वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १००
पुस्तकाचे नाव - मन मे है विश्वास
लेखकाचे नाव - विश्वास नांगरे पाटील
प्रकाशन व आवृत्ती-राजहंस प्रकाशन पुणे
पृष्ठे संख्या– २०४
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २८०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१००||पुस्तक परिचय
मन मे है विश्वास
विश्वास नांगरे पाटील
मन में है विश्वास" हे पुस्तक महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि प्रेरणादायी आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांचे आत्मचरित्र आहे. त्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक संघर्ष, प्रेरणा, शिक्षण, आणि यशस्वीतेचा प्रवास अत्यंत थेट आणि ओघवत्या शैलीत मांडला आहे.
या पुस्तकातून ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या एका जिद्दी तरुणाने केवळ मेहनतीच्या जोरावर कशी उंच भरारी घेतली, हे वाचकांना समजते. त्यांनी UPSC परीक्षेच्या तयारीपासून ते पोलीस सेवेमधील अनुभवांपर्यंत सर्व काही मोकळेपणाने सांगितले आहे.
या आधी मी त्यांच्या कर मैदान फतेह या पुस्तकाविषयी परिचय लिहिलेला आहे .या पुस्तकाविषयी लिहिण्याचा खूप मनात होतं .आणि हे पुस्तक मला मिळालं मी ते वाचून काढले आणि त्याविषयी माझ्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला .
या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
बालपण आणि संघर्ष – कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांच्या लहानशा गावातले दिवस, वडीलांचे साधे जीवन, आईची प्रेरणा.
शिक्षणातील अडचणी – साधनसंपत्तीच्या अभावातही अखंड प्रयत्न आणि स्वतःवरचा विश्वास.
UPSC तयारी – दिल्लीतील आयएएस अकादमीचे अनुभव, अयशस्वी प्रयत्नानंतर मिळवलेले यश.
IPS प्रशिक्षण – हैदराबादमधील नॅशनल पोलिस अकादमीतील दिवस.
कार्यजीवनातील प्रसंग – नाशिक, मुंबई पोलीस दलातील जबाबदाऱ्या, 26/11 च्या घटनेतील अनुभव.
समाजकार्य आणि नेतृत्व – युवांना सकारात्मकतेकडे वळवणारे उपक्रम.
आदरणीय विश्वास नांगरे पाटील यांनी हे पुस्तक 26 /11 च्या लढाईत बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अर्पण केलेले आहे .
या पुस्तकातील सर्वात जास्त आवडलेली काही वाक्य तुमच्यासाठी मी सांगत आहे .
स्वप्न बघणं महत्त्वाचं आहे, पण ते सत्यात उतरवण्यासाठी कठोर प्रयत्न आणि चिकाटी लागते."
"मी अनेकवेळा अपयशी ठरलो, पण प्रत्येक वेळी मी पुन्हा नव्यानं उभा राहिलो. कारण मनात होता विश्वास."
"आईने शिकवलं – परिस्थिती ही आपल्या मन:स्थितीवर मात करू शकत नाही, जोवर आपण ठाम आहोत."
"माणूस मोठा पदाने होत नाही, तर तो विचारांनी आणि कृतीने मोठा होतो."
किती प्रेरणादायी वाक्य आहे ती !प्रत्येक शब्द शब्दात जिद्द चिकाटी आणि प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळते .
या पुस्तकाचे वैशिष्ट्य:
युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक प्रकाश.
कठोर परिश्रम, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा यांचे आदर्श उदाहरण.
मराठीत सहज आणि प्रभावी शैली.
आदरणीय पाटील साहेबांच्या या पुस्तकात अनेक प्रेरणादायक उतारे आहेत .पैकी काही मला आवडले पुढील प्रमाणे
झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची नाही. भिडायचं, लढायचं. जिंकलो तर उत्तम, हरलो तर भिडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.”
हा विचार आपल्याला शिकवतो की – सुरक्षित राहून काही साध्य होत नाही, लढा मांडायचा आणि अपयशातूनही शिक्षण घ्यायचं.
आकाशातून एखादा थेंब थेट हातावर पडला... तो कमळपुष्पावर पडला, तर तो मोत्यासारखा चमकतो आणि जर तो शिंपल्यात पडला, तर त्या पाण्याच्या थेंबाचाच मौल्यवान मोती होतो... पण त्याचं अस्तित्व, लायकी व किंमत तो कोणाच्या संपर्कात येतो, यावर अवलंबून असतं.”
हे रूपक आत्मविश्वास आणि बदलाच्या वातावरणातील प्रभाव दर्शवतं – आपण कुठे आणि कोणासोबत आहोत, त्या माध्यमातून आपली किम्मत आकार घेत जाते.
खरोखर प्रत्येक शब्द हा एक नवी प्रेरणा आहे .प्रत्येकाने वाचाव आणि एक नवीन प्रेरणादायी असे हे सुंदर पुस्तक .
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment