)वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.
२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे(शिर्के)
३} पुस्तक क्रमांक :-१ ५
४} पुस्तकाचे नाव :- सुमनांचे रेखांकण .
५)एकूण पृष्ठ संख्या :- ९६
६) मूल्य :- १५०
पुस्तक परीक्षण
माझी प्रिय सखी सौभाग्यवती रेखा विजय शिर्के हिच्या "सु-मनांचे रेखां कण" या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या शब्दफुलांची ओंजळ तुम्हां सर्वांसमोर ठेवत आहे.
आदर्श गृहिणी, आदर्श शिक्षिका, आदर्श माता, आदर्श सून अशी अनेक विविध रूपे मी तिच्यात पाहत आले आहे. एक प्रतिभावंत कवयित्री या पुस्तक रूपाने ती तुमच्यासमोर उभी राहत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
जसा तिचा शांत आणि सरळ स्वभाव आहे, तशीच तिची कविताही शांत आणि नितळ आहे. साऱ्या सृष्टीतील फुलांना एकत्र करून तिने बनविलेला हा शब्दसुमनांचा मोहक काव्यहार तुम्हा सर्व वाचकवर्गाला नक्कीच आवडेल.
सुमनांची रेखांकन हा कवितासंग्रह अष्टाक्षरी बंधात लिहिला गेला आहे रेखा शिर्के यांनी अतिशय सुंदर असे लिखाण या आपल्याला माहिती नसतील इतक्या फुलांची कविता लिहिणे म्हणावे एवढं सोपं नाही पण त्यांनी एकूण 81 वेगवेगळ्या प्रकारची फुले घेऊन त्यावर अतिशय सुंदर असे कवितासंग्रह केलेला आहे .नक्कीच तुम्हा सर्वांनी वाचावा अ .सा हा कवितासंग्रह आहे .
बेशरम ही एक सुंदर अशी त्यांची कविता आहे . आपल्याला तो शब्द वाचला तरी एखाद्याला शिवी दिल्यासारखे वाटेल . पण त्या फुलांवर त्यांनी सुंदर असं काव्य केले आहे .
नाव माझे बेशरम
तमा नसे मरणाची
बारमाही बहरतो
झुंज एकटेपणाची
किती सुंदर शब्दात त्यांनी या बेशरम फुलाचे वर्णन केलेल आहे . आपण नेहमीच आपल्या अवतीभवती अनेक फुले बघत असतो . पण कैलास पतीचे फुल कधी पाहिले का तुम्ही ? तेही त्यांच्या कवितेत आलेल आहे . त्या फुलाचे वर्णन करताना त्या म्हणतात ,
पुष्प कैलास पतीचे
पिंडी सारखा आकार
तळहातापरी मोठे
पुष्प भाषे शिवाकार
किती सुंदर वर्णन त्यांनी त्या कैलास पतीच्या फुलाचे केलेले आहे . अशीच सुंदर सुंदर फुलांची वर्णन त्यांच्या पुस्तकात आपल्याला दिसून येतील . नक्कीच सर्वांनी वाचावा असा हा सुंदर असा काव्यसंग्रह आणि हा काव्यसंग्रहाला शुभेच्छा देण्याचे भाग्य मला लाभलं यातच मी खूप भाग्यवान समजते स्वतःला .
कविता करणं आणि ती सूचणं याला अफाट प्रतिभाशक्ती लागते. एकाच विषयावर काव्य बनवणं तसं अवघडचं ! पण हेच शिवधनुष्य पेलून रेखाने अतिशय मनमोहक अशी काव्यमाला गुंफली आहे. "सु-मनांचे रेखां-कण" या काव्यफुलांचा सुगंध दशदिशांतून नक्की पसरेल. यानंतरच्या तुझ्या प्रत्येक पुस्तकांना शुभेच्छा लिहिण्याची संधी मला मिळत राहो. तुझ्या या कवितासंग्रहाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा ! अशीच तुझी लेखणी काव्यफुलांनी सुगंधित होत राहो, हीच ईश्वरचरणी सद्भावना !
सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के
मर्ढे सातारा


No comments:
Post a Comment