Sunday, December 31, 2023

पुस्तक क्र.१९ वास्तव

 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा





पुस्तक परिचय क्रमांक-१९

पुस्तकाचे नांव- वास्तव

लेखकाचे नांव- श्री . किरण हिंदुराव भिलारे

प्रकाशन  व आवृत्ती-  अनघा प्रकाशन ,ठाणे,प्रथमावृत्ती २०२१

पृष्ठे संख्या– ९६

किंमत /स्वागत मूल्य-- १३०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१९||पुस्तक परिचय

         वास्तव

लेखक / संकलक -  कवी श्री . किरण हिंदुराव भिलारे

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


वास्तव हा माझ्या बालमित्राने लिहिलेला पहिला कविता संग्रह. या कविता संग्रहाचे परीक्षण करण्याचे भाग्य मला लाभलं हे माझ नशीबच.कवितासंग्रहाचे कवी श्री. किरण हिंदुराव भिलारे पहिलीपासूनच आम्ही एकत्र शिकलेलो. एकाच गावात एकाच आळीत राहिलो आहोत .आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो, लहानपणापासून मी पाहत आलेली आहे त्याच्या अभ्यासासाठी आई आणि आप्पांची धडपड अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसते. मुळातच किरण लहानपणापासून खूप हुशार. अगदी एकपाठी. कंदीलाच्या प्रकाशात त्याने केलेला अभ्यास त्याला यशदायी प्रवासाकडे नक्कीच घेऊन गेलेला आहे. आपल्या नावाप्रमाणे आपल्या यशाचे किरण त्याने चौफेर पसरले. खरे वास्तविक जीवन काय आहे ते सगळ्या जगासमोर आणलेल आहे .किरणचा मला खूप अभिमान वाटतो .अभिमान वाटावं असेच ते व्यक्तिमत्त्व आहे. 

सध्या किरण वित्त व लेखा अधिकारी वर्ग एकच्या पदावर कार्यरत आहे .त्याचे सिद्धहस्त लेखणीतून हा वास्तव  कविता संग्रह साकारला गेला आहे . कुटुंब नातेवाईक काय असतात हे सगळं त्याच्या या कवितेतून त्याने अतिशय सुंदर मांडलेल आहे .किरण प्रशासकीय व्याप सांभाळत कविता करणे  काही साधी सोपी गोष्ट नाही .पण किरण कसलीही लढाई खंबीरपणे आणि प्रयत्न करून लढणारा .असा हा किरण नक्कीच त्यांन  संसारगाडा ओढत असताना शितल वहिनींची त्याला लाभलेली साथ त्याला अनेक यशाची दार खुली करून गेली.

या कवितासंग्रहात एकूण 77 कविता  आहेत .

कवितेतील शब्दांची गुंफण ज्याप्रमाणे माळेतील मणी एक एक गुंफून जशी सुंदर माळ तयार होते त्याचप्रमाणे शब्दातून मनाला उभारी देणारी कविता तयार झाली आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कवितासंग्रहाला गीतकार प्रवीण दवणे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. आपल्या प्रस्तावनेत ते अतिशय सुंदर असं कवितासंग्रहाचे कौतुक करताना आपल्याला दिसत आहेत ते म्हणतात,

संवेदनशील मनाने जगताना भोवतीच्या वास्तवाची अनेक पदरी धग 'वास्तव' या कविता ग्रहाच्या माध्यमातून कवी किरण भिलारे यांना जाणवलेली आहे. माणसांच्या बेगडीपणाचे, बदलत्या मुखवट्यांचे मनाला दंश करणारे दर्शन कवितेतून प्रकट होते. ग्रामीण भागातील कृषिवलांचे उमाळे व उसासे, श्रद्धेचा लाजिरवाणा बाजार या कवीने टिपला आहे. अशा भेदक वास्तवाच्या, होरपळीच्या या कविता म्हणजे आजच्या माणसाच्या अंतर्मनातील अव्यक्त स्पंदनांचा आक्रोशच आहे. मात्र याचबरोबर या वास्तवाला शरण न जाणारी आत्मप्रबळता 'युद्ध' या कवितेपासूनच जाणवते.

