Saturday, December 23, 2023

पुस्तक क्र . १७ संघर्ष गाथा

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-१७

पुस्तकाचे नांव- संघर्ष गाथा

लेखकाचे नांव- श्री . कृष्णा भोसले 

प्रकाशन  व आवृत्ती- पहिली माझा विद्यार्थी मित्र सातारा

पृष्ठे संख्या– १४२

किंमत /स्वागत मूल्य-- १३०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१७||पुस्तक परिचय

         संघर्ष गाथा

लेखक / संकलक - श्री . कृष्णा भोसले 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो.


ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोब बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे सगळे संघर्ष न करता मिळावे अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते.

पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या जगातील लहानातील लहान जीवाला सुध्दा पुढचा क्षण पाहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो.


जे संघर्षाला नाही म्हणतात ते, त्यांच्या आयुष्यात कित्येक सुखांना मुकतात. तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान हवं असेल तर, तुमच्याकडे एकच गोष्ट कायम उरते ती म्हणजे स्वतःवरती संयम पाळून संघर्ष करत राहणे.

आजपर्यंत ज्या-ज्या महान व्यक्ति या जगात होऊन गेल्या त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती.... संघर्ष, संघर्ष आणि केवळ संघर्ष.


तुम्हालाही तुमच्या आयुष्यात प्रत्येक घडीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल.


या जगात सर्व सुखी असा कुणीच नाही, हे आपणा सर्वांनाच माहित आहे. प्रयत्नांती परमेश्वर, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर असे बरेच सुविचार तुम्ही आजपर्यंत ऐकत आला असाल.

संघर्ष शिवाय आनंद गगनात मावत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच फक्त त्याची रूप वेगवेगळे असतात अशाच वेगवेगळ्या रूपातून संघर्ष करून आज स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या काही दिग्गजांचा परिचय संघर्ष गाथा या पुस्तकातून तुम्हा सर्वांना होणार आहे. आमचे आदरणीय गुरु आदरणीय भोसले सरांनी या पुस्तकामध्ये समावेश केलेले ते दिग्गज आहेत.


* श्री. निलेश मोहन चौधरी


- कला दिग्दर्शक


* डॉ. सुदाम खाडे,


आय. ए. एस. अधिकारी, -कुलगुरू


* अश्विनी प्रदीपकुमार महांगडे


• प्रसिद्ध अभिनेत्री


* श्री. ज्ञानेश्वर वासुदेव कुंदप - प्रसिद्ध व्यावसायिक -


* डॉ. धनंजय खाशाबा विधाते


प्राध्यापक


* सौ संगिता सुधाकर शिंदे


- वसतीगृह अधीक्षिका


* श्री मारूती बाबूराव नाव्हकर


प्रगतिशील शेतकरी


* श्री. दिगंबर बाबूराव लहाने


सरकारी नोकरी

आणि येथील सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक ज्यांनी लिहिलं ते माझे विद्यालय गुरुवर्य आदरणीय के.बी. भोसले सर आहेत .या पुस्तकात समाविष्ट झालेले दोन दिग्गज म्हणजे माझा वर्गमित्र कला दिग्दर्शक निलेश चौधरी आणि दुसरे म्हणजेच माझी छोटी बहिन जिला लाडाने आपण सगळे राणुआक्का म्हणतो. निलेश आणि अश्विनी महांगडे या दोघांशीही माझा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना माझा उर अभिमानाने भरून आला, खरोखर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किती मोठा संघर्ष असतो आणि जेवढा मोठा संघर्ष तेवढे यश अधिक हे मात्र निश्चित.

प्रत्येकाच्या आयुष्यातला संघर्ष मी मात्र येथे सांगणार नाही तुम्ही प्रत्यक्ष हे पुस्तक वाचा आणि प्रत्येकाच्या आयुष्यातली संघर्ष गाथा नक्की पहा .आपल्या मुलांनाही पुस्तक नक्की वाचायला द्या. यामुळे मुलांच्यातही प्रेरणादायी बदल निश्चित स्वरूपात दिसून येतील. कारण यातील एक से बढकर एक असे दिग्गज या पुस्तकात दिलेले आहेत.

अतिशय देखण हे पुस्तक झालेले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठच निलेश चौधरी यांनी बनवलेल आहे आणि मग पृष्ठावर या पुस्तकात आलेल्या सर्व दिगज्यांची छोटी छोटी छायाचित्र लावलेली आहेत. एकबीज अंकुरताना दिसत आहे म्हणजे कितीही संघर्ष केला तरी ते बहरून येते याचच प्रतीक ते समजलं जावो. मला पृष्ठावर आदरणीय भोसले सरांचा एक हसतमुख फोटो आणि या पुस्तकात नक्की काय आहे हे थोडक्या शब्दात त्यांच्या दिलेल आहे.

भोसले सर या ठिकाणी म्हणतात,


बालकांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका ही बालकांना बळ देणारी असावी, त्यांचा कल व कौशल्याचा विचार करुन त्यांना प्रेमाने समजून घेत दिशा देण्याचे काम डोळ्यापुढे ठेवल्यास बालकांची प्रगती झपाट्याने होते. ते मी माझ्या "बालक पालक विकास" या पुस्तकातुन व्यक्त केले होते


माझ्या या "संघर्ष गाथा" पुस्तकातुन संघर्ष करणाऱ्यांना समृध्द करणे हा एक उद्देश असून त्यांचे हित जोपासुन इतरांना प्रेरणा देणारा ठरावा. ग्रामिण भागातील सामान्य कुटुंबातील झगडत आणि आई-वडीलांच्या संस्कारातून आपल्या कर्तृत्वाच्या जडणघडणीत मनापासून प्रामाणिकपणे काम करीत, जिद्दीने यश संपादन करणाऱ्यांची संघर्ष गाथा इतरांनाच प्रेरणादायी ठरावी असेच वाटते.

अतिशय सुंदर असे हे पुस्तक खूपच वाचनीय आहे. नैराश्यात गेलेल्या माणसांना तर हे पुस्तक वाचून नक्कीच नवी प्रेरणा मिळेल यात काही शंका नाही .आदरणीय भोसले सरांच्या लेखणीला माझा नम्रपूर्वक सलाम असेच तुमच्या लेखणीतून शब्दमोती अवतरत राहावे .मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.


सौ अंजली शशिकांत गोडसे ( शिर्के ) मर्ढे , सातारा.




No comments:

Post a Comment