Friday, October 22, 2021
Tuesday, October 19, 2021
Monday, October 18, 2021
चंद्र
चंद्र कोजागिरीचा
का
चंद्र ईदचा
नाही भेदभाव निसर्गाचा
भेदभाव सारा मानवी मनाचा
करू संकल्प एकतेचा
हाच संदेश पौर्णिमेचा
--अंश--
Thursday, October 14, 2021
नवरात्र पुष्प नववे रंग जांभळा
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग जांभळा संयम राखतो
मनामनातील भेद मिटवतो
राग शांतता यांच्यामध्ये
घालतो अजब मिलाफ
रक्षण कर आमचे माते आता
आई जगदंबा तूच तारणहार आम्हा भक्ता
-- अंश--
Wednesday, October 13, 2021
नवरात्र पुष्प नववे रंग गुलाबी
नव दुर्गेची नऊ रूपे
रंग गुलाबी प्रेमाचा
माणुसकीचा ओलावा जपण्याचा
मनामनात प्रीत फुलवूनी
विविधतेत एकात्मता साधण्याचा
हात हाती सारे घेऊया
माता महागौरीला शरण जाऊया
-- अंश--
Tuesday, October 12, 2021
नवरात्र पुष्प तिसरे रंग निळा
नवदुर्गेची नऊ रूपे
रंग निळा अथांगतेचा
ठाव न लागे प्रेमाचा
निळी निळाई अवकाशाची
कायम मनी ठसवायाची
पांघरून निळी नवलाई
कृपा राहू दे जगदंबा आई🙏🏻🚩
--अंश--
Monday, October 11, 2021
नवरात्र पुष्प दुसरे रंग लाल
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग लाल ऊर्जा देतो
शक्ति आणि उत्साह देऊन
सौंदर्य आणि बल वाढवतो
लाल वस्त्र लेऊनी सूर्य आराधना
माता जगदंबा करी पूरी मनोकामना
--अंश--
Sunday, October 10, 2021
नवरात्र पुष्प पहिले रंग पांढरा
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग पांढरा शुद्धता राखतो
मन , आत्मा निर्मळ करून
शांतीचा मार्ग दाखवतो
विश्वास ठेवू मनी धरू धैर्य
आई जगदंबा जीवना देते स्थैर्य
--अंश--
नवरात्र पुष्प सातवे रंग केशरी
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग केशरी यशदायी ठरतो
प्रसिद्धीच्या वाटा दाखवून
तेजोवलय निर्माण करतो
मुबलकता देतो सर्वत्र
आई जगदंबेचे डोईवरी राहो छत्र
--अंश--
Friday, October 8, 2021
Thursday, October 7, 2021
नवरात्र पुष्प पाचवे रंग हिरवा
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग हिरवा नेसुनी धरती
समृध्दिचे गीत नवे गाती
नववधूच्या साजशृंगाराचा
हिरवा चुडा हाती सौभाग्याचा
शालू हिरवा मळवट भरूनी
आई जगदंबा माझी वरदायिनी
--अंश--
Wednesday, October 6, 2021
नवरात्र पुष्प चौथे रंग पिवळा
नव दुर्गेची नऊ रुपे
रंग पिवळा नव्या दिशेचा
अंधारातील नवीन आशेचा
लख लख होऊ वैभवशाली
आरोग्याची हळद लावू गाली
श्रद्धापूर्वक करूया भक्ती
आई जगदंबा माझी शक्ती🙏🏻🚩
--अंश--
Tuesday, October 5, 2021
Subscribe to:
Comments (Atom)

