वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ६५
पुस्तकाचे नाव - स्त्री शक्ती
लेखकाचे नाव - प्राचार्य डॉ. भि ना . दहातोंडे
प्रकाशन व आवृत्ती- विजया प्रकाशन अहिल्यानगर
पृष्ठे संख्या– ४५६
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ३५०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
६५||पुस्तक परिचय
स्त्रीशक्ती
प्राचार्य डॉ. भि ना . दहातोंडे
स्त्री शक्ती पुस्तक म्हणजे माझ्यासाठी हे स्त्रीधन आहे एका पित्याने लेकीला दिलेला अमूल्य दान . कायम माझ्या सोबत राहणारा ठेवा .या पुस्तकाचे लेखक आहेत प्राचार्य डॉ . भि. ना. दहातोंडे .या पुस्तकात एकूण तीन विभाग दिलेले आहेत .विभाग पहिला संत स्त्रिया .विभाग दुसरा स्त्रीशक्ती ज्यामध्ये स्वतः लेखकाने लिहिलेले लेख स्त्रियांचे वरील ते दिलेले आहेत . आणि विभाग तिसरा ज्यात लेखकांचे मित्रपरिवार यांनी समाजातील थोर स्त्रियांवर लिहिलेले लेख आहेत .
या पुस्तकाला प्रस्तावना आदरणीय मेधा पाटकर मॅडम,कॉ .स्मिता पानसरे मॅडम, प्राचार्य खासेराव शितोळे सर यांनी दिलेली आहे. त्यांच्या प्रस्तावनेतूनच या पुस्तकाच सार आपल्याला कळून येतं .
रेस कमी करणे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,
आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील स्त्रियांविषयी बोलणे वा
लिहिणे म्हणजे एका मूक जगताला वाचा देण्यागतच होय. जनसंख्येच्या
जवळपास पन्नास टक्के असणाऱ्या स्त्रियांचे योगदान नेमके मोजणेही
कठीण. एवढेच नव्हे तर त्यासाठी कोणतीच मापे, कुठली मोजपट्टी लावावी, हेही नेमके ठरवणे संशोधनकर्त्यांसाठी सुद्धा आव्हानच ठरते.
महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे 'शक्ती म्हणजे नैतिक शक्ती, अशा अर्थाने पाहिले तर स्त्री ही पुरूषांपेक्षा अनंत पटींनी श्रेष्ठ आहे' असे संतत्वाचे बोल ठायीठायी इतिहासातच काय वर्तमानातही उमटत असले तरीही, पुरूष प्रधानता समाजात व्यापून राहणे व स्त्रीला अबलाच धरून चालणे हे समाजाच्या पाचवीलाच पूजलेले आहे. कधी देवी तर कधी दासी म्हणून, माणुसकीला मुकणारी स्त्री ही आंतर्बाह्य नेमकी मानवतेचे दर्शन देत कशी जगते हे उलगडून दाखविण्याचे कार्य म्हणूनच अत्यंत नाजूकच नव्हे तर जटीलही आहे. नेमके हेच कार्य केले आहे ते पुरोगामी विचारांसह कार्यरत राहिलेल्या प्राचार्य डॉ. भि.ना. दहातोंडे सर यांनी !
एकीकडे धर्मशास्त्रांनी घालून दिलेल्या नियमांची चाकोरी आणि दुसरीकडे स्त्री-पुरुष समतेचे आधुनिक विचार. अशा दोन वाटा आता भारतीय समाजापुढे आहेत. स्त्रियांची प्रतिभा जितकी फुलेल, त्यांच्या अंतःशक्ती (Potentialities) जितक्या साकार होतील तितके एकूण मानव जातीचेच कल्याण होईल. कारण निम्मी मानवजात स्त्रियांची बनलेली आहे. त्यांची कार्यक्षमताच सर्जनशीलता मारून टाकणे याचा अर्थ केवल स्त्रियांची हानी करणे असा नसून एकूण मानवजातीची ५० टक्के कार्यक्षमता व सर्जनशीलता मारून टाकणे होय.
डॉ .आ. ह . साळुंखे यांचे हे वरील विचार अतिशय सुंदर आहेत.
स्त्री म्हणजे केवळ सौंदर्याची मूर्ती नव्हे, तर ती सृजन, संघर्ष, सहनशीलता आणि सामर्थ्य यांचा संगम आहे. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:" असा उल्लेख मनुस्मृतीत सापडतो. म्हणजे जिथे स्त्रियांना सन्मान दिला जातो, तिथे देवता नांदतात. हे वचन आजही तितकंच महत्त्वाचं आहे. आधुनिक युगात 'स्त्री शक्ती' ही संकल्पना केवळ नारा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवली जात आहे.
स्त्री शक्ती म्हणजे स्त्रीच्या अंगी असलेली नैसर्गिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक ताकद. ही शक्ती घर, समाज, राष्ट्र अशा प्रत्येक पातळीवर समाजाचे आधारस्तंभ म्हणून कार्य करते. स्त्री ही केवळ माता, पत्नी किंवा बहीण म्हणून नाही, तर एक नेता, शिक्षक, डॉक्टर, सैनिकी, उद्योजिका, वैज्ञानिक आणि विचारवंत म्हणूनही आपलं योगदान देते.
भारतीय इतिहासात अनेक स्त्रियांनी आपली शक्ति सिद्ध केली आहे. उदाहरणार्थ:
झाशीची राणी लक्ष्मीबाई – इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढणारी वीरांगना.
अहिल्याबाई होळकर – उत्तम प्रशासक आणि जनतेची माता.
सावित्रीबाई फुले – भारतातील पहिली महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाची जननी.
इंदिरा गांधी – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, लोखंडी स्त्री म्हणून ओळखल्या जातात.
कल्पना चावला – अंतराळवीर आणि लाखो महिलांसाठी प्रेरणास्त्रोत.
आजच्या काळातही स्त्री विविध क्षेत्रांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करत आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला, उद्योग, राजकारण, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी उत्तुंग यश संपादन केलं आहे.
जीवनात यशस्वी आणि आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकलेल्या अनेक स्त्रीशक्तींचा उल्लेख या पुस्तकात आलेला आहे. स्त्रियांची आपल्याला साधी ओळखही नाही अशा अनामिक स्त्रियांचे कर्तुत्व या पुस्तकातून आपल्या समोर येतं .खरंच !माझ्या हाती हा एक अनमोल खजिनाच लागला .मी या पुस्तकात वाचताना अगदी वंगवून गेली कारण प्रत्येक स्त्रीचा त्या कष्ट हे एकाहून दुसरीचे वेगळं होतं .प्रत्येकीचं कर्तुत्व हे आभाळापेक्षाही महान आहे .त्यामुळे सर्वांनी हे पुस्तक आर्वजून वाचलंच पाहिजे .धन्यवाद.
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment