Saturday, October 31, 2020
Friday, October 30, 2020
Quotes
फुल बिखरे हैं चारो तरफ
निगाहों से मेहसूस कर लो
काँटो को बेदखल करके
चुभने का मौका ही ना आने दो I
--अंश--
Thursday, October 29, 2020
Motivational quotes
पोर्णिमेचा चंद्र
आपल्याला सुपर मून वाटतो
पण त्यालाही
कलेकलेने वाढत जाऊन
कलेकलेने कमी व्हावं लागतं .
--अंश--
Wednesday, October 28, 2020
Quotes
Tuesday, October 27, 2020
Monday, October 26, 2020
Motivational quotes
तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर
झाडासारखे व्हा
कितीही मोठे झालो तरी
आपल्या मातीत पाय रोवून रहा .
--अंश--
Sunday, October 25, 2020
Inspirational quotes
कुछ ऐसा कर जाते है
जो जख्मी हुए है अपने हालात
और दुनिया की बेवफाई से
उनके लिए
आओ मरहम बन जाते हैं |
-- अंश--
Friday, October 23, 2020
नवरात्र रंग विशेष
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग जांभळा संयम राखतो
मनामनातील भेद मिटवतो
राग शांतता यांच्यामध्ये
घालतो अजब मिलाफ
रक्षण कर आमचे माते आता
आई जगदंबा तूच तारणहार आम्हा भक्ता
-- अंश--
नवरात्र पुष्प आठवे रंग मोरपंखी
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग मोरपंखी मनमोराचा
नाचुनी आनंदुनी बागडण्याचा
मनमोहक निसर्गाला भुलूनी
भावभक्तीने मन ये भरुनी
मनोभावे पूजा करूया
आई जगदंबेला शरण जाऊया
--अंश--
Thursday, October 22, 2020
नवरात्र रंग विशेष
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग हिरवा नेसुनी धरती
समृध्दिचे गीत नवे गाती
नववधूच्या साजशृंगाराचा
हिरवा चुडा हाती सौभाग्याचा
शालू हिरवा मळवट भरूनी
आई जगदंबा माझी वरदायिनी
--अंश--
Wednesday, October 21, 2020
नवरात्र रंग विशेष
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग पिवळा नव्या दिशेचा
अंधारातील नवीन आशेचा
लख लख होऊ वैभवशाली
आरोग्याची हळद लावू गाली
श्रद्धापूर्वक करूया भक्ती
आई जगदंबा माझी शक्ती🙏🏻🚩
--अंश--
Monday, October 19, 2020
नवरात्र रंग विशेष
नवदुर्गेची नऊ रूपे
रंग निळा अथांगतेचा
ठाव न लागे प्रेमाचा
निळी निळाई अवकाशाची
कायम मनी ठसवायाची
पांघरून निळी नवलाई
कृपा राहू दे जगदंबा आई🙏🏻🚩
--अंश--
नवरात्र रंग विशेष
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग लाल ऊर्जा देतो
शक्ति आणि उत्साह देऊन
सौंदर्य आणि बल वाढवतो
लाल वस्त्र लेऊनी सूर्य आराधना
माता जगदंबा करी पूरी मनोकामना
--अंश--
Sunday, October 18, 2020
नवरात्र रंग विशेष
Saturday, October 17, 2020
नवरात्र रंग विशेष
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग केशरी यशदायी ठरतो
प्रसिद्धीच्या वाटा दाखवून
तेजोवलय निर्माण करतो
मुबलकता देतो सर्वत्र
आई जगदंबेचे डोईवरी राहो छत्र
--अंश--
Friday, October 16, 2020
नवरात्र रंग विशेष
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग राखाडी महत्त्व सांगतो
उगाच देता कोणी त्रास
क्षणार्धात भस्म होऊनी होईल राख
जगदंबेची महिमा आपण सर्व जाणतो
राखाडी रंग दुर्गुणांचा विनाश दाखवतो .
