वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ३८
पुस्तकाचे नाव - त्या तरुतळी
प्रकाशन व आवृत्ती- साहित्य प्रसार केंद्र नागपूर 31 मे 2020 प्रथम आवृत्ती
पृष्ठे संख्या– १३०
किंमत /स्वागत मूल्य-- १७५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
३८ ||पुस्तक परिचय
त्या तरुतळी
डॉ .अश्विनी देहाडराय नागपूर
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
त्या तरुतळी
प्रत्येकाच्या आयुष्यात माहेरची सावली धरणारे असे एक झाड असतं .त्या झाडाखाली त्याच्या सावलीत आपण अगदी निश्चित असतो .अशाया झाडाझुडपांनी आपला आयुष्य जीवन हिरवंगार होतं . त्या तरुतळी हे पुस्तक माझी मैत्रीण आणि बहीण असणाऱ्या डॉक्टर अश्विनी देहाडराय यांची पहिली साहित्यकृती .ही माय मराठी जणू काही हिरवीगार साजलेले नाही एक तरू असून आम्ही सर्वजण तिची लेकरेच आहोत .म्हणूनच तिच्या छत्र छायेखाली आमच्या लेखणीचा विकास हा दिवसेंदिवस होत आहे .मराठी राजभाषा दिन आज आहे या निमित्ताने मला हा पुस्तक परिचय मनोमन लिहावासा वाटला .अश्विनी मॅडमचा पहिलं साहित्यिक बाळ या पुस्तक रुपी जन्माला आल .आणि मॅडमचे लेखिका म्हणून ओळख झाली .आपल्या लेकरावरूनच तिच्या आईची ओळख होती असेच या पुस्तकावरून अश्विनी मॅडमची एक सिद्धहस्त लेखिका म्हणून सर्वत्र ओळख झाली .तिच्या या पुस्तक रुपी लेखणीला माझा मनोमन सलाम .आणि माझ्या माय मराठी ला मानाची वंदना .तुझीच आम्ही लेकरे तुझीच बोटे पकडून चालतो पुढे पुढे .
या पुस्तकात मारुती चित्तमपल्ली यांच्या साहित्याचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळणार आहे .अतिशय सुंदर अशा या पुस्तकाची निर्मिती मॅडमनी केली आहे .साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी नागपूर यांनी या पुस्तकाला मूर्त रूप दिले .नुकतीच मी नागपूर भेटीला गेली असताना हे पुस्तक नकळत सस्नेह भेटीतून माझ्या पदरी आले . जशी माय मराठी आपली आई तशी जन्म देणारी ही आपली आई अशा जन्मदात्री आईला हे पुस्तक लेखिकेने समर्पित केल आहे .त्याबरोबर लेखिकेला कायम मार्गदर्शन करणारे त्यांची काका या दोघांनाही हे पुस्तक समर्पित आहे .अश्विनी मॅडम मराठीच्या शिक्षिका म्हणून एका मोठ्या शाळेत कार्यरत आहेत .जिथे इंग्रजीचे बाळकडू पाजले जाते तिथे आमच्या लेखिका मराठीच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत ही मोठी अभिमानास्पद गोष्ट .
मारुती चितमपल्ली यांच्या जीवनावर आणि त्यांच्या साहित्यावर आधारित हे पुस्तक आहे .आपल्या सर्वांना मारुती चितमपल्ली सुपरिचित आहेत .निसर्ग पशुपक्षी झाडे हे सर्व त्यांचा आत्मा आहेत .मारुती चित्तमपल्ली यांचा अभ्यास करून लेखिकेने स्वतःच्या शब्दात मारुती चित्तमपल्ली यांना साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे .खरोखर निसर्ग हाच सर्व काही आहे आपण त्याचा एक भाग आहोत .निसर्ग नसेल तर आपले जीवन नसल्यासारखेच .आपल्या मनोगतात लेखिकेने पुस्तक कसं नावारूपालाल याविषयी विस्तृत माहिती दिली आहे .कौटुंबिक साथ एका स्त्रीला तिच्या जडणघडणीत किती महत्त्वाची असते हे त्यावरून दिसून येते .
एकूण सात प्रकरणात हे पुस्तक विभागले गेले आहे .यामध्ये
१. मारुती चितमपल्ली यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व
२. वृक्षवल्ली आम्हा सोयरी
३. प्राणिजगत
४. पक्षी जाय...
५. सर्पसृष्टी आणि कृमी-कीटक
६. सहवास निसर्गाचा
७. समारोप
हे सात विभाग प्रकरणे केलेली आहेत .
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळवीती ।
संत तुकारामांनी लिहिलेले अभंगातून सृष्टी विषयी असलेली आपली ओढ अगदी स्पष्ट होते अशीच ओढ मारुती चित्तमपल्ली यांना या निसर्गा विषयी होते .लेखिका त्यांच्याविषयी लिहिताना म्हणतात वन महर्षी पक्षी वेडा वन ऋषी अरण्य यात्री अशी अनेक विशेषणे त्यांना नकळत चिकटलेली असावीत .पण अधिकारी भरपूर झाली खूप आहेत पण आपल्या मनात खात्यातील सेवेचा उपयोग समाजासाठी साहित्यासाठी ते किती करतात त्या पार्श्वभूमीवर मारुती चित्तमपल्ली यांनी केलेलं कार्य हे ठळकपणे दिसून येतं .
या पुस्तकाच्या सर्व प्रकरणातून अतिशय सुंदर असा लेखाजोखा लेखिकेने घेतलेला आहे .तुम्ही हे पुस्तक वाचलं की तुमच्या नक्की लक्षात येईल .ज्यांना ज्यांना मारुती चित्तमपल्ली यांच्या विषयी विस्तृत माहिती हवी त्यांनी तर हे पुस्तक नक्की वाचायला हवं .शेवटच्या समारोपाच्या प्रकरणात लेखिका अतिशय उत्कट भावनेने चित्तमपल्ली यांच्या विषयी लिहिताना दिसतात .आपल्या शेवटच्या ओळीत त्या लिहिताना म्हणतात,
एका हिरव्याकंच मनाने टिपलेला हा निसर्ग शब्दबद्ध झाल्यामुळे निर्माल्य न होता ताजेपणा टिकवून अभिव्यक्त होतो. निर्माल्य होणारे लेखन केव्हाच विस्मृतीत जाते. चितमपल्ली हे डोळसपणाने त्यापासून दूर राहतात. म्हणूनच त्यांच्या निर्मितीला चिरंतनाचे वरदान लाभते, असे मला वाटते.
या ओळींवरूनच या पुस्तकातील लेखन किती उच्च दर्जाचे असेल ते आपल्याला दिसतं .नक्की हे पुस्तक वाचा आणि यावर अभिप्राय लिहा .डॉक्टर अश्विनी देहाडराय यांच्या लेखन प्रवासास माझ्या वसंत पंचमीतील रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक शुभेच्छा💐🌹धन्यवाद .
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment