वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ३९
पुस्तकाचे नाव - लूज युवर वेट
लेखकाचे नाव - ऋजुता दिवेकर
प्रकाशन व आवृत्ती- आठवी आवृती अमेय प्रकाशन पुणे
पृष्ठे संख्या– २०४
किंमत /स्वागत मूल्य-- १६५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
३९ ||पुस्तक परिचय
लुज युवर वेट
ऋजुता दिवेकर
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
वजन कमी करा मन:शांती नाही
असा मोलाचा संदेश देणारी ऋजुता दिवेकर यांचे हे सुंदर पुस्तक पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे .या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर यांची प्रस्तावना मिळालेली आहे . त्या म्हणतात , 'ऋजुताना फक्त माझ्या शरीरातच बदल घडवून आणला नाही तर माझं मन आणि आत्माही बदलला आहे रुजू त्याची भेट ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली घटना आहे.'
अमेय प्रकाशन पुणे यांनी अतिशय सुंदर रित्या या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे पुस्तकाचा कागद बांधणी अतिशय सुंदर आहे .दिवेकर मॅडमनी हे पुस्तक बेबो हे पुस्तक तुझ्यासाठी असं म्हणून त्यांना समर्पित केल आहे .
पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावना त्यानंतर लेखिकेचे मनोगत त्यानंतर साधेपणा गहन असतो पुस्तकाबद्दल थोडसं आणि हे पुस्तक कसं वाचावं याची विस्तृत माहिती दिलेली आहे .
एकूण सहा विभागात हे पुस्तक विभागलेल आहे .
विभाग पहिला
हे डायट नव्हे
या विभागात लंगनरुपी शिक्षा, उतारा डाएट, हरबल म्हणजे उत्तम ,खरंच व्यायाम आणि डायट यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो चूक संबंध असतो, शरीराची संरचना मोजणे, सगळ्यांना एकच साईज चालत नाही, लो फॅट आणि शुगर फ्री आहाराबद्दलचा सत्य, सर्व पदार्थ चांगलेच असतात मग यावर उपाय काय अशा विविध मुद्द्यांचा हात धरून अतिशय सुंदर असं विवेचन या पहिल्या विभागात केलेलं आहे .
विभाग दुसरा
या विभागात तुमच्या पोटा बद्दल माहिती घ्या याची माहिती दिलेली आहे .याशिवाय अति खाणं आणि अति खाण्याची सीमारेषा,तुमच्या पोटाला शिस्त लावा,काही सूचना,पोषक आहार घेण्याचे पाच मूलभूत नियम,सहावा नियम चित्त शांत ठेवा,पोषक द्रव्य आणि कॅलरी यांचे प्रमाण पिझ्झापेक्षा पनीर पराठा खाणं काय योग्य आहे?याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.अतिशय सुंदर असं विवेचन विविध उदाहरणे देऊन दिवेकर मॅडमनी दिलेल आहे .
विभाग तिसरा
काय खावे याचा पुनर्विचार यामध्ये सबकुछ कार्बोहायड्रेट्स योग्य कार्स निवडणे साउथ बीच डायट परिस्थिती आटोक्यात आणा आणि गुलाबजामची मजा लुटा ,प्रोटीन्स बद्दल सार काही, काय नको हाय प्रोटीन आहार, हेही चालत नाही लो प्रोटीन डाएट, योग्य प्रोटीन कशी निवडणूक ती प्रोटीन कशी खावीत आपल्या फॅट्स बद्दल सर्व काही कसं जाणून घ्यावं गोठलेली चरबी म्हणजे काय ?न गोठलेली चरबी म्हणजे काय? चरबी युक्त पदार्थ आहाराचा अनिवार्य घटक कशाप्रकारे आहे याची माहिती दिवेकर मॅडमनी दिलेली आहे .जीवनसत्व आणि खनिज द्रव्य याचीही विस्तृत माहिती या विभागात त्यांनी दिलेली आहे . आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे किती पाणी पिले पाहिजे याचीही विस्तृत माहिती या विभागात दिलेली आहे .
विभाग चौथा
योग्य आहाराची चार तत्व
विभागात एकूण चार तत्वांची त्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे ही तत्त्व नक्की कोणती आहेत ती आपल्याला नक्कीच वाचून समजतील अतिशय सुंदर असे विवेचन या विभागात दिलेल आहे .
विभाग पाचवा
जाणीव अंगी बनवणं
अगदी बरोबर अंगात जाणीव बनवल्याशिवाय काहीच शक्य होत नाही या विभागात जाणिवे शिवाय माहिती व्यर्थ ही अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे त्यांनी व्यवसायिकांसाठी कोणता आहार पाहिजे त्यांची उजळणी कशी करायची अतिशय सुंदर असा सल्ला या विभागातून दिलेला आहे तुम्हाला तुमच्या शरीराला नक्की काय आवश्यक आहे याची विस्तृत माहिती त्यांनी या विभागात दिलेली आहे ज्यांना खरोखरच आपल्या तब्येतीची वजनाची काळजी वाटते त्यांनी तर हे नक्की पुस्तक वाचावे .
विभाग सहावा
ज्ञान आणि कृती यांचा मेळ
.या विभागातून त्यांनी एकूण सहा पावलांची माहिती दिली आहे .या सहा पावलांमधून तुम्हाला नक्की काय करायचं आहे याचे सुंदर विवेचन दिलेला आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला मागे खेचतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला तंदुरुस्तीच्या मार्गावर घेऊन जातील याचीही माहिती दिली आहे नक्कीच आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे आणि वजन कमी करण्यासाठी सुरुवात करायला सर्वोत्तम वेळ ही आज आता ताबडतोब असते .
सहा विभागातून अतिशय सुंदर अशी माहिती लूज युवर वेट या पुस्तकात त्यांनी दिलेली आहे .व्यायाम आपले आयुष्याचा अनिवार्य भाग आहे व्यायामाबद्दलच्या गैरसमज होते योगासन कोणती करायची चालन किती ठेवायचं याविषयी त्यांनी खूपच छान माहिती दिलेली आहे .आपल्या तब्येतीची खरोखर काळजी वाटते त्यांनी नक्की हे पुस्तक वाचून व्यायामाला सुरुवात करावी .
ऋजुता दिवेकर ही भारतातली आघाडीची डाएटीशियन आणि फिटनेस ट्रेनर आहे. बॉलिवूडमधल्या करीना, सईफ, लिसा, सोनाली आणि इतर आघाडीच्या ताऱ्यांबरोबरच अनिल अंबानींनाही तिनं मुंबई मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण दिलं आहे. २००५ चा 'बेस्ट पर्सनल ट्रेनर' पुरस्कार तिला मिळाला होता. पोषणशास्त्र, क्रीडाशास्त्र आणि योगाभ्यास यातली ती तज्ज्ञ आहे.
तेव्हा हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं .
धन्यवाद .
✒️📚
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment