वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ४ ६
पुस्तकाचे नाव - ख रे खु रे आयडॉल्स
लेखकाचे नाव - संपादक सुहास कुलकर्णी
प्रकाशन व आवृत्ती- समकालीन प्रकाशन पुणे बारावी आवृत्ती 15 ऑगस्ट 2008
पृष्ठे संख्या– १९८
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
४ ६ ||पुस्तक परिचय
खरे खुरे आयडॉल्स
युनिक फीचर्स
संपादक सुहास कुलकर्णी
ज्याला जीवनात येऊन सर्वसामान्य जीवन जगण्यापेक्षा वेगळे काहीतरी समाजोपयोगी करता येते .आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कार्य केले जाते त्यावेळेस इतरांसाठी ते आदर्शवत कार्य ठरते.बरेच जण खूप छान कार्य करत असतात पण ते प्रसिद्धीपासून खूप लांब असतात .अशा लोकांचे कार्य आपल्याला माहिती होत नाही .जीवन जगत असताना आपणही काहीतरी वेगळे करावे यासाठी आपल्या डोळ्यासमोर अनेक आदर्श व्यक्ती असतात .त्यांना अनुसरूनच आपण आपलं कार्य करत असतो .असे आदर्श खरंच आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजेत . हे आदर्श आपल्यासमोर आणण्याचे काम खरेतर हे ग्रंथ करतात . म्हणून तर आपण म्हणतो ग्रंथ हेच गुरु .असंच एक छान पुस्तक मला माझ्या राज्य पुरस्काराच्या वेळी बक्षीस स्वरूपात माझी मैत्रीण प्रतिभा चौगुले यांनी भेट दिले.तेच हे पुस्तक खरेखुरे आयडॉल्स .
पुस्तक खूप छान आहे .पुस्तक हातात पडल्यानंतरच ते वाचण्याचा साहजिकच मोह होतो .या पुस्तकाची मांडणी सजावट खूप छान केलेली आहे .त्याहीपेक्षा यात निवडलेल्या खऱ्याखुऱ्या आदर्शांनी हे पुस्तक अतिशय शोभिवंत झाल आहे .या पुस्तकातून महाराष्ट्रात विधायक कार्य करणाऱ्या या हिरे माणिकांना केलेला सलाम आहे .
सुहास कुलकर्णी या पुस्तकाविषयी सांगताना म्हणतात,
शहरी ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी जमीन पर्यावरण-शेती-आरोग्य-शिक्षण-ग्रामविकास-आर्थिक सक्षमीकरण-अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे. आजच्या आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी या प्रयोग-प्रयत्नांचं मोल मोठं आहे. आपल्या देशात माहितीक्रांतीचा बराच गवगवा होत असला, तरी लोकांच्या माथी फिजूल माहिती मारण्याचा प्रकारच अधिक आहे. जगात कुठे खुट्ट झालं तर पुढच्या क्षणी त्याचा साद्यंत वृत्तांत ऐकायला पाहायला मिळतो, परंतु शेजारच्या तालुक्यातली माहिती मिळायची मात्र मारामार असते. या पुस्तकातील काही काम महाराष्ट्राला माहित असली तरी काही कामं अशीच आहेत, जी माहीत असायला हवीत. त्याप्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात गावोगावी व्हायला हवे. या पुस्तकामुळे माहितीची वरील दरी भरून काढण्यास मदत होईल, अशी आशा आहे.
हे पुस्तक तयार करण्यासाठी सुहास कुलकर्णी यांना त्यांचे मित्र परिवार यांनीही भरपूर मदत केलेली आहे यांचे आभार मानायला ते विसरले नाहीत .
या पुस्तकात एकूण 25 आदर्श व्यक्तींची माहिती दिलेली आहे .
