Tuesday, December 19, 2023

पुस्तक क्र . १६ वेचलेले मोती




 जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते.सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस  हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. 

असेच माझ्या वाचनात आलेले अतिशय सुंदर असे पुस्तक वेचलेले मोतीयामध्ये मुळाक्षरानुसार अतिशय सुंदर अशा सुविचारांचा संग्रह दिलेला आहे आणि या पुस्तकाचे लेखक व संकलक आहेत श्री अशोक कृष्णय श्रीरंग साळुंखे अतिशय सुंदर असं पुस्तक त्यांनी आपल्या सर्वांसाठी तयार केलेला आहे सर्वांनाच विचारांची गरज असते आणि ही गरज लक्षात घेऊन त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे .

या पुस्तकाबद्दल प्रकाशक श्री राजेंद्र सगर म्हणतात ,

अशोक साळुंखे सर हे नुसते व्यावसयिक नाहीत तर ते वाचनप्रेमी व समाजप्रिय असे सेवाभावी उद्योजक आहेत. म्हणुन त्यांची व माझी मैत्री वाढत गेली व बघता बघता आमच्या मैत्रीचा वेल गगनावरती गेला व ते आमच्या कुटुबियांमधील एक सदस्यच बनले असे म्हटले तरी वावगे ठरु नये.


त्यांच्या आईने त्यांच्यासाठी केलेले कष्ट व सोसलेले हाल हे त्यांनी लहानपणापासुन पाहिलेत व तशी वेळ गावाकडील कोणत्याही मुलांवरती येऊ नये म्हणुन ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या हाच मानवतेचा विचार माझ्या मनात घर करुन राहिला व आम्ही जिवलग मित्रच बनलो.


त्यांनी संकलित केलेली ही सुविचारमाला प्रकाशित करताना मला प्रचंड आनंद झाला आहे. तो शब्दात सांगुच शकत नाही. या सुविचार मालेतून भावी पिढी सद्विचाराने व सकारात्मकतेने भविष्यात नक्कीच वाटचाल करेल अशी खात्री आहे .

या पुस्तकासाठी मुखपृष्ठ संकल्पना देण्याची संधी मला लाभली हे मी माझं खरोखर भाग्य समजते .

अशोक साळुंखे यांनी या पुस्तकाची अर्पण पत्रिका आपल्या आईच्या नावे लिहिलेली आहे ते म्हणतात ,माझा बाप मला आठवत नाही माझा बाप होती माझी आई .

सर्वांनी वाचावं आणि संग्रहित ठेवावं असं नितांत सुंदर असे हे वेचलेले मोती हे पुस्तक आहे .

श्रम आणि श्रमसाफल्य यातील आनंद अनोखा असाच आहे .

मौनाच्या वृक्षाला शांतीची फळे लागतात .

यासारखे अनेक सुविचार आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतील तेव्हा नक्की वाचा असे सुंदर पुस्तक .


सौ .अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मर्ढे सातारा .

No comments:

Post a Comment