वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ८१
पुस्तकाचे नाव - मराठी चरित्रात्मक कादंबरीतील महात्मा फुले
लेखकाचे नाव - डॉक्टर नूतन लोणकर नेवसे
प्रकाशन व आवृत्ती- गोंदन क्रिएशन्स पुणे
पृष्ठे संख्या– २००
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २८०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
८१||पुस्तक परिचय
मराठी चरित्रात्मक कादंबरीतील महात्मा फुले
डॉ. नूतन लोणकर - नेवसे
विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा फुलेंनी सांगितलेले हे विचार खरोखर सर्वांसाठी लागू पडतात आम्हा महिलांसाठी त्यांनी हातात दिलेली लेखणी या लेखणीचच आज शस्त्र म्हणून सर्वत्र ती चौफेर प्रगती करत आहे त्यापैकी या पुस्तकाच्या लेखिका आदरणीय नूतन ताई यांनी या विषयावर संशोधन करत छान पैकी प्रबंध सादर केला आणि त्याच प्रबंधाचे संस्कारित रूप म्हणजे हे पुस्तक आपल्या हाती आहे .अतिशय सुंदर असे हे पुस्तक वाचताना मला मनोमन आनंद होत होता .आपणही संशोधन क्षेत्रात असं काहीतरी करावं याची प्रेरणा या पुस्तकातून मिळाली आणि मीही माझे संशोधन लवकर पूर्ण करेल असं मनोमन ठरवलं .पुस्तकाला रवींद्र ठाकूर यांनी छान प्रस्तावना दिलेली आहे .प्रबंधातच पुस्तक रूप झाल्यामुळे या पुस्तक पाच प्रकरणात विभागला गेला आहे .आणि या सर्व विभागातून त्यांनी आपले संशोधन आपल्या सर्वांपुढे मांडलेला आहे .क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव हे लेखिकेचे आजोळ आणि नंतर झालेले सासर आहे .त्यामुळे अतिशय संशोधनाचा अभ्यास करून अतिशय अभ्यासपूर्ण असा ग्रंथ हा लेखन केलेला आहे .महात्मा फुले यांच्यावर प्रकाशित झालेल्या विविध कादंबऱ्यांचा अभ्यास करून त्यांनी हे लेखन केलेले आहे .नूतन न्यू से या स्वतः फुलेवादी विचारांनी भारवलेले आहेत आणि आपल्या लेखनाच्या माध्यमातून ही वैचारिक परंपरा त्या पुढे नेऊ पाहत आहेत .
या पुस्तकाला प्रस्तावना दिलेले डॉक्टर रवींद्र ठाकूर आपल्या प्रस्तावनेत या पुस्तकाविषयी सांगताना म्हणतात,
प्रस्तुत ग्रंथाच्या 'चरित्रात्मक कादंबरीः स्वरूप व संकल्पना' या पहिल्या प्रकरणामध्ये चरित्र आणि कादंबरी हे दोन स्वतंत्र साहित्यप्रकार असून त्यांचा संकर होऊन चरित्रात्मक कादंबरीची निर्मिती झाली आहे असा विचार त्यांनी मांडला आहे. या प्रकरणामध्ये चरित्र स्वरूप व व्याख्या, - कादंबरी स्वरूप व व्याख्या तसेच चरित्र आणि कादंबरी यामधील निवडक घटकांचा समन्वय - चरित्रात्मक कादंबरीमध्ये कसा घडतो या विषयाचा आढावा घेतला गेला आहे. १९६० नंतरच्या काळात चरित्रात्मक कादंबरीची निर्मिती अधिक प्रमाणात झाली हे प्रकर्षाने जाणवते. या कालखंडात लिहिल्या गेलेल्या एकूणच कादंबऱ्यांचा आढावा घेत म. फुले यांच्या जीवनावर जेवढ्या चरित्रात्मक कादंबऱ्यांची निर्मिती १९६० ते २००२ या कलखंडात झाली त्या सर्वच कादंब-यांचा आढावा घेतला गेला आहे. समाजसुधारकांविषयी वाटणारा आदर व श्रद्धाभाव, ब्रिटीश काळापासून झालेले चरित्र लेखन, इतिहासाचा अभिमान व समाजसेवेची शिकवण देणे, चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे इत्यादी प्रेरणांमधून चरित्रात्मक कादंबऱ्यांचे लेखन झाले आहे. या सर्व वैशिष्ट्यांचा आढावा श्रीमती डॉ. नूतन लोणकर यांनी विस्तृपणे घेतला आहे.
'महात्मा फुले व्यक्ती आणि वाङ्मय' या प्रकरण दुसऱ्यामध्ये महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण कशी झाली याविषयाचा आढावा त्यांनी घेतला आहे. म. फुले हे एका सामान्य कुटुंबात जन्मले असले तरी त्यांचे कार्य मात्र असामान्य असेच होते. म. फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे समाजकार्यासाठी वाहून घेतले होते, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या विरुद्ध त्यांनी आवाज उठविला. त्याचबरोबर त्यांच्या वाङ्मयाने समाजप्रबोधनाचा वसा घेतलेला दिसून येतो. इ.स. १८५५ ते १८८९ या काळात त्यांनी विविधांगी स्वरूपाचे लेखन केले.
परिवर्तनशीलता, वास्तवता, बुद्धिनिष्ठता, भाषेतील परखडपणा आणि संवादात्मक शैली या गुणांनी त्यांच्या साहित्याला परिपूर्णता लाभली आहे. तसेच वाङ्मयीन गुणवत्ताही प्राप्त झाली आहे.
'महात्मा फुले ह्यांच्यावरील चरित्रात्मक कादंबऱ्याचे सामाजिक मूल्यमापन' या तिसऱ्या प्रकरणामध्ये 'झुंझार', 'प्रभंजन', 'करुणासागर', 'महात्मा', 'महामानव ज्योतिराव फुले या कादंबऱ्यांमधून आलेल्या महात्मा फुले यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेण्यात आलेला आहे.
महात्मा फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबऱ्यांचे मूल्यमापन या चौथ्या प्रकरणात कादंबऱ्या साकारल्या जात असताना त्यांची लेखन शैली आणि आकलन पद्धती कशी वेगवेगळे ठरते हे त्यांनी दाखवून दिले आहे. नूतन लोणकर यांचा हा ग्रंथ खरोखर महात्मा फुले यांचे विषयी अभ्यास करणाऱ्या सर्वांनाच प्रेरक असा आहे. त्यांनी केलेले संशोधन काढलेले निष्कर्ष हे आपल्यालाही अभ्यास करायला प्रवृत्त करतात.
सर्वांनी वाचवा आणि अभ्यास करावा असं अभ्यासपूर्ण लेखन लेखिकेने केले आहे त्यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद.
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment