणारी शैली वापरली आहे.


या पुस्तकात प्रत्येक क्षणात आशा शोधण्याची, दुःखातही शिकण्याची, आणि आयुष्याला सामोरं जाण्याची सकारात्मक दृष्टी दिली आहे. संघर्षांवर मात करताना केलेले छोटे छोटे निर्णय, अपयशातून उभं राहण्याची उमेद आणि ‘जगायचयं’ हे तत्त्वज्ञान हळूहळू मनात खोलवर रुतत जातं.

लेखिकेची भाषा ही प्रामाणिकतेचा स्पर्श असलेली, अनुभवांनी ओतप्रोत आणि भावनांनी नटलेली आहे. अतिशय सहजतेने, पण प्रभावीपणे त्या वाचकाला आपल्या भावविश्वात ओढून घेतात. त्यांचे लेखन हे साहित्य नसून जीवनाचे सत्य वाटावे असे आहे.

हृदयाला भिडणारं, मनाला उभारी देणारं आणि जीवनाचा अर्थ शोधायला लावणारं "जगायचयं प्रत्येक सेकंद" हे पुस्तक तुमच्या आयुष्यातील एक नवा दृष्टिकोन घेऊन येईल, ही खात्री.

मंगला केवळे लिखित पुस्तकात त्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर आलेली वादळे कशी केलेली याचं मूर्तिमंत उदाहरण या पुस्तकातील आहे .एक स्त्री खंबीरपणे कशी उभी राहू शकते हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला समजून येते .

सुरुवातीला द्या सारखे रडत बसायच्या निराशरायच्या पण नंतर त्यांनीआपल्या पतीच्या छंद सारखे अनेक छंद जोपासत आयुष्यात कसं जगावं नाही तर आयुष्य प्रत्येक सेकंद कसं जगावं याचं उत्तम उदाहरण दिलं .त्यांच्या दोन अपत्यानंतर हे पुस्तकही त्यांचं तिसर अपत्य आहे हे त्या आवर्जून सांगतात .या पुस्तकाच्या आतापर्यंत दहा हजार प्रती वाचकापर्यंत पोहोचले आहेत .या पुस्तकांवर अनेकांनी खूप सुंदर सुंदर अभिप्राय दिलेले आहेत .मंगला मॅडमचे पती बूट पॉलिश करत रेल्वेमध्ये तरी तर याच्या वस्तू विकत वेगवेगळ्या प्रकारचे नोकरी त्यांनी करत आपले शिक्षण पूर्ण केले आणि ते डॉक्टर झाले .डॉक्टर होऊन त्यांनी अनेक कला छंद जोपासले आणि आपलं जीवन आनंदाने जगले पण एका अपघाताचे निमित्त होऊन त्याखाली मरण पावले .त्यांच्या मृत्यूनंतर मंगला मॅडम यांनी सांगितलेले त्यांच्या वाढीची शिक्षणाची आणि त्यांच्या सहजीवनाची ही कहाणी म्हणजे हे पुस्तक .

या पुस्तकाची काही वैशिष्ट्यं :

व्यक्तिगत अनुभवांची साक्षर मांडणी

लेखिकेने आपल्या आयुष्यातील अनेक भावनिक, सामाजिक, मानसिक टप्प्यांचा प्रांजळ आढावा घेतला आहे.


आशावादाचा सूर

निराशेच्या गर्द छायांतही आशेचा दीप तेवत ठेवणं, हीच या पुस्तकाची आत्मा आहे.


महिलांच्या दृष्टिकोनातून जीवनदृष्टी

स्त्री म्हणून लेखिकेने ज्या अनुभवातून जसं काही आत्मचिंतन केलं आहे, ते अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरतं.

साध्या भाषेतील सखोल विचार

अलंकारिक न करता थेट हृदयाला भिडणाऱ्या शैलीत ही मांडणी आहे.

त्यांच्या आयुष्यातील मला आवडलेला एक सुंदर प्रसंग . नवरा बायकोचं नातं किती सुंदर असतं हे सांगणारा .

१० मे ९१, शुक्रवार, डॉक्टरांनी मला पोहणे शिकवायला सुरुवात केली. मी अगदी नवीन. पाण्यात बुडायचे, माझ्या नाका-तोंडात पाणी जायचे, मी गुदमरायचे, घाबरायचे, चक्क ओरडायचेसुद्धा. सगळी पुरुष मंडळी आमच्याकडे पाहायची. मग तर मी अजूनच लाजून जायचे. डॉक्टर मला पुन्हा पोहण्याच्या खाचाखोचा सांगत राहायचे. पाण्यात हातपाय मारायला लावायचे. मी पाण्यात बुडायचे, ओरडायचे. सर्वजण आमच्याकडे पाहायचे, परंतु 'डॉक्टरांनी शिकवणे व मी शिकणे' काही सोडले नाही. तो पोहण्याचा चौथा दिवस होता. खरेच, माझा विश्वास बसत नव्हता. मी स्वतंत्रपणे पोहू लागले. डॉक्टरांनी मला तीनच दिवसांत पोहायला शिकवले. डॉक्टर म्हणू लागले, "माझ्या मंगलने मी दिलेल्या सर्व बारीकसारीक सूचनांकडे लक्ष दिले. त्याप्रमाणे प्रयत्न केले. अपेक्षिलेल्या चार दिवसांऐवजी मंगल तीनच दिवसात पोहायला शिकली." डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. माझे ते खूप कौतुक करत होते व इतर लोक बघत आहेत, हसत आहेत, ह्याची कशाचीही पर्वा न करता त्यांनी मला शिकवले, प्रोत्साहन दिले, ह्याबद्दल मी त्यांचे कौतुक करत होते. खरेच ! आम्ही दोघेही एकमेकांना सारख्याला वारखे (Made for each other) असेच भेटलो होतो का?


किती सांगून जाणारा आहे हा बोलका हा प्रसंग .खरंच हे जगायचं प्रत्येक सेकंद पुस्तक वाचल्यावर नक्की समजत .आयुष्यात कितीही दुःख आले तरी खचून न जाता आपल आयुष्य आपण आनंदाने जगलं पाहिजे .

हे पुस्तक केवळ वाचण्याचं नाही — अनुभवण्याचं आहे.

ते आपल्या मनात एक चिरंतन प्रेरणा पेरून जातं :

"क्षणांचा हिशोब करू नका,

प्रत्येक क्षणाला जगा."

प्रत्येकाने वाचावे इतक नितांत सुंदर पुस्तक .

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Sunday, June 8, 2025

मराठी अभ्यास पुस्तिका प्रांजली नलवडे जगताप


 मराठी भाषा अभ्यास पुस्तिका"

लेखिका: प्रांजली नलवडे-जगताप


मराठी भाषेचा सुगंध प्रत्येकाच्या मनी रुजावा, तिचा स्वाभिमान जागवावा आणि तिचे बाळकडू सहजतेने प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजावे या उदात्त हेतूने प्रांजली नलवडे-जगताप यांनी साकारलेली ही "मराठी भाषा अभ्यास पुस्तिका" म्हणजे ज्ञानरचनावादाच्या गाभ्यातून स्फुरलेली एक अभ्यासपूर्ण सर्जनशील निर्मिती आहे.


🔸 ज्ञानाचा झरा, अनुभवाची नदी – शिक्षणाची सांगोपांग वाटचाल:

ही पुस्तिका केवळ वाचन व लेखन शिकवणारी साधी साधनसामग्री नाही, तर ती विद्यार्थ्याच्या अनुभूतीच्या मळ्यातून विचारांच्या अंकुरांना उगम देणारी प्रेरक वाट आहे. ज्ञानरचनावादी अभ्यासपद्धती ही ‘विद्यार्था केंद्रित’ तत्त्वावर आधारित असून, तिचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवांद्वारे शिकणे आणि अर्थ लावणे. लेखिकेने ही संकल्पना अत्यंत कल्पकतेने, वास्तवातील अनुभवांशी जोडून प्रात्यक्षिकरूपात विद्यार्थ्यांसमोर ठेवली आहे.


🔹 शब्दांचे मंदिर – भाषेचे सखोल आकलन:

प्रत्येक धडा हा जणू भाषेच्या विश्वातल्या एका नवनवीन मोत्याचा साक्षात्कार आहे. वाचनाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे प्रश्न, संवादात्मक शैली, सहजसोप्या शब्दांतून साकारलेले साहित्य – हे सगळं संपूर्ण पद्धतशीर अभ्यासक्रमाशी बांधलेलं आहे. भाषेचा आत्मा जपत हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या मनात शब्दांच्या प्रति एक आत्मीयता निर्माण करतं.


🔸 लेखनकौशल्यांचा मृद्गंधी विकास:

लेखनाच्या विविध प्रकारांतील सौंदर्य जाणवून देत हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये रचनात्मक लेखन कौशल्य विकसित करतं. कथालेखन, निबंध, पत्रलेखन, संवादलेखन, वर्णनात्मक लेखन अशा अनेक शैलींची सृजनात्मक मांडणी केली आहे.


🔹 शिकण्याची प्रक्रिया – जणू आनंदयात्रा:

ही पुस्तिका म्हणजे केवळ शालेय पुस्तक नसून ज्ञानाच्या वाटेवरचा एक दीपस्तंभ आहे. प्रत्येक धड्यात अंतर्भूत असलेल्या क्रिया, चिंतनवृत्त्या, अभ्यासपूर्ण उपक्रम हे शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आहेतच, पण विद्यार्थ्यांनाही एकट्याने आणि समूहात शिकण्याची सवय लावतात.


🌿 शेवटी, ही पुस्तिका म्हणजे...

एक प्रेरणादायी प्रयत्न – जिथे शिकणं म्हणजे रटणं नाही, तर अनुभवांची गुंफण, शब्दांची मैत्री, विचारांचं विलोभनीय आकाश आणि भाषेचा आत्मीय संवाद आहे.


✍️ प्रांजली नलवडे-जगताप यांची लेखणी म्हणजे मराठीच्या मुळाशी पोहोचलेली विचारशील वृत्ती आणि शिक्षक-विद्यार्थ्यांमधील समर्पक सेतू. ही पुस्तिका प्रत्येक शिक्षकाच्या आणि विद्यार्थ्याच्या हातात असणं म्हणजे भाषा शिकण्याची चविष्ट आणि प्रभावी वाटचाल सुरू करणं.


हे पुस्तक त्या प्रत्येकासाठी –

ज्यांच्या मनात आहे मराठीसाठी ओढ,

आणि शिकण्याच्या प्रक्रियेत आहे शोध! 📖✨


 सौ. अंजली शशिकांत गोडसे 

महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त 

उपशिक्षिका 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा.

पुस्तक क्र . १०० मन में है विश्वास


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १००

पुस्तकाचे नाव - मन मे है विश्वास

लेखकाचे नाव - विश्वास नांगरे पाटील

प्रकाशन व आवृत्ती-राजहंस प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या– २०४

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २८०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१००||पुस्तक परिचय

मन मे है विश्वास

विश्वास नांगरे पाटील



मन में है विश्वास" हे पुस्तक महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि प्रेरणादायी आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांचे आत्मचरित्र आहे. त्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक संघर्ष, प्रेरणा, शिक्षण, आणि यशस्वीतेचा प्रवास अत्यंत थेट आणि ओघवत्या शैलीत मांडला आहे.


या पुस्तकातून ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या एका जिद्दी तरुणाने केवळ मेहनतीच्या जोरावर कशी उंच भरारी घेतली, हे वाचकांना समजते. त्यांनी UPSC परीक्षेच्या तयारीपासून ते पोलीस सेवेमधील अनुभवांपर्यंत सर्व काही मोकळेपणाने सांगितले आहे.

या आधी मी त्यांच्या कर मैदान फतेह या पुस्तकाविषयी परिचय लिहिलेला आहे .या पुस्तकाविषयी लिहिण्याचा खूप मनात होतं .आणि हे पुस्तक मला मिळालं मी ते वाचून काढले आणि त्याविषयी माझ्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला .

या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे

बालपण आणि संघर्ष – कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांच्या लहानशा गावातले दिवस, वडीलांचे साधे जीवन, आईची प्रेरणा.


शिक्षणातील अडचणी – साधनसंपत्तीच्या अभावातही अखंड प्रयत्न आणि स्वतःवरचा विश्वास.


UPSC तयारी – दिल्लीतील आयएएस अकादमीचे अनुभव, अयशस्वी प्रयत्नानंतर मिळवलेले यश.


IPS प्रशिक्षण – हैदराबादमधील नॅशनल पोलिस अकादमीतील दिवस.


कार्यजीवनातील प्रसंग – नाशिक, मुंबई पोलीस दलातील जबाबदाऱ्या, 26/11 च्या घटनेतील अनुभव.


समाजकार्य आणि नेतृत्व – युवांना सकारात्मकतेकडे वळवणारे उपक्रम.

आदरणीय विश्वास नांगरे पाटील यांनी हे पुस्तक 26 /11 च्या लढाईत बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अर्पण केलेले आहे .

या पुस्तकातील सर्वात जास्त आवडलेली काही वाक्य तुमच्यासाठी मी सांगत आहे .

स्वप्न बघणं महत्त्वाचं आहे, पण ते सत्यात उतरवण्यासाठी कठोर प्रयत्न आणि चिकाटी लागते."


"मी अनेकवेळा अपयशी ठरलो, पण प्रत्येक वेळी मी पुन्हा नव्यानं उभा राहिलो. कारण मनात होता विश्वास."


"आईने शिकवलं – परिस्थिती ही आपल्या मन:स्थितीवर मात करू शकत नाही, जोवर आपण ठाम आहोत."


"माणूस मोठा पदाने होत नाही, तर तो विचारांनी आणि कृतीने मोठा होतो."

किती प्रेरणादायी वाक्य आहे ती !प्रत्येक शब्द शब्दात जिद्द चिकाटी आणि प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळते .

या पुस्तकाचे वैशिष्ट्य:

युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी.


ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक प्रकाश.


कठोर परिश्रम, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा यांचे आदर्श उदाहरण.


मराठीत सहज आणि प्रभावी शैली.


आदरणीय पाटील साहेबांच्या या पुस्तकात अनेक प्रेरणादायक उतारे आहेत .पैकी काही मला आवडले पुढील प्रमाणे


झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची नाही. भिडायचं, लढायचं. जिंकलो तर उत्तम, हरलो तर भिडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.”

हा विचार आपल्याला शिकवतो की – सुरक्षित राहून काही साध्य होत नाही, लढा मांडायचा आणि अपयशातूनही शिक्षण घ्यायचं.


आकाशातून एखादा थेंब थेट हातावर पडला... तो कमळपुष्पावर पडला, तर तो मोत्यासारखा चमकतो आणि जर तो शिंपल्यात पडला, तर त्या पाण्याच्या थेंबाचाच मौल्यवान मोती होतो... पण त्याचं अस्तित्व, लायकी व किंमत तो कोणाच्या संपर्कात येतो, यावर अवलंबून असतं.”


हे रूपक आत्मविश्वास आणि बदलाच्या वातावरणातील प्रभाव दर्शवतं – आपण कुठे आणि कोणासोबत आहोत, त्या माध्यमातून आपली किम्मत आकार घेत जाते.

