वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-31
पुस्तकाचे नाव -साहस कथा
लेखकाचे नांव- तु.ता.सावंत
प्रकाशन व आवृत्ती- ज्योत्स्ना प्रकाशन पुणे .
पृष्ठे संख्या– ४८
किंमत /स्वागत मूल्य-- 30₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
३१||पुस्तक परिचय
साहस कथा
लेखक/ कवयित्री - तु . ता . सावंत
मुलांचं वाचनालय समृद्ध करणार असे हे साहस कथांचे हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे. आपण पाहतो बालमन हे संस्कार असतं. बालमनावर केलेले संस्कार स्मरणात राहतात म्हणूनच बालवयात मूल्य संस्कारांना खूप महत्त्व आहे. याचाच एक भाग म्हणजे मुलांना जास्तीत जास्त सहज कथा ऐकवणे. मुलांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करणे. त्यांच्यातील भीती पूर्णतः काढून टाकून आपणही काही करू शकतो असा आत्मविश्वास जागृत करणे. या पुस्तकामध्ये एकूण तीन कथा आहेत. पहिली कथा गीरच्या जंगलात दुसरी कथा गेंड्यांच्या जंगलात आणि तिसरी कथा मुले पळवणारा प्राणी. अशा या तीन कथांमधून हे पुस्तक निर्माण झालेल आहे. मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी अशा या तीन कथा आहेत. मुले वाचक वर्ग दृष्टिपथात त्यांनी ठेवून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. थोडक्या शब्दात मोठा सार कसा सांगायचा हे या कथेतून आपल्याला समजून येते.
या पुस्तकाच्या पहिल्याच कथेत म्हणजे गिरच्या जंगलात या कथेतून शेरसिंग नावाच्या माणसाचे धाडस कसे होते याची माहिती मिळते एका शेर नावाच्या रेड्यापासून आपली त्याने कशी सुटका करून घेतली याचा रोमांचकारी अनुभव या कथेत दिला आहे. त्याबरोबरच शेर सिंगला त्याच्या म्हशी कशा संरक्षण करतात याचीही माहिती या कथेत दिलेली आहे.
याच पुस्तकातील दुसरी कथा म्हणजे गेंड्यांच्या जंगलात .या कथेत वसंत आणि त्याच्या मामाची माहिती दिलेली आहे .गेंड्यांची शिकार शिकारी कशी करतात याविषयी माहिती या कथेतून अतिशय सुंदररीत्या दिलेली आहे .या कथेतील एक वाक्य खूप मार्मिक अर्थ देऊन जातं ते म्हणजे फासात अडकलेला गेंडा आता फार थकून गेला होता तो आता आपल्यापेक्षा बुद्धिमान असलेल्या माणसांचा कैदी झाला होता .अतिशय सुंदर असे हे वाक्य मनाला नक्कीच विचार करायला लावत .
या पुस्तकातली तिसरी कथा आहे मुले पळवणारा प्राणी .
या कथेमध्ये दिनकर आणि त्याच्या प्रेमळ कुत्र्याविषयी माहिती दिलेली आहे .मुले पळवणारा प्राणी गावातील कुत्री पळून नेत असतो .दिनकर मोठ्या साहसाने या मुले पळवणाऱ्या प्राण्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो .या प्रयत्नात स्वतःचा लाडका कुत्रा गमावल्यानंतर इतर कुत्र्यांची होणारी पळवा पळवी कशी होते याचे विस्तृत चित्र या पुस्तकात दिलेल आहे .शेवटी सर्व मिळून त्या प्राण्यांना मारून टाकतात हे कथा वाचल्यानंतर तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल
मुलांच्या भावविश्वाशी निगडित असे हे पुस्तक आहे .हीच मुलांच्या बालमनावर हे पुस्तक वाचल्यानंतर चांगला परिणाम होईल .तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक आणि आपल्या मुलांनाही वाचायला द्या .
सौ अंजली शशिकांत गोडसे
मर्ढे सातारा
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
