Monday, November 30, 2020

Quotes

Anjali godase

 


नात्यांनी गुंफलेलं
हृदयाने जपलेलं
संस्कृतीने भरलेलं
माणुसकीने तरलेलं
गल्लीबोळात वसलेलं
संकटात धावलेलं
सणसमारंभात नाचलेलं
डोंगरदरीत फिरलेलं
बालपण खेळलेलं
शेणा मातीत मुरलेलं
डावपेचांनी शिकलेलं
नसानसात भिनलेलं
कुठे जरी असलो तरी
काळजावर कोरलेलं
गाव ते गाव असतं
--अंश--

Sunday, November 29, 2020

Motivational quotes


 

इक पल जो हाथ से छूट गया
वो कभी ना वापस आ पाया
हर पल कट रही है जिंदगी
पलभर के लिए तो थोडा जिना सिख लो I
           --अंश--

Saturday, November 28, 2020

Motivational quotes


 

आयुष्याच्या रणात
जिंकायच असेल तर
तन आणि मन
दोन्हीही जिंदादिल हवं .
       -- अंश--

Friday, November 27, 2020

Motivational quotes


 


माणसं जन्माला येतात
माणुसकी निर्माण करावी लागते
नाती जन्मताचं मिळतात
आपुलकी निर्माण व्हावी लागते .
        --अंश--


Wednesday, November 25, 2020

Motivational quotes


 


चंद्रमा की तरह जनाब
रूख मोड लो अपने जिंदगी का
अगर आए कभी आमावस की रात
तो चंद्रमा की कला जैसे बढ़ना भी सिखो I
            --अंश--

Tuesday, November 24, 2020

Motivational quotes



Anjali godase

 

जिंदगी खुबसुरत है
अपने नजरों को बदल के देखो
जिंदगी के तजुरबे बुरे है
अपने वक्त को बदलना सिखो l
        --अंश --

Monday, November 23, 2020

Motivational quotes


 


स्वतःला आकार देताना
नको असलेल्या भागावर
जास्त घाव घालावेत
म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व
खुलून दिसते .
        --अंश--

Sunday, November 22, 2020

Quotes

Anjali godase

 



माहेरहून परतताना
मन माघारी धावतं
सासरच्या ओढीने
पून्हा वाटेला लागतं
मनाला मारायचं आणि
मनाला जगवायचं
हे फक्त तुलाच जमतं
      --अंश--

Saturday, November 21, 2020

Motivational quotes


 


महानता आपल्या
 कामातून दाखवावी
 कारण दाम असल्यावर
 कोणालाही जनता राम राम करतेच.
         --  अंश--

Friday, November 20, 2020

Inspirational quotes

Anjali godase

 


अशी विणावी प्रत्येकाने
नात्यांची आपल्या घट्टवीण
आठव येता स्मृतीगंधाची
निघून जावा क्षणभराचा शीण
            --अंश--

Thursday, November 19, 2020

Motivational quotes

Anjali godase


आपण किती जणांना आवडत नाही
यापेक्षा आपण किती जणांना आवडतो 

याचा विचार करावा भलेही ती

संख्या कमी असली तरी चालेल
नावडतेपेक्षा आवडते चांगले .
            --अंश--

Wednesday, November 18, 2020

Quotes

Anjali godase

 


चुकतो तो माणूस असतो
पण मोठ्यांच्या चुका
दाखवायच्या नसतात
आणि छोट्यांच्या चुका
लपवायच्या नसतात
हा विधिलिखित नियम आहे.
--अंश--

Tuesday, November 17, 2020

Quotes

Anjali godase

 


मनासारखं फक्त
 स्वप्नात जगता येतं
आणि आपलं दुर्देव
स्वप्नाचं आयुष्यचं
क्षणभंगूर असतं .
--अंश--

Monday, November 16, 2020

Quotes


 

मंजिल का तो पता नहीं पर
रास्ते तो ढूंढे है हमने
जो सच्चाई और नेकी पर चलते है
मंजिल तो लाजवाब होगी हमारी |
    --  अंश--

Sunday, November 15, 2020

बलिप्रतिपदा आणि भाऊबीज


 

जन्मभर देतो अन्न 

आहे सर्वांचा अन्नदाता

सुखी ठेव देवराया

बळीचं आमचा पोषणकर्ता


जन्मजन्मांतरीचे नाते

भावा आणि बहिणीचे

हसता खेळता दोघांनी

हदयी जपून ठेवायचे


सौभाग्याचे अखंड वरदान

पतीपत्नी एकाच प्रेमाचे पान

रेशीमबंध हे सात जन्माचे

प्रेमधाग्यांनी गुंफत जायाचे .


दीपावली पाडवा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा🎉🎉

Saturday, November 14, 2020

एक दिवा


 


 एक दिवा हातातील दातृत्वासाठी
एक दिवा निसर्गाच्या मातृत्वासाठीएक
एक दिवा आभाळासारख्या पितृत्वासाठी
एक दिवा अंधारातील प्रकाशवाटेसाठी
एक दिवा तुमच्या आमच्यासाठी
उजळून लख्ख करण्या दाही दिशा
उज्वल आपल्या तेजस्वी भविष्यासाठी
--अंश--

Friday, November 13, 2020

लक्ष्मीपूजन


 


विद्या हेच ऐश्वर्य
ज्ञान हिच संपत्ती
गोड वाणीचे माधुर्य
दातृत्वाची किर्ती
माणुसकीचा दिवा
प्रयत्नांचे तेल
स्नेहाची वात
यशाचा प्रकाश
दाहीदिशी पसरत जावा
घरातल्या लक्ष्मीला
 पहिला मान दयावा
हाच लक्ष्मीपूजनाचा संकल्प नवा🎊🏮
 --अंश--

Thursday, November 12, 2020

धनत्रयोदशी

Anjali godase

 

सुविचारांचे धन
आरोग्यदायी तन
समाधानी मन
आयुर्वेदाचे कण
हेच धनत्रयोदशीचे पूजन
सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🎉🎇🎆🎊
      अंश

Wednesday, November 11, 2020

वसुबारस

Anjali godase

 

वसुबारस
दिवा लावू चैतन्याचा
दिवा लावू नवविचारांचा
दिवस हा सोनियाचा
गाई-गुरांच्या कृतज्ञेचा
पूजन करू वसुबारसेचे
दान मागू आरोग्याचे
पुरण वरणाचा नैवेदय देवू
गोमातेच्या चरणी लीन होवू .
--अंश--

Tuesday, November 10, 2020

Motivational quotes


 

दिवस हे चांदण्यांचे

सर्द गुलाबी थंडीचे

मायेच्या आपल्या ऊबेने

माणुसकीला जपायचे .

 -- अंश--

Monday, November 9, 2020

Motivational quotes


 


आपली निंदा होतेय

म्हणून डगमगून जाऊ नका

निंदा हे आपला प्रभाव

आणि प्रभावक्षेत्र वाढल्याचे प्रतिक आहे .

      -- अंश--

Sunday, November 8, 2020

Quotes


Anjali godase

 

 

जगण्यातला साधेपणा आणि
विचारातला मोठेपणा
आपल व्यक्तिमत्व अधिक 
खुलवतो .
--अंश--


Saturday, November 7, 2020

Motivational quotes

Anjali godase

 


एखादयाला वाट दाखवणं
किंवा
एखादयाची वाट लावणं
हे माणूस कोणत्या वाटेनं चालला आहे
याचं उत्तम लक्षण आहे .
       --अंश--


Friday, November 6, 2020

Quotes

Anjali godase

 


क्या खो गया हमारा
और क्या था हमारा
खाली हाथ आए है
और खाली हाथ ही जाएँगे I
      -- अंश--


Thursday, November 5, 2020

Motivational quotes

Anjali godase

 



जिंदगी सिखाती हैं
तुम चलते रहना
आये कितने भी तुफान
तुम हौसला मत हारना I
       --अंश--


Wednesday, November 4, 2020

Motivational quotes

Anjali godase

 

तिमिर आणि तेजाचा
चालत राहतो लपंडाव
खेळून आपला यातही डाव
उज्वल आयुष्याचा घेऊया  ठाव
         🌹 अंश🌹


Tuesday, November 3, 2020

Motivational quotes

Anjali godase

 

घर असो की झोपडी
प्रेमाचा सहवास असावा
थोडक्या पैशातही मिळतो मग
आनंदमयी सुखाचा विसावा
        🌹 अंश🌹


Monday, November 2, 2020

Motivational quotes


 


प्रतिकुलतेत अनुकूलता शोधणारी
मनात हवी इच्छाशक्ती
निसर्गही देतो भरभरून
त्यासाठी करावी मनप्रीत भक्ती🌳🌷
      अंश☘️🌹

Sunday, November 1, 2020

Motivational quotes


सुर्यास्त
अस्त जरी झाला तरी
पुन्हा उदयाची आशा आहे
काळोख भेदून  नैराश्याचा
प्रभातीची नवी उषा आहे .
     
         अंश🌹