यामध्ये डॉक्टर अभय बंग डॉक्टर राणी बंग,आनंद कर्वे,विकास आमटे,हिम्मतराव बावस्कर,मेधा पाटकर,अण्णा हजारे, शशिकांत अहंकारी, नसीमा हुरजूक, सुरेश खोपडे, सी.ए. जामगडे, नरेंद्र दाभोळकर, मनीषा म्हैसकर, वसंतराव टाकळकर, भारत पाटणकर, माधव चव्हाण, गणपतराव पाटील, नरसय्या आडम, राजू शेट्टी, पोपटराव पवार, चंद्रकांत पाठक, अशोक बंग, तीस्ता सेटलवाड, उल्का महाजन, डॉक्टर अविनाश पोळ, बी .आर. बारवाले यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. यातील काही व्यक्तिमत्व आपल्या परिचयाचे असतात पण काहींचं आपण आजपर्यंत नावही ऐकलेलं नसेल. पण त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर आपले शब्दही अपुरे पडते. एकाच कार्य वैविध्यपूर्ण आणि समाजाप्रती उदात्त भावनेच आहे.
डॉक्टर बंग या जोडीने गडचिरोली सारख्या भागात जाऊन तिथल्या महिला व बालकांच्या आरोग्यांविषयी विशेष कार्य केलेले आहे याची विस्तृत माहिती यात दिलेली आहे.
आनंद कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नातू. वनस्पती शास्त्रातील अतिशय वैविध्यपूर्ण माहिती आणि त्याचा समाज उपयोग याविषयी त्यांनी गाढा अभ्यास केला.
डॉक्टर विकास आमटे आमटे परिवारातील एक महान व्यक्तिमत्व या परिवाराबद्दल तर बोलावं एवढं कमीच आहे.
If you stand for something
you will always find
some people for you and some against you. if you stand for nothing nobody against you and nobody for you.
you will find
या ओळींमध्ये केवळ विकास आमटेंचंच नव्हे, तर साऱ्या आमटे परिवाराचं जीवनसूत्र सामावल्यासारखं दिसतं. काही चांगलं करून दाखवायचं तर बऱ्याचदा झगडावं लागतं आणि असं झगडायला त्यांची सदैव तयारी असते.
डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी विंचू दंशावर संशोधन केले आणि अनेक रुग्णांवर उपचार केले .यासाठी त्यांना खूप झगडावं लागलं आणि त्यांचा हा संघर्ष या पुस्तकात सुंदर रित्या मांडलेला आहे .
नसीमा हुरजूक यांनी स्वतः दिव्यांग असून दिव्यांगांसाठी अतिशय मोलाचे कार्य केले त्यांच्या कार्याची माहिती या पुस्तकात दिलेली आहे .नसीमा ताई खूप छान म्हणतात, आयुष्य चार भिंतीत कितपत पडण्यासाठी नसतं अपंग असलं तरी खचायचं नसतं रडायचं नसतं तर काहीतरी करून दाखवायचं असतं दुसऱ्यासाठी जगायचं असतं.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा विषयी खूपच मोलाचे कार्य केले हे आपल्या सर्वांना परिचित आहेत. आमच्या सातारा मधील डॉक्टर अविनाश पोळ यांनी बेबलेवाडी या खेडेगावाचे कसे रूप पालटले याची विस्तृत माहिती या पुस्तकात दिलेली आहे .किती सांगावं आणि किती ठेवावं अशी ही प्रत्येक व्यक्तीमत्व या पुस्तकातील माझ्यासाठी तर आदर्शवत आहेतच . प्रत्येकाचं कार्य हे प्रत्येक क्षेत्रातलं वेगवेगळ्या .आपल्यालाही आपल्याच क्षेत्रात राहून असं वेगळं काहीतरी नक्की करता येईल .दुसऱ्याचे चांगलं करता आलं नाही तरी वाईटही आपण करणार नाही एवढा तरी विचार या पुस्तकाच्या वाचनातून आपल्याजवळ नक्की येईल. पुस्तकातील प्रत्येक पान आयुष्याचा एक नवा धडा देऊन जातो .असे हे पुस्तक सर्वांनी वाचलंच पाहिजे .
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

खूप सुंदर विवेचन
ReplyDelete