Sunday, November 27, 2022

महात्मा फुले यांची माहिती


 महात्मा

जोतीराव गोविंदराव फुले

टोपणनाव: जोतिबा, ज्योतीबा.

जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७

कटगुण , सातारा, महाराष्ट्र

मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०

पुणे , महाराष्ट्र

प्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वडील: गोविंदराव फुले

आई: चिमणाबाई गोविंदराव फुले

पत्नी नाव: सावित्रीबाई फुले

अपत्ये: यशवंतबालपण आणि शिक्षण

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील

कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा

जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या

वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे

गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते

फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ

झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर

तालुक्यातील खानवडी येथे आला..

तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.

खानवडी येथे फुले व होले

आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ

त्यांनी भाजी विक्रीचा

व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक

शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन

हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा

वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले

यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना

केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून

होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व

गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची

मुक्तता करणे व त्यांना हक्काची

जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय

होते. 'सर्वसाक्षी जगत्पती ।

त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे

घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने

गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक

न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची

मागणी केली. या समाजातर्फे

पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.

मराठीत मंगलाष्टके रचली.

समाजातील विषमता नष्ट करणे व

तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे

सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या

कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या

खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

“ विद्येविना मती

गेली। मतीविना

नीती

गेली।

नीतीविना

गती गेली।

गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ

एका अविद्येने केले।। ”

जोतीरावांनी त्यांच्या पत्नी

सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास

प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ

झालेली भारतातील पहिली

महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे

स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे

महात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे

शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या

विचारवंताच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष

प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि

समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ

होत असत. ही सामाजिक परिस्थिती

सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे

आपल्या पत्नी सावित्रीबाईंना १८४८

साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील

भिडे यांच्या वाड्यात पहिली

मुलींची शाळा काढून

तेथील शिक्षिकेची

जबाबदारी सावित्रीबाईंवर

सोपविली. महाराष्ट्रातील

स्त्री शिक्षणाची ही

मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य

मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत

१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या

कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण

जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज

सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी

व व्यापक करण्यासाठी १८७३ साली

त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची

स्थापना केली. ‘कोणताही धर्म

ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व

जातिभेद ही निर्मिती

मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र

या विश्वाची निर्मिती

करणारी कोणती तरी

शक्ती आहे अशी

त्यांची (अस्तिक्यवादी)

विचारसरणी होती. मानवाने

गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी

लिहिलेल्या ‘शेतकर्याचा असूड’ या पुस्तकातून

महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक

दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद

केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा

क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे

दर्शन होते. ‘नीती हाच

मानवी जीवनाचा आधार आहे’ हा

विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक

व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतातसाहित्य आणि लेखन

' सार्वजनिक सत्यधर्म ' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण

ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून

' दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.

तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या

धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड'

रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला

'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील

कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित

केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा

अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा

ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.सन्माननीय

उपाधी

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल

घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही

उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले

हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

नाव साहित्यप्रकार लेखनकाळ

इशारा लेखसंग्रह इ.स. १८८५

गुलामगिरी लेखसंग्रह इ.स. १८७३

तृतीय

रत्न नाटक इ.स. १८५५

ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह इ.स. १८६९

राजे

छत्रपती

शिवाजी

राजे भोसले यांचा

पोवाडा

पोवाडा इ.स. १८६९

शेतकर्यांचा असूड लेखसंग्रह -

Align="Center"

सार्वजनिक

सत्यधर्म लेखसंग्रह इ.स. १८८९जीवनपट

इ.स. १८२७ - जन्म कटगुण , सातारा जिल्हा

इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत

शिक्षण झाले.

इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये

इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व

इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या ' राईट ऑफ मॅन ' या ग्रंथाचा

अभ्यास.

इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या

मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून

अपमान झाला.

इ.स. १८४८ - भारतातील

मुलींची पहिली शाळा सुरू

केली. बहुजन समाजाच्या

शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत

मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची

स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत

अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू

केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी

यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश

सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

इ.स. १८५३ - ' दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द

एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स ' स्थापन

केली.

इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ

शिक्षकाची नोकरी

इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात

केली.

इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा

प्रयत्न झाला.

इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून

निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची

स्थापना केली .

इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप

घडवून आणला.

इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील

हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना

केली.

इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध

खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर ).

इ.स. १८७५- स्वामी दयानंद

सरस्वतींची पुण्यात मिरवणूक

काढण्यास साहाय्य केले.

इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध

केला.

इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना

'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या

कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन

दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत

देण्याची मागणी केली.

इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन

मंगलाष्टकांची व नवीन

पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय

विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट

आणि सत्कार.

इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा

येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून

'महात्मा' ही पदवी प्रदान

केली.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर

प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे

ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव

फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व

स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा

कृतीशील क्रांतिकारकाचा होता.

महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून

जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते

थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक

म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते

सामान्यांतील असले तरी विचाराने व

कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध

ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व

समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन

करता येईल. महाराष्ट्रातील

सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक

होते.जय ज्योती जय क्रांती🙏🙏

Friday, November 25, 2022

स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा 2022 -23


 स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतील मुले आणि मुली यांचे वजनगट

Sunday, November 13, 2022

बालदिन विशेष माहिती


 

आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू
 लहान मुलांचे लाडके चाचा


पंडित नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे अतिशय सधन, सुसंस्कृत घराण्यात झाला. त्यांचे वडिल मोतीलाल नेहरू तर आईचे नाव स्वरूपराणी होय.

मोतीलाल नेहरू हे श्रेष्ठ दर्जाचे वकील होते. त्यांचे घराणे काश्मिरी पंडितांचे होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. ब्रिटनमधील हैरो येथे शिक्षणसाठी गेले.
बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात परत आले व त्यांचा 1916 मध्ये काश्मिरी ब्राम्हण कुटूंबातील कमलाशी विवाह झाला.
1912 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टरची पदवी घेऊन भारतात आले व अलाहाबाद येथे वकिली सुरू केली पण लवकरच ते राजकारणात आले.

त्यांचा महात्मा गांधी यांच्याशी जास्त सहवास आल्यामुळे गांधीचे विचार त्यांना पटू लागले. तेंव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधीजींना आपले गुरू करून घेतले.
1920 ची असहकार चळवळ, 1930 ची सविनय कायदेभंगाची चळवळ यात पं. जवाहरलाल नेहरूंनी सक्रीय सहभाग नोंदविला. 1923 मध्ये त्यांनी भारतीय जनतेला सांगितले.
कपडे वापरू नका.’ याबाबत विदेशी कापडाच्या दुकानासमोर धरणे धरले तेंव्हा त्यांना ब्रिटीशांनी अटक केली. या कारणाबद्दल त्यांना कारावासही भोगावा लागला.

भारतीय राजकारणावर 1920 नंतरच्या काळात महात्मा गांधिजींचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असतानाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक वलय, वेगळे स्थान निर्माण केले. पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडायची.
मुलांसाठी ते फक्त चाचा नेहरू होत. आजचे बालक हे उद्याचे नागरिक आहेत, पालक आहेत. म्हणून त्यांच्याकडे खूप आशावादी नजरेने ते पहायचे.
त्यांना या वयातच चांगले संस्कार कसे देता येतील याचाच विचार करायचे. कारण आजच्या बालकावरच उद्याचे भवितव्य अवलंबून आहे.
म्हणूनच चाचा नेहरू हे नेहमी लहान मुलांसोबत निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेतांना दिसायचे. चाचा नेहरू हे फक्त भारत देशातील बालकांवरच प्रेम करत नव्हते तर परदेशातील बालकांवरही प्रेम करायचे.
चाचा नेहरूंना गुलाबाचे फुल फार आवडायचे. पंडित जवाहरलाल नेहरू 1955 मध्ये रशियाला गेले होते. त्या ठिकाणचा एक छोटा बालक चाचा नेहरूंना गुलाबाचे फुल देण्याचा प्रयत्न करत होता.
पंडित नेहरू हे उंचावर असल्यामुळे तो बालक त्यांना फुल देऊ शकत नव्हता. तेंव्हा तो पडल्याबरोबर चाचा नेहरू खाली उतरले व त्या बालकाजवळचे गुलाबाचे फुल घेतले व त्यालाही उचलून घेतले व म्हणाले, “बाळ मी मोठा नाही, उद्याचे जग पाहणार आणि त्यात वावरणारा तूच माझ्यापेक्षा मोठा आहेस.”
आणि त्याला आपल्या दोन्ही हातांनी उंच उचलून म्हंटले, ” पहा रे मुलांनो, आता कोण मोठा आहे”. त्यावेळी तेथील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात चाचा नेहरू व त्या मुलांवर गुलाबांच्या फुलांचा वर्षाव केला.
पंडित जवाहरलाल नेहरू जपानला गेले तेंव्हा त्यांना एका छोट्या मुलाने विचारले, “चाचा नेहरूजी हत्ती कसा दिसतो?” त्यावर नेहरूनी जपानला खराखूरा हत्ती भेट म्हणून पाठविला. यावरून त्यांचे बालकावरचे प्रेम किती होते? याची जाणीव होते.
1954 मध्ये भारत आणि चीन यांच्यात करार होऊन पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला. जगातील सार्वभौम राष्ट्रांनी परस्परांशी कशा प्रकारे सन्मानपूर्वक व्यवहार करावा यासंबंधी मार्गदर्शन करणारी तत्त्वे म्हणजे पंचशील तत्त्वे होत.

दोन देशात जो करार झाला. त्यात भारतातर्फे पंडित जवाहरलाल नेहरू व चीनतर्फे चो. एन. लाय. यांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला. ही तत्त्वे परस्परांच्या क्षेत्रीय अखंडतेचा व राजकीय स्वातंत्र्याचा सन्मान करते.
परस्परांवर आक्रमन करने, अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप न करणे. राष्ट्रीय समानता व परपस्परांचे हीत जोपासते व शांततामय सहजीवन व आर्थिक सहकार्य या तत्वांचा स्विकार करते याप्रमाणे ही पंचशील तत्वे सर्व राष्ट्रांनी आत्मसात करावी, यासाठी नेहरूंनी प्रयत्न केले.
दोन राष्ट्रांत समानता, शांतता, एकात्मता निर्माण करण्यासाठी ही तत्वे मार्गदर्शन करतात. पण 1962 मध्ये चीननेच भारतावर आक्रमण केले आणि ही तत्वे फोल ठरली.

भारतीय समाजाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना समाजात बेकारी, दारिद्र्य, उपासमार, गुलामगिरी इ. समस्या मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असलेल्या दिसून आल्या.
तेंव्हा या समस्या सोडवायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे समाजवाद होय. हे नेहरूनी शोधले. नेहरूंचा समाजवाद होता. दारिद्र संपवून जनतेला समृद्ध जीवन जगता यावे हे त्यांच्या समाजवादाचा मुख्य उद्देश होता.
31 ऑक्टोबर 1940 रोजी भारतावर युध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली.

डिसेंबर 1941 मध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली. 7 ऑगस्ट 1942 रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प सोडला.

8 ऑगस्ट 1942 रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली. ही त्यांची सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती. एकूण 9 वेळा त्यांना तुरुंगवास घडला.
जानेवारी 1945 मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या आयएनएचे अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला. मार्च 1946 मध्ये त्यांनी दक्षिण-पूर्व आशियाचा दौरा केला. 6 जुलै 1946 रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि 1951 ते 1954 पर्यंत आणखी तीन वेळा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.
समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची जोपासना करणारा भारत निर्माण करणे, हे नेहरूंचे स्वप्न होते. ब्रिटनमध्ये वास्तव्य करत असतानाच ते समाजवादाकडे आकर्षित झाले होते. त्यामुळे त्यांनी समाजवादाचा पुरस्कार केला.

1942 च्या स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी कॉंग्रेसने, ‘ब्रिटीशांनो चालते व्हा असा ठराव संमत करून घेतला. 8 ऑगस्ट 1942 च्या कॉंग्रेसच्या ठरावात महात्मा गांधीनी जनतेला ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.
तसेच ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ असे निक्षून सांगितले. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटीशांना ‘छोडो भारत’ हा संदेश दिला. त्यावेळी या संदेशामुळे भारत देशातील सर्वच प्रांतातून जनता सर्व ताकतीने स्वातंत्र्यलढ्यास तयार झाली.

तसेच ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ असे निक्षून सांगितले. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटीशांना ‘छोडो भारत’ हा संदेश दिला. त्यावेळी या संदेशामुळे भारत देशातील सर्वच प्रांतातून जनता सर्व ताकतीने स्वातंत्र्यलढ्यास तयार झाली.
यात पंडित नेहरूंनी प्रमुख भुमिका बजावल्यामुळे ब्रिटीशांनी त्यांना पकडून अहमदनगरच्या कारावासात बंदिस्त केले. सर्वच प्रांतातून ब्रिटीशांना होत असलेला विरोध पाहून 3 जून 1947 ला लॉर्ड माऊंटबेटन यांनी फाळणीची ऐतिहासिक योजना सादर केली
तेंव्हा जुलै 1947 मध्ये ब्रिटीश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला. त्यानुसार भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 1947 हा दिवस ठरला. आणि अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाले. व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळाला
अशा प्रकारे नेहरूंनी आपल्या विचारातून जगाला शांतीच्या मार्गाने जाण्यास सांगितले म्हणूनच त्यांना ‘शांतीदूत’ असे संबोधले जाते.

वंशवाद, साम्राज्यवादाला विरोध दर्शवून जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अलिप्तवादी धोरणांचा अवलंब करावा हे सर्वांना सांगितले. म्हणूनच त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असेही म्हटले जाते.