१)वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.
२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे(शिर्के)
३} पुस्तक क्रमांक :-१३
४} पुस्तकाचे नाव :- शिकणे आमचे गमतीचे
५)एकूण पृष्ठ संख्या :- २६
६) मूल्य :- अमूल्य
पुस्तक परीक्षण
*शिकणे आमचे गमतीचे* ✒️📚
*मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग* पुस्तकाचे प्रकाशन सोहळा दिनांक 29 मार्च 2023 रोजी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह सातारा येथे विधान परिषदेचे आमदार तथा माजी मंत्री मा.महादेव जानकार, सातारा जिल्हाधिकारी मा.रूचेश जयवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. महादेव घुले, महिला व बालकल्याण विकास अधिकारी मा. रोहिणी ढवळे, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक मा. धनंजय चोपडे यांच्या हस्ते व जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
शिकणे आमची गमतीचे हे पुस्तक हातात पडलं आणि त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि नाव मनाला स्पर्श करून गेलं.
*शिकणे आमचे गमतीचे* या पुस्तकाच्या नावावरूनच गंमत जंमत हसत खेळत शिक्षण म्हणजे काय असतं हे आपण पाहणार आहोत .
प्रत्येक बालकाच्या विकासात *तीन क* महत्वाचे असतात त्यापैकी एक
*पालक ,*
*बालक ,*
*शिक्षक*
या तिन्हींचा समन्वय योग्य साधला की बालकाचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते. यापैकीच सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपले पालक या पालकांनी आपल्या मुलांकडून करावयाचे काही उपक्रम या पुस्तकात दिलेले आहेत घरच्या घरी आपण हे उपक्रम पूर्व प्राथमिक गट ते इयत्ता पाचवीच्या मुलांकडून करून घेणार आहोत .या पुस्तकातील उपक्रम भाषा व गणित या दोन विषयांसाठी आहेत. ग्यानप्रकाश फाउंडेशन, महाराष्ट्र शासन, एडगिव्ह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकाचे संपादन करण्यात आलेल आहे . पुस्तकांपेक्षा त्यातील उपक्रमांचे मूल्य खरं तर अधिक आहे.
पालक आणि त्यांचे पाल्य यांच्यातील सुसंवाद वाढीला मार्गदर्शक ठरणार असे हे पुस्तक आहे. मुलांसोबत गप्पा मारण्याची त्यांची मते जाणून घेण्याची त्यांच्यासोबत छोटे छोटे उपक्रम करून पालक आणि मुलं दोघांनाही आनंद मिळून त्यातून ज्ञान मिळणार असे हे पुस्तक आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत निपुण भारत अभियानाद्वारे तीन ते नऊ वयोगटातील मुलांना पायाभूत वाचन आणि संख्याज्ञान प्राप्त होण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. आपण सर्व एकत्रित यामध्ये योगदान देऊ शकतो यासाठी हे सर्व भागीदार नेमके काय करू शकतात याचा विचार या पुस्तिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
या पुस्तिकेत पालक मुलांसोबत घरी घेऊ शकतील अशा उपक्रमांचा समावेश आहे .यामध्ये इयत्तेनुसार भाषा आणि गणित या विषयांचे नमुना दाखल द उपक्रम देण्यात आलेले आहेत . हे उपक्रम पालकांनी आपल्या घरी आपल्या पाल्यासोबत सोडवायचे आहेत.
ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या आपल्या मुलांविषयी ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षापूर्तीसाठी विविध उपक्रम या पुस्तिकेत दिलेले आहेत ग्रामपंचायत ,शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांनी नक्की मुलांच्या विकासासाठी कोणकोणते उपक्रम घ्यायचे याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. सर्व मुलांना पथदर्शक अशी उपक्रम या पुस्तिकेत दिलेले आहेत तरी सर्व शिक्षक ,पालक ,विद्यार्थी यांनी या पुस्तकाचा आस्वाद घ्यावा.
पुस्तकाचे शेवटी एक पान कोरं ठेवलेलं आहे. त्या पानावर तुम्हाला सुचलेले उपक्रम लिहायचे आहेत.कधी कधी काही पालक, शिक्षक आपल्या मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतात. असे वेगळे ,नवनवीन उपक्रम सर्वांना माहित होण्यासाठी त्या कोऱ्या पानावर आपल्याला उपक्रम लिहायचे आहेत. तेव्हा हे पुस्तक हातात पडल्यानंतर नक्की आपल्या मुलांकडून हे सगळे उपक्रम करून घ्या .अतिशय सुंदर मांडणीचं हे पुस्तक नक्की सर्वांना आवडेल. धन्यवाद.
©️✒️
सौ.अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)
मर्ढे तालुका सातारा