-- अंश--
Thursday, October 15, 2020
Motivational quotes
आयुष्य एक रंगमंच
वेळ बदलेल तशा भूमिका बदलायच्या
आणि आयुष्याचं व्यासपीठ
कायम हसतखेळत ठेवायचं.
-- अंश--
Wednesday, October 14, 2020
वाचन प्रेरणा दिन
पुस्तक वाचन छंद आहे
शब्दांचा शब्दांची बंध आहे
यशस्वी जीवनाचा गंध आहे
संस्कृतीचा अमूल्य मर्म बंध आहे.
-- अंश--
वाचत राहा .🌹🌹
Tuesday, October 13, 2020
Monday, October 12, 2020
Quotes
मरण स्वस्त झाले असताना
मनाचे स्वास्थ्य चांगले ठेवा
तरच जीवनाची किंमत वाढून
आयुष्य मौल्यवान बनेल .
--अंश--
Sunday, October 11, 2020
Saturday, October 10, 2020
Motivational quotes
![]() |
| Add caption |
आपले संस्कार
आपले विचार घडवतात
आपले विचार
आपले आचार ठरवतात
आपले आचार
आपले व्यक्तिमत्व खुलवतात.
--अंश--
Friday, October 9, 2020
Thursday, October 8, 2020
Letter writing हरवलेले पत्र
*हरवलेले पत्र* 📧
पत्र हरवलय माझं
शोधून कोणी देईल का
शब्दांमागची ती भावना
डोळ्यांनी टिपता येईल का
आदरयुक्त शब्दांची सुरुवात
आधुनिक Sms मध्ये मिळेल का
Hi Hello च्या जमान्यात
प्रिय तीर्थरूप यांना जागा मिळेल का
अक्षर अक्षरांची खूणगाठ
कागदावरती पडेल का
शब्द रेखाटताना त्यावर
अश्रू हळूवार टिपकेल का
सुखदुःखाची सांगड घालताना
भावना मनीची जुळेल का
आधुनिक या तंत्रज्ञानाला
स्पर्शाची भावना कळेल का
जपून ठेवलेल्या शब्दांना
मेमरी मध्ये जागा मिळेल का
आठवणींबरोबर पुन्हा वाचताना
स्मृतिगंध ई-मेल मध्ये विरेल का
आतुरतेने पत्राची वाट पाहतानाची
दृष्टी इनबॉक्सला लाभेल का
पोस्टमन आल्यानंतरची लगबग
खणखणणाऱ्या मोबाईलला समजेल का
✍🏻🚩✉️💌
*सौ.अंजली शशिकांत गोडसे शिर्के*
*मर्ढे सातारा*
Wednesday, October 7, 2020
Friendship Quotes
मित्राची श्रीमंती पाहून
गर्वाने म्हणा तो माझा मित्र
मित्राच्या दुःखाच्या प्रसंगात
अभिमानाने म्हणा मी त्याचा मित्र .
--अंश--
Tuesday, October 6, 2020
Motivational quotes
नकारात्मक विचारांचे सावट जरी असले
सकारात्मक विचारांनी सावरायला हवं
दाटलेल्या अंधारावर मात करून
लखलखत्या तेजाकडे धावायला हवं.
--अंश--
Monday, October 5, 2020
Motivational quotes
स्वतःला ताऱ्यांसारखे
नाही होता आले तरी
नाराज होऊ नका
दीपस्तंभ होऊन
इतरांना सन्मार्ग दाखवत राहा .
--अंश--
Sunday, October 4, 2020
Motivational quotes
जिंदगी हैं एक खिलौना
जहाँ धूप छाँव का खेल हैं
जो जितता हैं अपनी बाजी
उसमे हँसने रोने का मेल हैं l
--अंश--
Saturday, October 3, 2020
Friday, October 2, 2020
Quotes
सगळे जग विरोधात पेटले तरी
आपण मात्र शांत रहायचं
कारण राख त्यांची होणार
आणि सुरुवात आपली होणार.
--अंश--
Thursday, October 1, 2020
Subscribe to:
Comments (Atom)






