खरोखर प्रत्येक शब्द हा एक नवी प्रेरणा आहे .प्रत्येकाने वाचाव आणि एक नवीन प्रेरणादायी असे हे सुंदर पुस्तक .

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र. ९९ भारतातील कर्तृत्ववान स्त्रिया


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ९९

पुस्तकाचे नाव - भारतातील कर्तृत्ववान स्त्रिया

लेखकाचे नाव - सौ.प्रतिभा हंप्रस

प्रकाशन  व आवृत्ती-साकेत प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या–  १८९

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १७५

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

९९||पुस्तक परिचय


भारतातील कर्तृत्ववान स्त्रिया

सौ .प्रतिभा हंप्रस


कर्तृत्ववान स्त्रिया म्हणजे धैर्याचं दुसरं रूप, जिद्दीचा झरा आणि आत्मविश्वासाचं सळसळतं सागर! त्या केवळ आई, बहीण, पत्नी, कन्या एवढ्यापुरत्या सीमित राहत नाहीत; तर त्या बनतात समाजाची दिशा दाखवणाऱ्या दीपस्तंभ.


त्यांच्या यशाची वाट फुलांनी सजलेली नसते, तर काटेरी संघर्षांनी भरलेली असते. पण त्या सूर्याच्या तेजाने झळाळणाऱ्या, मेघांच्या गर्जनेला न जुमानणाऱ्या, हातात वाटसरूचा दिवा घेऊन चालणाऱ्या असतात.

कर्तृत्ववान स्त्रिया म्हणजे अशा स्त्रिया ज्यांनी आपल्या कौशल्य, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजात, राष्ट्रात किंवा जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा स्त्रिया केवळ स्वतःच्या यशापुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर त्या इतर महिलांसाठी प्रेरणास्थान बनतात.

कर्तृत्ववान स्त्रिया म्हणजे संघर्षातून उभी राहिलेली, स्वप्न जगलेली आणि इतरांसाठी प्रकाशवाट दाखवणारी दिवटी असते. त्यांचे आयुष्य वाचल्यास आपल्यालाही दिशा मिळते, प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो.

या पुस्तकात विविध कालखंडातील व क्षेत्रातील स्त्रियांचे उल्लेख आहेत. काही उदाहरणे खालीलप्रमाणे:


झांसीची राणी लक्ष्मीबाई – स्वातंत्र्याची पहिली ज्योत उंचावणारी योद्धा.


राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या


सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पहिल्या शिक्षिका


इंदिरा गांधी – भारताची पहिली महिला पंतप्रधान.


कल्पना चावला – अवकाशात झेप घेणारी पहिली भारतीय महिला अंतराळवीर.


लता मंगेशकर – स्वरकोकिळा, भारतीय संगीताची अमूल्य देणगी.


मदर टेरेसा – सेवा, त्याग आणि माणुसकीचे प्रतीक.


सुधा मूर्ती – समाजसेविका आणि लेखिका.



झांसीची राणी बनते आणि तलवारीच्या पात्यावर स्वातंत्र्याचं स्वप्न रेखाटते,


कल्पना चावला बनते आणि आकाशालाही गवसणी घालते,


लता मंगेशकरच्या स्वरात संपूर्ण राष्ट्र धुंद होते.


अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची मालिका या पुस्तकात गुंफली आहे .कर्तुत्ववान स्त्रियांविषयी खूप अभिमान वाटतो त्यांच्याविषयी एवढेच वाटते,

ती असते पावसात भिजलेली पण स्वप्नांना ओली करू न देणारी,

ती असते सावलीसारखी शांत पण गरज पडली की वादळ बनणारी,

ती असते मातीला सुवर्णात बदलणारी करामती हाताची जादूगारण,

ती असते शब्दात गंध फुलवणारी कवयित्री आणि कर्मात क्रांती घडवणारी कार्यकर्ती.

कर्तृत्ववान स्त्रिया म्हणजे शतकांची साखळी तोडून नव्या वाटा शोधणाऱ्या,

त्या संस्कारांची शिदोरी घेऊन आधुनिकतेच्या प्रवाहात सहज नांदणाऱ्या.

त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर लिहिलेला असतो संघर्षाचा श्लोक आणि प्रेरणेचा अध्याय.

कर्तृत्ववान स्त्रिया म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे, त्या असतात युगनिर्माती!

त्यांचा प्रत्येक श्वास म्हणजे सर्जनाची कविता, आणि त्यांचा प्रत्येक पाऊल म्हणजे समाजाला उजळवणारी गाथा.

प्रत्येक स्त्रीने वाचलं पाहिजे असे हे सुंदर पुस्तक .नक्कीच या पुस्तकातून आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळते आपल्या आयुष्यात खंबीरपणे लढण्यासाठी !धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र ९८ मराठी निबंध रत्नाकर


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ९८

पुस्तकाचे नाव - मराठी निबंध रत्नाकर

लेखकाचे नाव - प्राची गोंधळेकर

प्रकाशन व आवृत्ती-विद्या विकास पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर

पृष्ठे संख्या– १४२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ८०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

९८||पुस्तक परिचय

मराठी निबंध रत्नाकर 

सौ. प्राची गोंधळेकर


मराठी निबंध रत्नाकर” हे एक शैक्षणिक प्रकारचं पुस्तक असून त्याची रचना विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेला गती देण्यासाठी खास केली आहे. प्राची गोंधळेकर यांनी याचे लेखक म्हणून लेखन केले असून हे विद्या विकास पब्लिशर्स प्रा. लि. द्वारा प्रकाशित आहे.

मराठी निबंध रत्नाकर हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याचा विकास साधण्यासाठी खास तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून त्यात विविध विषयांवरील सोप्या व समर्पक निबंधांचा समावेश आहे. यामध्ये जीवनविषयक, सामाजिक, पर्यावरणीय, शैक्षणिक, राष्ट्रप्रेमाशी संबंधित आणि सण-उत्सव आदी विविध प्रकारचे निबंध दिलेले आहेत.

या पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत 

भाषा अतिशय सोप्या व विद्यार्थ्यांना समजणाऱ्या पद्धतीने आहे.


निबंधांचे सामान्य मांडणी क्रम ठेवलेले आहे: प्रस्तावना – मुख्य विषय – उपसंहार.


परीक्षेसाठी उपयुक्त दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.


व्याकरणदृष्ट्या शुद्ध आणि अभ्यासू.


🎯 उपयुक्त कोणासाठी?

इयत्ता ३री ते १०वी पर्यंतचे विद्यार्थी


मराठी निबंध स्पर्धांमध्ये भाग घेणारे विद्यार्थी


शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी अभ्यास साहित्य म्हणून

मराठी निबंधाचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठीच हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकात एकूण 67 निबंधांचा समावेश केलेला आहे. लेखिकेने निबंध लिहिताना विविध विषयांचे हाताळणी केलेली दिसून येते .

यामधील ग्रंथ हेच गुरु हा वाचन प्रवासाविषयीचा निबंध मला विशेष आवडला .आपल्या वाचन साखळीचा हेतूच वाचाल तर वाचाल हा आहे .ग्रंथ हेच गुरु हा निबंध लिहिताना त्या म्हणतात,

"जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरू म्यां केला जाण । गुरूसी आले आपरपण । जग संपूर्ण गुरू दिसे ।।"


चराचरसृष्टीत गुरूत्तत्त्व ओतप्रोत भरलेले आहे असा संतांचा अनुभव. माता, पिता, शिक्षक, निसर्ग, जीवनातील चांगलेवाईट अनुभव, छोटेमोठे प्रसंग, सभोवताली वावरणाऱ्या व्यक्ती अगदी क्षुद्रातिशूद्र जीवजंतू या सर्वांपासून आम्ही सतत काही ना काही शिकत असतो. त्यामुळे ते आमचे गुरूच आहेत. आपापल्या परीने ते श्रेष्ठच आहेत. या समस्त गुरुंमध्ये मुकुटमणी, कंठमणी आणि मेरूमणी जर कोणता असेल तर तो म्हणजे ग्रंथ.


श्री समर्थांनी 'आता सद्‌गुरू वर्णवेना' अशा शब्दात गुरूस्तवनाला प्रारंभकेला आहे. ग्रंथांनाही हे वर्णन अगदी तंतोतंत लागू पडतं. विशेष म्हणजे ते एकाही गुणाची परीक्षा घेत नाहीत, एका बोटाची चापट मारत नाहीत की एका शब्दाने कोणाला दुखवीत नाहीत.


आई, वडील, शिक्षक यांना स्थलकालाच्या मर्यादा असतात. कार्यबाहुल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन सदासर्वकाळ लाभू शकत नाही. शिवाय प्रत्येकाला प्रत्येक विषयाचं ज्ञान असलेच असेही नाही. ग्रंथगुरू मात्र सर्वज्ञ. ज्ञानामृताचे अक्षयकुंभ घेऊन दिवसरात्र आपली ज्ञानतृषा शमविणारे केवळ ग्रंथ आणि ग्रंथच आहेत. थकवा, कंटाळा, विश्रांती त्यांना माहीत नाही. कवडीचीही अपेक्षा न करता ज्ञानाची भूक भागविणाऱ्या ग्रंथांच्या दातृत्वाला तोड नाही. खरं पाहिलं तर देणे आणि घेणे हे हातांचं काम. परंतु ग्रंथांजवळ घेणारे हात नाहीतच. ते अनंत हस्ताने देत राहतात, देतच राहतात.

किती सुंदर विचार त्यांनी या निबंधातून मांडलेले आहेत .असेच प्रत्येक विषयातील त्यांचे विचार हे वाचनीय आणि अनुकरणीय आहेत .प्रत्येकाने वाचलेच पाहिजे एवढं सुंदर हे पुस्तक आहे .

शब्दांचे सामर्थ्य या विषयीचं त्यांचा निबंध ही खूप सुंदर आहे .शब्दांचे महत्त्व त्या आपल्या शैलीत अतिशय सुंदर रित्या व्यक्त करतात .

शब्दसृष्टीचे ईश्वर (कवी) तर ह्या शब्दांवर बेहद्द खूश आहेत. ते शब्दांचे


'ऋणाईत' आहेत. शब्द त्यांना मातेसमान पोटाशी घेतात, प्राणप्रिय सखा होऊन धीर देतात, मार्ग दाखवितात. कवी केशवसुत 'शब्दांनो, मागुते या' अशी नम्र विनवणी करतात. तुकाराम महाराज


"आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू"


असा त्यांचा बहुमान करतात. शब्द हाच त्यांचा देव. शब्दांनीच ते त्याची पूजा बांधतात. शब्दांवर त्यांचं इतकं जीवापाड प्रेम की 'शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन' असा भाव ते प्रगट करतात. शब्दसृष्टीचा संपूर्ण डोलारा शब्दशेषाच्या फण्यावर उभा आहे. शब्दांचा महिमा कितीही सांगितला तरी संपणार आहे थोडाच ! शेवटी एवढेच म्हणता येईल.


"शब्दवर्णना शब्द तोकडे, शब्दांविण पण सांगू कसे?"

खरोखर प्रत्येक पुस्तकाविषयी भरभरून बोलताना असंच होत असतं .ते पुस्तकाचे वर्णन करताना शब्द तुकडे पडतात पण शब्दांशिवाय आपण तो परिचय सांगू शकत नाही असे सर्व काही शब्दातीत .मग वाचणार नाही पुस्तके वाचायलाच हवीत .

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा