वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ८२
पुस्तकाचे नाव - माणदेशी माणूस
लेखकाचे नाव - प्रा.रामकृष्ण जाधव
प्रकाशन व आवृत्ती- लोकायत प्रकाशन सातारा
पृष्ठे संख्या– १६७
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १८०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
८२||पुस्तक परिचय
माणदेशी माणूस
काल आज आणि उद्या
प्रा.रामकृष्ण जाधव
माणदेशी माणूस हे आमच्या लाडक्या सरांचे म्हणजेच रामकृष्ण जाधव यांचे आत्मचरित्र आहे .आम्हा दोघांना त्यांनी हे पुस्तक भेट म्हणून दिले .कॉलेजमध्ये असताना फक्त त्यांचा शिक्षकी पेशाचा आम्हाला पाहता आला पण या पुस्तकाच्या रूपातून त्यांचे पूर्ण जीवन चरित्र आम्हाला अनुभवता आलं .या पुस्तकाला प्रा . डॉ. सौ .नलिनी महाडिक सातारा यांची अतिशय सुंदर अशी प्रस्तावना लाभलेली आहे .जाधव सर आपल्या मनोगतात सांगतात, त्यांचे लिहिलेले सर्व लेखन त्यांच्या पत्नी म्हणजेच आमच्या मराठीच्या लाडक्या मॅडम शीला जाधव मॅडम या प्रथम वाचून काढायच्या .त्यांच्या घरातील सर्व सदस्य त्यांच्या लेखनाचे प्रथम वाचन करून त्यात योग्य ते सुधारणा सांगायचेत म्हणजे हे पुस्तक प्रथम त्यांच्या घरातून निर्मित व्हायचं .एकत्र कुटुंब पद्धतीचे हेच खरं मोठा यश असतं .
सातारा तालुक्यातील माण हा दुष्काळी भाग .या दुष्काळी भागातील एका मिलमजुराचा मुलगा म्हणजे रामकृष्ण जाधव .
आपल्या या आत्मचरित्रात एकूण 31 प्रकरणांमधून त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आपल्यासमोर मांडलेला आहे .
वडिलांची मातृछत्र हरपले मी परत येतोय बालपण कसे गेले बक्षीस असे मानकरी कसे ठरले आणि व्यायामामुळे त्यांना मिळालेली वाहवा हे त्यांनी प्रकरणातून खूप सुंदर येत्या मांडलेले आहे .
खडतर शिक्षण घेतल्यानंतर मी इंग्लिश स्कूल बिजवडी येथे प्रथमतः शिक्षक म्हणून नेमणूक झाली .रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक देशाचा प्रवास सरांचा इथून सुरुवात झाली .नोकरी करत असतानाच त्यांनी आझाद कॉलेज सातारा येथे बीएड पदवी प्राप्त केली .
आणि सरांच्या भरभराटीस सुरुवात झाली .
सरांनी स्वतः आपल्या शाळेतील लेकरांसाठी खूप कष्ट घेतले .अनेक होतकरू हुशार विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांनी दत्तक घेतले .आपल्या मुलांनाही उच्चशिक्षित केले .स्वतःचा छोटा मुलगा याला कर्नल केले .
आदरणीय सरांनी फक्त स्वतःचा विचार न करता गावासाठी ही अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्य केले .त्यांची जडणघडण त्यांच्या झालेल्या प्रवास त्यांनी केलेले सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हे उत्तुंग आहे .ते तुम्हाला अभ्यासायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे .
प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना म्हणतात,
साताऱ्यातील शाहपुरी परिसर हा शिक्षक आणि शिक्षणप्रेमी मंडळींमुळे संपन्न झाला आहे. प्रा.आर.बी.जाधव हे शाहपुरीतील एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. सदैव कार्यमग्न हे त्यांचे वैशिष्ट्य. या माणसाचे वय वाढते आहे, यावर चटकन कोणाचाच विश्वास बसणार नाही. कदाचित माझ्या डोळ्यासमोर ते सदैव हिंडताना दिसत असल्याचा तो परिणाम असावा. माझ्या सकाळच्या फिरण्याच्या वाटेवर जाधव दांपत्य सदैव भेटते. प्रा. सौ. शीलाताई या त्यांच्या सहधर्मचारिणी. विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घडावे, तसे त्यांचे दर्शन मला घडत असते. शीलाताई या लेखिका व कवयित्री आहेत. दोघेही विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. आपल्या अध्यापक विद्यालयातील गरीब, होतकरू विद्याथ्यर्थ्यांना आर्थिक हातभार देऊन ते करूणेला कृतीची जोड देत असतात. मुळात प्रा. जाधव हे गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आले. मॅट्रिक होऊन लष्करात भरती व्हावे, ही त्यांची इच्छा. पण शिक्षणाच्या वाटेवर प्राचार्य शिवाजीराव भोसले भेटले आणि जाधवांची वाट रणांगणाऐवजी ज्ञान मंदिराकडे वळली. आणि येथूनच त्यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रवास हा अखंड सुरू राहिला आणि तोही अजूनही सुरूच आहे.
दहिवडी येथे श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेची उभारणी करून एक सुंदर अशी शाळा त्यांनी निर्माण केली आज त्या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .निस्वार्थ भावनेने केलेली त्यांनी ही सेवा नक्कीच या विद्यार्थ्यांच्या रूपाने विविध क्षेत्रात नावारूपाला येईल .वर्तमानपत्रातूनही त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडण्यात आला .आदरणीय रामकृष्ण जाधव सरांच्या कार्याला माझे शतकोटी नमन .
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment