वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ४७
पुस्तकाचे नाव - कर्माची शिदोरी
लेखकाचे नाव - डॉ . अर्चना विसावे
प्रकाशन व आवृत्ती- ज्योती चंद्र पब्लिकेशन लातूर प्रथम आवृत्ती
पृष्ठे संख्या– ६६
किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
४७ ||पुस्तक परिचय
कर्माची शिदोरी
डॉ.अर्चना विसावे
कर्म = कृती, काम, आचरण
शिदोरी = प्रवासासाठी नेलेली गरजेची खाण्याची वस्तू, जे भविष्यात उपयोगी येते .
म्हणून "कर्माची शिदोरी" म्हणजे आपल्या कर्मरूपी कृतींची ती साठवलेली संपत्ती, जी भविष्यात आपल्याला उपयोगी पडते. आपण आयुष्यात जे काही सत्कर्म करतो . चांगले विचार, चांगली कामं, इतरांना मदत, तीच आपली खरी संपत्ती असते.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात, किंवा कठीण काळात, संसारिक संपत्तीपेक्षा आपले चांगले कर्मच आपल्यासोबत असतात.
आपले कर्मच आपली ओळख ठरवते. समाजात, नात्यांमध्ये, आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही.
अशाच विविध गोष्टींमधून माझी मैत्रीण लेखिका आदरणीय डॉक्टर अर्चना विसावे मॅडम यांनी कर्माची शिदोरी या पुस्तकातून मांडले आहे .खरे तर एक शिक्षक गुरु म्हणून विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न करत असतो .याच विद्यार्थ्यांच्या चांगल्या कर्मातून आम्हा शिक्षकांना त्याचा प्रसाद मिळत असतो .हे झालं आमचं पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे चांगले कर्म त्याच्या आयुष्यभराची शिदोरी बनत असतात .पैसा काही कोणीही कमवत आणि पैसा कसाही घालवता येतो पण नाव कमावणं आणि आपलं नाव टिकवणे खूप गरजेचं असतं .आणि हे नाव कमवून कोणालाही सहजासहजी जमत नाही .अर्चना मॅडम यांनी आपल्या शुद्ध शैलीतून अतिशय सुंदर रित्या अशीच कर्माची शिदोरी सर्व वाचकांसमोर शब्दबद्ध करून एक मेजवानी म्हणून ठेवलेली आहे .याच मेजवानीचा मी रुचकर आणि आनंदाने आस्वाद घेतला .माझे मन ही कर्माची शिदोरी वाचून तृप्त झाले .
अर्चना मॅडम यांनी या पुस्तकात एकूण सोळा चिंतन कथा दिलेल्या आहेत. प्रत्येक कथा ही एका वरचढ एक आहे काहीतरी चांगलं उद्बोधन देणाऱ्या या प्रत्येक कथा मानवाच्या मनाला नक्कीच वाचनाची भुरळ घालतात.
त्या चिंतन कथा अनुक्रमे
१. माझे देवाला पत्र
२. मन
३. विचार मनातला
४. शिकवण मनाची
५. मोल जीवनाचा
६. रहस्य जीवनाचे
७ .आत्म्याचे वस्त्र
८. स्वस्त आणि सुंदर जगणं
९. जीवन एक खेळ
१०. दिसणं की असणं ?
११. मार्ग दोन पण निवड स्वतःची
१२. सामान की समाधान ?
१३. विज्ञान आणि अज्ञान
१४. संसारसुख की संसारात सुख?
१५. अंतःकरण शुद्ध की मलीन ?
१६. मित्र ईश्वराचा
अशा आहेत. सर्व चिंतन कथा खूप सुंदर आहेत
यातील चिंतन कथा सर्वच खूप सुंदर आहेत कोणा एकाची निवड करून तुम्हाला सांगणार अगदी असह्य होऊन जातं .तरी मला त्यातल्या त्यात आवडलेल्या ह्या कथा खूप सुंदर आहे.
"कर्माची शिदोरी" या पुस्तकातील "मार्ग दोन पण निवड एक" या चिंतनगाथेत लेखिकेने प्रत्येक पैलू उलगडून दाखविलेला आहे.
प्रत्येकाकडून आपल्या Valuesचे कौतुकाची अपेक्षा करणे म्हणजेच मुर्खपणा होय त्याचा त्रास स्वतःलाच होतोः ज्याच्याकडे त्या values आहेत त्या व्यक्तीकडे ते पाहण्याची दृष्टी आहे. चांगल्या संस्कारातून आयुष्यातल्या अनुभवांनी सजले की रांगोळी शोभून दिसते आणि हे आपल्यावरच अवलंबून असते. जीवनाच्या प्रवासाकडे जेव्हा मी एक खेळ म्हणून बघते त्यावेळी एक गंमत वाटते खेळाडूचा खेळ संपला की तो out होतो अगदी तसेच जीवनातल्या, प्रवासातल्या खेळाडूच्या बाबतीतही आहे जीवनातून Allout होण्याआधी स्वप्नांना जगण्यात उराशी बाळगलेल्या ध्येयाला गाठण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नात एक नवे जीवन अनुभवायला मिळत असते
जीवनाच्या जन्मापासून मृत्युपर्यंतचा प्रवासच एक अनुभूव आहे.गोड आणि कडू अनुभवांचा हा प्रवास "मार्ग दोन पण निवड स्वतःची" ठरवायची आहेः विचारांमध्ये स्पष्टता नसेल तर त्याचा परिणाम आपल्या निर्णय क्षमतेवर होतो.
'कर्माची शिदोरी "च्या पुस्तकातून "सामान की समाधान "या चिंतनगाथेतून द्वंद्व सोडविण्याचा प्रयत्न. लेखिकेने केलाआहे आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे समजून घेऊया.
"मौत कभी पुछकर नहीं आती, इसलिए अपनी जिंदगी का reord हमेशा clear रखो "आजकालच्या Internet च्या युगात माणसांच्या मृत्यूनंतर What's up, status ला फुल आणि दिवे लावून त्या माणसाच्या फोटोखाली लिहिले जाते I miss you--- पण त्या गोष्टीचा नंतर काय उपयोग "माणसे जीवंत असेपर्यंत With u... म्हणत चला, माणसाच्या मृत्युनंतर काय म्हणत बसायच Miss u....!
"पैसा- सामान ला सकता है, सुकून नहीं।" माणसे पैशाने भरपूर श्रीमंत होत असतांना त्यांना
मनाची श्रीमंती मात्र गहाण ठेवावी लागत आहे. सध्याच्या पिढीचे एक म्हणणे आहे "पैसा भरपूर आला घर, गाडी, बंगला, सोने सर्वकाही आहे माझ्याकडे तरीही मी समाधानी नाही, मन सुखी,आनंदी नाही." अशाप्रकारची वास्तवता याठिकाणी मांडली गेली आहे. "आपले विचार... आणि फक्त विचारच म्हणजे निर्जीव वस्तूं सुख किंवा दुःख देत नसून आपल्या मनाचा आपल्या प्रत्येक परिस्थितीमधल्या क्षणासोबतचा संवादच आपल्याला सुख किंवा दुःख देत असतो म्हणूनच हिंदी मध्ये सुभाषितकार म्हणतात " ये जिंदगी एक फिल्म की तरह है। इसफिल्म में में सबको एक-एक पात्र दिया है। उसी पात्र के हिसाब से सब अपना अपना किरदार निभाते रहे है। लेकीन फिल्म खत्म होने से पहले एक बात मन को समझानी जरूरी है। "I am Just playing the role in this movie I am Pure divine soul, playing only this role." शेवटी लेखिकेने लिहिले आहे की, मनुष्याचे शरीर हे पाण्याने आणि पोषकतत्त्वाने बनलेले आहे म्हणून त्या शरीराला पाणी आणि पोषकतत्वे पाहिजेत अगदी तसेच आत्मा सात गुणांनी भरलेला आहे. म्हणून खरे समाधान जीवनाचा अर्थ Oean of love, purity, Power, knowledge, Bliss, Peace, Happiness या सात गुणांनी मनाला
सजवल्यानंतरच मिळतो. सुखप्राप्तीसाठी आपला अभिमान आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करायला हवा व आत्म्याचा संबंध परमात्याशी
जोडायला हवा असे "संसारसूख की संसारात सुख?" या चिंतनकथेत विचार मांडले आहे. ज्याला परमात्मा प्राप्त होतो असा मनुष्य मौन होतो जेथे समानता असते तेथेच अद्वैतभाव येतो, भेदबुध्दी गळून पडने संसार सागराची उत्पत्ती भेदबुद्धी मुळेच गळून पडते अहंकार आणि ममत्व हाच संसार होय. पंचविषयांचा त्याग केल्यावरच मनुष्याला शांति प्राप्त होऊ शकते आपल्या श्वासात मंत्र,मंत्र सगळ्यासाठी, शुभ-भावना मंत्र ईश्वराच्या धन्यवादासाठीचा, मंत्र जप केल्याने आपले रक्षण होते. देवाला - नैवेद्य का दाखवतात ? त्याला भूक लागत नाही तो नित्यतृप्त आहे .आपले अन्न तो खात नाही तर तो अन्नावरचे आपले ममत्व खातो.
जीवात्मा जेव्हा देह सोडून जातो तेव्हा त्याचे सारे सगेसोयरे इथेच राहतात त्याच्यासोबत राहते केवळ त्याचे कर्म, अहंकाराचा नाश झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही म्हणून संसाराच्या आत आपण रहाव आपल्या आत संसार शिरु द्यायचा नाही
तसेच अंतःकरण शुध्द की मलीन ? याबाबत देखिल "कर्माची शिदोरी" या पुस्तकात लेखन झाल आहे ते म्हणज वाणीवर संयम ठेवला पाहिजे, गुप्तधनाचे मोल अधिक मानले जाते ते दान तुम्ही लोकांना सांगणार नाही ते तुमच्याजवळ कायम राहील, देवाला प्रदक्षिणा घालण्याचा उद्देश म्हणजे "भगवंताच्याभोवती जसे आपले शरीर फिरत असते तसेच आपले मन देखिल त्याच्याभोवती फिरत राहिले पाहिजे, क्रोध म्हणजे पेटलेले अग्निकुंड - ऐच्छिक लोभामुळे काही ना काही पाप होतेच म्हणून लोभ असावा पण तो स्वकर्माचा व ईश्वर सेवेचा, तुम्हाला मत्सर करायचा असेल तर स्वतःच्या इंद्रियांचा करा क्षमा म्हणजे सहनशीलता, मन विशाल होत जाते तशी सहनशीलताही वाढत जाते, संयमी मनुष्य विलासी मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असतो.
दिया-देना - देते रहना उससे हमारे अच्छे कर्म होते है। अहंकार से देव दानव बनते है और नम्रता से दानव देवता बनते है। मन का ध्यान रखने के लिए ध्यान
(Meditation) करना है।
शक्तीशाली ऊर्जावान व्यक्तीच ईश्वराचा मित्र बनतो "मित्र ईश्वराचा" या चिंतनगाथेत लेखिकेने सुंदर वर्णन केले आहे ईश्वराच्या खजिन्यात् ज्ञान, प्रेम, खुशी, पावित्र्य, शांति,शक्त्ती आणि आनंद आहे तो आपण जितका वापरत जावू तितका तो वाढत जाईल ईश्वराला वडीलधाऱ्या माणसांची आदर करणारी, त्यांचा मानपान ठेवणारी माणसे आवडतात फळांची अपेक्षा न करता कर्म करीत रहावे हे
ईश्वराचे ब्रीदवाक्य आहे.
"कर्माची शिदोरी" या पुस्तकात शेवटी लेखिकेने जीवन जगण्याची कला कशी असावी याबद्दल सांगितले आहे. जीवन जगण्याची एक चावी म्हणजे उद्याचा दिवस जर माझ्या जगण्यातला शेवटचा असेल तर, मी कसं जगेल हा प्रश्न.....
स्वतःला विचारण्यास सांगितले आहे?
यातूनच आपल्याला जीवन जगण्याचे महत्व समजेल Sound of silence मला ऐकू येईल आणि जगण्याच्या मुख्य गोष्टीची कास धरुन त्यावर लक्ष केंद्रित करून जीवन जगता येईल.
अशातऱ्हेने डॉ. अर्चना रमेश विसावे यांचे. "कर्माची शिदोरी" या पुस्तकाचे परिक्षण करण्यात आले आहे जे सर्वासाठी वाचनीय असे आहे त्यातुन विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण, संस्कार, स्वावलंबनाचे धडे, सत्कर्म, आचरण याविषयी माहिती मिळेल.
खरोखर ज्या लेखणीचे हे शब्द इतके अप्रतिम आहेत त्या लेखणी मागची प्रेरणा म्हणजे त्या लेखिका किती छान असतील ना !आदरणीय अर्चना मॅडमच्या लेखणीला माझे कोटी कोटी सलाम आणि त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासास खूप खूप शुभेच्छा !सर्वांनी वाचावं आणि आचरणात आणावं एवढं सुंदर पुस्तक .तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक .धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा





No comments:
Post a Comment