स्वप्न ,इच्छा , कर्मवीर,सत्य , खंत, बाप, वर्तमान, संसार ,आई ,झुंडबळी , कोरोना ,तुझ्यासाठी बळीराजा, घोषणा, कायदा, देवा तुझं वागणं ,डाग मनातले, कुरुक्षेत्र, अंधश्रद्धा , आणि प्रेमात तुझ्या अशा वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कविता किरण यांनी आपल्या कवितासंग्रहात अतिशय सुंदर अशा भावनेने ओतप्रोत लिहिलेल्या आहेत.

आपल्या वर्दी या कवितेत ते म्हणतात ,

 वर्दीला सण नसतो 

वर्दीला शीण नसतो

 वर्दीला रजा नसते

 वर्दीला मजा नसते

खरचं वर्दी घालणारांनांच वर्दी काय आहे ते कळते.

जीवन या कवितेत ते म्हणतात ,

मदतीला दुसऱ्याच्या धावणे जरा अवघडच असते 

नाहीतर साऱ्याच पायांना धावता आले असते 

दान दुसऱ्यांना देणे जरा अवघडच असते 

नाहीतर साऱ्याच हातांना देता आले असते


वास्तवतेचे भान आणि खरी वास्तविकता काय आहे हे या कवितेतून आपल्याला दिसून येतं.

असं वास्तव त्यांच्या प्रत्येक कवितेतून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच किरण भिलारे यांचा हेवा वाटतो .कविता संग्रह अतिशय उच्च दर्जाचा झाला आहे .या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठच खूप सुंदर असं दाखवलेल आहे .अवकाशात उभारलेली एक कुऱ्हाड आणि कष्टकरी सारी जनता पण त्या कुऱ्हाडीत चंद्राची कोरही दिसून येते म्हणजे जशी धारदार ती कुऱ्हाड आहे तशीच ती शीतल आहे फक्त आपल्याला त्या मागची वास्तविकता कळली पाहिजे अनघा प्रकाशन ठाणे यांच्याकडून हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे .पुस्तक खरोखरच अतिशय सुंदर अशी निर्मिती झालेली आहे. सर्वांनी वाचावं असे पुस्तक .

मनातील वास्तववादी विचार कवितेच्या ओळी ओळीतून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणार असं हे काव्यसंग्रहाचे पुस्तक...

       समाजातील जाणिवा व वास्तववादी जीवन यांची सांगड घालणारा हा काव्यसंग्रह निश्चितच समाजाला एक दिशादर्शक ठरेल....

! किरणच्या लेखणीला माझा नम्र पूर्वक सलाम 🙏🏻अशीच तुझी लेखणी या जगाच्या प्रवाहात अधिकाधिक धारदार होत जावी आणि त्यातून अनेक अक्षरमोती बाहेर पडावेत याच नाथ चरणी प्रार्थना🙏🏻✒️📚🌹 धन्यवाद.

Sunday, December 24, 2023

पुस्तक क्र.१८ शुभकुंभ

 



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-१८

पुस्तकाचे नांव- शुभकुंभ

लेखकाचे नांव- सौ शुभांगी  तानाजी कुंभार

प्रकाशन  व आवृत्ती- पहिली विद्यार्थी निष्ठा प्रकाशन ,सातारा,प्रथमावृत्ती 

पृष्ठे संख्या– ५४

किंमत /स्वागत मूल्य-- ७५₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१८||पुस्तक परिचय

         शुभकुंभ

लेखक / संकलक - सौ. शुभांगी तानाजी कुंभार

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


माझी मैत्रीण शुभांगी कुंभार हिचा हा पहिलाच काव्यसंग्रह शुभ कुंभ यामध्ये तिच्या काही कविता आणि चार अक्षरी आहेत विशेष म्हणजे तिचं कराव एवढं कौतुक कमी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस तिने याच पुस्तकांनी आपल्या आदरणीय सासऱ्यांचे ग्रंथ तुला करून त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात आणि उत्साह साजरा केला खरोखरच सासऱ्याच आणि सुनेच  असं नातं हल्लीच्या जमान्यात पाहायला मिळणार नाही म्हणजे दुर्मिळच. माझ्या मैत्रिणीचा कराव एवढं कौतुक कमीच आहे. नुकतीच  तिनं ज्ञानरचनावादात पीएचडी पूर्ण केली . याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन तिला गौरवलं गेलं . कुणालाही अभिमान वाटावा अशी ही माझी मैत्रीण आणि तिचाच हा शुभ कुंभ हा पहिला काव्यसंग्रह . परीक्षणाच्या रूपाने तुम्हा सर्वांसमोर ठेवताना मला अत्यानंद होत आहे .या पुस्तकाला अतिशय समर्पक  नाव दिलेले आहे .शुभांगी कुंभार यांनी शुभांगी मधल्या शुभ आणि कुंभार मधला कुंभ घेऊन शुभ कुंभ हा कवितासंग्रह तिच्या या सुंदर लेखणीतून साकारला आहे .खरोखरच हा शुभकुंभ अनेक यशस्वी पायऱ्यांचे मुहूर्तमेढ रोवणाराच झाला आहे .

या पुस्तकाच्या मनोगतात लिहिताना शुभांगी कुंभार मॅडम म्हणतात कुंभ म्हणजे घडा घडा हा नेहमी दुसऱ्याची सुधा भागवण्याचे काम करतो तसाच हा शुभकुंभ जीवनातील सार , आनंद, हर्ष, प्रेम , आईचे वात्सल्य, वडिलांची श्रमप्रतिष्ठा आणि शालेय आठवणीनी ओतप्रोत भरलेला आहे.

या पुस्तकाचे अर्पण पत्र तिने आपल्या सासुबाईंच्या नावे केलेल्या आहे . खरोखरच अशी सून मिळायला खूप मोठ भाग्य लागतं. अनेकांनी तिच्या या पुस्तकाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

कदाचित माझ्या शब्दांची ओंजळ तिचं कौतुक करायला कमी पडेल असं वाटते.

या कवितासंग्रहात एकूण 52 कविता आणि चार अक्षरी तिने लिहीलेले आहेत म्हणजे साक्षात बावन्नकशी सोनचं माझ्या हातात या कवितासंग्रहाचे रूपाने पडलेल आहे.

गणपती ,शुभ कुंभ ,राजमाता जिजाऊ ,कर्मवीर , फेडूया ऋण भारत मातेचे ,माय मराठी, महामानव ,आई ,बाप ,हिरकणी माझा महाराष्ट्र, सातारा, बालकविता, पांडुरंग ,सहा ऋतू, शब्दकोडे, चार अवस्था, मिसळ पार्टी ,उन्हाळी पाऊस ,बापू आणि क्षण निरोपाचा अशा कितीतरी कविता तीन आपल्या शब्दात लिलया रेखाटल्या आहेत.

अमृत कुंभ हे आपल्या कवितेत ते अतिशय सुंदर रित्या आपल्या कुटुंबीयांबद्दल लिहिते

एक कुंभ भरला मी अमृताने 

विविध विषयांनी फुलला विचाराने

 जन्माची शिदोरी दिली माऊलीने

 आयुष्याचे सोने झाले तिच्या सावलीने

 बाप माझा कष्टाळू प्रामाणिक किती

 माती तुझ्यापुढे आकाराने रुपे घेती

 नवरा माझा तानाजी आहे मनाचा दिलदार 

संसाराची वाट पेलती आम्ही दिमाखदार

खूप सुंदर असे शब्दातील हे वर्णन केलेले आहे.

आपल्या आयुष्य या कवितेत ती म्हणते,


 सारे छंद ते जोपासा

 जीवनाचा हाच वसा 

कर्म करा निरपेक्ष

मिळे यश,वेळ साक्ष

अशा सुंदर शब्दातील आयुष्य आपल्या लेखणीतून रेखाटल आहे .अजूनही ते धडपडते आहे लिहिते आहे प्रत्येक आयुष्यातील संघर्षाला सामोरे जाऊन आपल्या यशाची पाऊले उमटवत आहे. अशीच तुझी लेखणी सदैव तळपत राहो या मनोमन  शुभेच्छा. आज तुझ्या नोकरीला 19 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणूनच तुला शुभेच्छा देण्यासाठी मी तुझ्या काव्यसंग्रहाचे परीक्षण केलेले आहे. तेव्हा सगळ्यांनी नक्की वाचा अतिशय सुंदर आणि वाचनीय असा हा कवितासंग्रह आहे.


सौ.अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)  मर्ढे सातारा .

Saturday, December 23, 2023

पुस्तक क्र . १७ संघर्ष गाथा

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-१७

पुस्तकाचे नांव- संघर्ष गाथा

लेखकाचे नांव- श्री . कृष्णा भोसले 

प्रकाशन  व आवृत्ती- पहिली माझा विद्यार्थी मित्र सातारा

पृष्ठे संख्या– १४२

किंमत /स्वागत मूल्य-- १३०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१७||पुस्तक परिचय

         संघर्ष गाथा

लेखक / संकलक - श्री . कृष्णा भोसले 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो.


ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोब बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे सगळे संघर्ष न करता मिळावे अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते.

पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या जगातील लहानातील लहान जीवाला सुध्दा पुढचा क्षण पाहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो.


जे संघर्षाला नाही म्हणतात ते, त्यांच्या आयुष्यात कित्येक सुखांना मुकतात. तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान हवं असेल तर, तुमच्याकडे एकच गोष्ट कायम उरते ती म्हणजे स्वतःवरती संयम पाळून संघर्ष करत राहणे.

आजपर्यंत ज्या-ज्या महान व्यक्ति या जगात होऊन गेल्या त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती.... संघर्ष, संघर्ष आणि केवळ संघर्ष.


तुम्हालाही तुमच्या आयुष्यात प्रत्येक घडीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल.


या जगात सर्व सुखी असा कुणीच नाही, हे आपणा सर्वांनाच माहित आहे. प्रयत्नांती परमेश्वर, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर असे बरेच सुविचार तुम्ही आजपर्यंत ऐकत आला असाल.

संघर्ष शिवाय आनंद गगनात मावत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच फक्त त्याची रूप वेगवेगळे असतात अशाच वेगवेगळ्या रूपातून संघर्ष करून आज स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या काही दिग्गजांचा परिचय संघर्ष गाथा या पुस्तकातून तुम्हा सर्वांना होणार आहे. आमचे आदरणीय गुरु आदरणीय भोसले सरांनी या पुस्तकामध्ये समावेश केलेले ते दिग्गज आहेत.


* श्री. निलेश मोहन चौधरी


- कला दिग्दर्शक


* डॉ. सुदाम खाडे,


आय. ए. एस. अधिकारी, -कुलगुरू


* अश्विनी प्रदीपकुमार महांगडे


• प्रसिद्ध अभिनेत्री


* श्री. ज्ञानेश्वर वासुदेव कुंदप - प्रसिद्ध व्यावसायिक -


* डॉ. धनंजय खाशाबा विधाते


प्राध्यापक


* सौ संगिता सुधाकर शिंदे


- वसतीगृह अधीक्षिका


* श्री मारूती बाबूराव नाव्हकर


प्रगतिशील शेतकरी


* श्री. दिगंबर बाबूराव लहाने


सरकारी नोकरी

आणि येथील सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक ज्यांनी लिहिलं ते माझे विद्यालय गुरुवर्य आदरणीय के.बी. भोसले सर आहेत .या पुस्तकात समाविष्ट झालेले दोन दिग्गज म्हणजे माझा वर्गमित्र कला दिग्दर्शक निलेश चौधरी आणि दुसरे म्हणजेच माझी छोटी बहिन जिला लाडाने आपण सगळे राणुआक्का म्हणतो. निलेश आणि अश्विनी महांगडे या दोघांशीही माझा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना माझा उर अभिमानाने भरून आला, खरोखर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किती मोठा संघर्ष असतो आणि जेवढा मोठा संघर्ष तेवढे यश अधिक हे मात्र निश्चित.

प्रत्येकाच्या आयुष्यातला संघर्ष मी मात्र येथे सांगणार नाही तुम्ही प्रत्यक्ष हे पुस्तक वाचा आणि प्रत्येकाच्या आयुष्यातली संघर्ष गाथा नक्की पहा .आपल्या मुलांनाही पुस्तक नक्की वाचायला द्या. यामुळे मुलांच्यातही प्रेरणादायी बदल निश्चित स्वरूपात दिसून येतील. कारण यातील एक से बढकर एक असे दिग्गज या पुस्तकात दिलेले आहेत.

अतिशय देखण हे पुस्तक झालेले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठच निलेश चौधरी यांनी बनवलेल आहे आणि मग पृष्ठावर या पुस्तकात आलेल्या सर्व दिगज्यांची छोटी छोटी छायाचित्र लावलेली आहेत. एकबीज अंकुरताना दिसत आहे म्हणजे कितीही संघर्ष केला तरी ते बहरून येते याचच प्रतीक ते समजलं जावो. मला पृष्ठावर आदरणीय भोसले सरांचा एक हसतमुख फोटो आणि या पुस्तकात नक्की काय आहे हे थोडक्या शब्दात त्यांच्या दिलेल आहे.

भोसले सर या ठिकाणी म्हणतात,


बालकांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका ही बालकांना बळ देणारी असावी, त्यांचा कल व कौशल्याचा विचार करुन त्यांना प्रेमाने समजून घेत दिशा देण्याचे काम डोळ्यापुढे ठेवल्यास बालकांची प्रगती झपाट्याने होते. ते मी माझ्या "बालक पालक विकास" या पुस्तकातुन व्यक्त केले होते


माझ्या या "संघर्ष गाथा" पुस्तकातुन संघर्ष करणाऱ्यांना समृध्द करणे हा एक उद्देश असून त्यांचे हित जोपासुन इतरांना प्रेरणा देणारा ठरावा. ग्रामिण भागातील सामान्य कुटुंबातील झगडत आणि आई-वडीलांच्या संस्कारातून आपल्या कर्तृत्वाच्या जडणघडणीत मनापासून प्रामाणिकपणे काम करीत, जिद्दीने यश संपादन करणाऱ्यांची संघर्ष गाथा इतरांनाच प्रेरणादायी ठरावी असेच वाटते.

अतिशय सुंदर असे हे पुस्तक खूपच वाचनीय आहे. नैराश्यात गेलेल्या माणसांना तर हे पुस्तक वाचून नक्कीच नवी प्रेरणा मिळेल यात काही शंका नाही .आदरणीय भोसले सरांच्या लेखणीला माझा नम्रपूर्वक सलाम असेच तुमच्या लेखणीतून शब्दमोती अवतरत राहावे .मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.


सौ अंजली शशिकांत गोडसे ( शिर्के ) मर्ढे , सातारा.




Tuesday, December 19, 2023

पुस्तक क्र . १६ वेचलेले मोती




 जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते.सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस  हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. 

असेच माझ्या वाचनात आलेले अतिशय सुंदर असे पुस्तक वेचलेले मोतीयामध्ये मुळाक्षरानुसार अतिशय सुंदर अशा सुविचारांचा संग्रह दिलेला आहे आणि या पुस्तकाचे लेखक व संकलक आहेत श्री अशोक कृष्णय श्रीरंग साळुंखे अतिशय सुंदर असं पुस्तक त्यांनी आपल्या सर्वांसाठी तयार केलेला आहे सर्वांनाच विचारांची गरज असते आणि ही गरज लक्षात घेऊन त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे .

या पुस्तकाबद्दल प्रकाशक श्री राजेंद्र सगर म्हणतात ,

अशोक साळुंखे सर हे नुसते व्यावसयिक नाहीत तर ते वाचनप्रेमी व समाजप्रिय असे सेवाभावी उद्योजक आहेत. म्हणुन त्यांची व माझी मैत्री वाढत गेली व बघता बघता आमच्या मैत्रीचा वेल गगनावरती गेला व ते आमच्या कुटुबियांमधील एक सदस्यच बनले असे म्हटले तरी वावगे ठरु नये.


त्यांच्या आईने त्यांच्यासाठी केलेले कष्ट व सोसलेले हाल हे त्यांनी लहानपणापासुन पाहिलेत व तशी वेळ गावाकडील कोणत्याही मुलांवरती येऊ नये म्हणुन ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या हाच मानवतेचा विचार माझ्या मनात घर करुन राहिला व आम्ही जिवलग मित्रच बनलो.


त्यांनी संकलित केलेली ही सुविचारमाला प्रकाशित करताना मला प्रचंड आनंद झाला आहे. तो शब्दात सांगुच शकत नाही. या सुविचार मालेतून भावी पिढी सद्विचाराने व सकारात्मकतेने भविष्यात नक्कीच वाटचाल करेल अशी खात्री आहे .

या पुस्तकासाठी मुखपृष्ठ संकल्पना देण्याची संधी मला लाभली हे मी माझं खरोखर भाग्य समजते .

अशोक साळुंखे यांनी या पुस्तकाची अर्पण पत्रिका आपल्या आईच्या नावे लिहिलेली आहे ते म्हणतात ,माझा बाप मला आठवत नाही माझा बाप होती माझी आई .

सर्वांनी वाचावं आणि संग्रहित ठेवावं असं नितांत सुंदर असे हे वेचलेले मोती हे पुस्तक आहे .

श्रम आणि श्रमसाफल्य यातील आनंद अनोखा असाच आहे .

मौनाच्या वृक्षाला शांतीची फळे लागतात .

यासारखे अनेक सुविचार आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतील तेव्हा नक्की वाचा असे सुंदर पुस्तक .


सौ .अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मर्ढे सातारा .

पुस्तक क्र १५ सुमनांचे रेखांकण



 )वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.


२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे(शिर्के)


३} पुस्तक क्रमांक   :-१ ५


४} पुस्तकाचे नाव      :- सुमनांचे रेखांकण .


५)एकूण पृष्ठ संख्या :-  ९६


 ६) मूल्य   :- १५०


पुस्तक परीक्षण


माझी प्रिय सखी सौभाग्यवती रेखा विजय शिर्के हिच्या "सु-मनांचे रेखां कण" या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या शब्दफुलांची ओंजळ तुम्हां सर्वांसमोर ठेवत आहे.


आदर्श गृहिणी, आदर्श शिक्षिका, आदर्श माता, आदर्श सून अशी अनेक विविध रूपे मी तिच्यात पाहत आले आहे. एक प्रतिभावंत कवयित्री या पुस्तक रूपाने ती तुमच्यासमोर उभी राहत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे.


जसा तिचा शांत आणि सरळ स्वभाव आहे, तशीच तिची कविताही शांत आणि नितळ आहे. साऱ्या सृष्टीतील फुलांना एकत्र करून तिने बनविलेला हा शब्दसुमनांचा मोहक काव्यहार तुम्हा सर्व वाचकवर्गाला नक्कीच आवडेल.

सुमनांची रेखांकन हा कवितासंग्रह अष्टाक्षरी बंधात लिहिला गेला आहे रेखा शिर्के यांनी अतिशय सुंदर असे लिखाण या   आपल्याला माहिती नसतील इतक्या फुलांची कविता लिहिणे म्हणावे एवढं सोपं नाही पण त्यांनी एकूण 81 वेगवेगळ्या प्रकारची फुले घेऊन त्यावर अतिशय सुंदर असे कवितासंग्रह केलेला आहे .नक्कीच तुम्हा सर्वांनी वाचावा अ .सा हा कवितासंग्रह आहे .

बेशरम ही एक सुंदर अशी त्यांची कविता आहे .  आपल्याला तो शब्द वाचला तरी एखाद्याला शिवी दिल्यासारखे वाटेल . पण त्या फुलांवर त्यांनी सुंदर असं काव्य केले आहे .

 नाव माझे बेशरम 

तमा  नसे मरणाची 

बारमाही बहरतो 

झुंज एकटेपणाची 

किती सुंदर शब्दात त्यांनी या बेशरम फुलाचे वर्णन  केलेल आहे . आपण नेहमीच आपल्या अवतीभवती अनेक फुले बघत असतो . पण कैलास पतीचे फुल कधी पाहिले का तुम्ही ? तेही त्यांच्या कवितेत आलेल आहे . त्या फुलाचे वर्णन करताना त्या म्हणतात ,

 पुष्प कैलास पतीचे 

पिंडी सारखा आकार 

तळहातापरी मोठे 

पुष्प भाषे शिवाकार


 किती सुंदर वर्णन त्यांनी त्या कैलास पतीच्या फुलाचे केलेले आहे . अशीच सुंदर सुंदर फुलांची वर्णन त्यांच्या पुस्तकात आपल्याला दिसून येतील . नक्कीच सर्वांनी वाचावा असा हा सुंदर असा काव्यसंग्रह आणि हा काव्यसंग्रहाला शुभेच्छा देण्याचे भाग्य मला लाभलं यातच मी खूप भाग्यवान समजते स्वतःला .

कविता करणं आणि ती सूचणं याला अफाट प्रतिभाशक्ती लागते. एकाच विषयावर काव्य बनवणं तसं अवघडचं ! पण हेच शिवधनुष्य पेलून रेखाने अतिशय मनमोहक अशी काव्यमाला गुंफली आहे. "सु-मनांचे रेखां-कण" या काव्यफुलांचा सुगंध दशदिशांतून नक्की पसरेल. यानंतरच्या तुझ्या प्रत्येक पुस्तकांना शुभेच्छा लिहिण्याची संधी मला मिळत राहो. तुझ्या या कवितासंग्रहाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा ! अशीच तुझी लेखणी काव्यफुलांनी सुगंधित होत राहो, हीच ईश्वरचरणी सद्भावना !



सौ अंजली  शशिकांत गोडसे शिर्के

 मर्ढे सातारा