वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ४०
पुस्तकाचे नाव - अपघात आणि आपण
लेखकाचे नाव - योगेश बाग
प्रकाशन व आवृत्ती- आकांक्षा प्रकाशन पुणे चतुर्थ आवृत्ती
पृष्ठे संख्या– २२४
किंमत /स्वागत मूल्य--२५० ₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
४० ||पुस्तक परिचय
अपघात आणि आपण
योगेश बाग
अपघात हा चार अक्षरी शब्द किती भयंकर आहे ! एका क्षणात तो होत्याचे नव्हते करतो!
अपघातात एखाद्याचा नुसता एक पाय जातो, पण प्रत्यक्षात तो माणूसच निकामी बनतो. तो कुटुंबाचा पोशिंदा असेल तर? त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त होते. कुटुंबाचा पोषणकर्ता स्वतःच लाचार बनतो. जन्मभर लोकांच्या दयेवर दिवस काढण्याची पाळी त्याच्यावर येते. पोषणकर्त्याची ही स्थिती, मग त्याच्या कुटुंबाची अवस्था काय होत असेल? एखाद्या कुटुंबातील एकुलते एक मूल अपघातात जाते, तेव्हा त्याच्या आई-वडिलांचे आयुष्य कायमचे दुःखी बनते.
Accident brings tears Safety brings cheers
असे सुंदर विधान या पुस्तकात सुरुवातीला दिलेलं आहे .
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी काहीतरी अपघात होत असतात हे अपघात होत असताना आपण कोणती काळजी घ्यावी याची विस्तृत माहिती अपघात आणि आपण या पुस्तकात दिलेली आहे. अपघात आणि आपण योगेश बाग यांनी लिहिलेले हे पुस्तक अतिशय सुंदर आहे या पुस्तकाला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची प्रस्तावना मिळालेली आहे.
योगेश बाग मोटार वाहन निरीक्षण आहेत त्यामुळे त्यांना रस्ते अपघाताची सर्व माहिती आहे.
आता अपघात कोणकोणत्या प्रकारचे होतात हे आपण पाहू आणि काय काळजी घेतली पाहिजे . याचीही थोडक्यात माहिती घेऊया .
अपघात आणि आपण – एक विस्तृत माहिती
अपघात म्हणजे एखादी अनपेक्षित, अनियंत्रित, आणि अनिवार्य घटना ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक, किंवा मालमत्तेची हानी होऊ शकते. अपघात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी होऊ शकतो – रस्त्यावर, घरी, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक स्थळी.
अपघातांचे प्रकार:
रस्ते अपघात:
वाहनांची धडक, चुकीचा वेग, नियमभंग, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, खराब रस्ते इत्यादी कारणांमुळे होणारे अपघात.
औद्योगिक अपघात:
कारखान्यात यंत्रसामग्रीची चुकीची हाताळणी, सुरक्षा साधनांचा अभाव, अपुऱ्या प्रशिक्षणामुळे होणारे अपघात.
घराबाहेरील अपघात:
उंचावरून पडणे, विजेचा धक्का, गॅस गळती, आगीचे अपघात इत्यादी.
नैसर्गिक आपत्तीजन्य अपघात:
भूकंप, पूर, वादळ, दरड कोसळणे यामुळे होणारे अपघात.
अपघातांची कारणे:
मानवी दुर्लक्ष (carelessness)
नियमांचे उल्लंघन
तांत्रिक बिघाड
नैसर्गिक कारणे
मानसिक तणाव, थकवा, झोप कमी होणे
अपघातांची परिणाम:
शारीरिक इजा (हाड मोड, रक्तस्त्राव, कायमची अपंगत्व)
मानसिक धक्का
आर्थिक नुकसान
मृत्यूची शक्यता
कुटुंबावर भावनिक आणि आर्थिक भार
अपघात टाळण्यासाठी उपाय:
वाहन चालवताना:
ट्राफिक नियमांचे पालन करणे
हेल्मेट, सीट बेल्ट वापरणे
मद्यप्राशन केल्यानंतर वाहन न चालवणे
वेगावर नियंत्रण ठेवणे
घरात आणि कामाच्या ठिकाणी:
सुरक्षाविषयक उपाययोजना करणे
योग्य प्रशिक्षण घेणे
विद्युत उपकरणे काळजीपूर्वक वापरणे
आपत्ती व्यवस्थापन:
आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण
फायर ड्रिल्स, प्राथमिक उपचार ज्ञान असणे
आपण काय करू शकतो?
अपघातग्रस्त व्यक्तीला शक्य तितकी तात्काळ मदत करणे
तातडीची वैद्यकीय मदत बोलावणे
प्राथमिक उपचार (First Aid) देणे
जागरूकता निर्माण करणे – शाळा, कॉलेज, समाजात जनजागृती मोहीम
ही सर्वसाधारण माहिती अपघाताची झाली .या पुस्तकात एकूण 25 भागात सर्वकाही उत्तम होत माहिती दिली आहे .यामध्ये अपघात वाहन चालक वाहन रस्ता वाहन चालकांच्या अंगी आवश्यक असणारे गुण वाहतुकीचे चिन्ह मोटार वाहन कायद्यातील काही महत्त्वाची कलमे वळण घेण्याची तंत्र आरशांचे महत्व अपघात कसे टाळावेत आणि बनीचे प्रथम मी ड्रायव्हिंग कसे करावे रात्रीचे ड्रायव्हिंग करताना भेटी आणि उपाय कोणते असतात म्हणून चालकांमधील वाढते आक्रमकता रोड ड्रेस सुरक्षित ड्रायव्हिंग कसे करावे धोकादायक व घातक रसायनांची वाहतूक करताना कोणती काळजी घ्यावी दुचाकी वाहनचालकांसाठीची सर्व काही मार्गदर्शक तत्त्वे हेल्मेट चा योग्य वापर सीट बेल्ट यांचे महत्त्व इंधन बचत कशी करावी प्रदूषण होऊ नये त्यासाठी काळजी कशी घ्यावी पालकांशी हितगुज वाहन चालकांची कुंडलिक या पुस्तकात मांडलेली आहे चालकांचे प्रशिक्षण कसं होतं आणि लायसन्स विषयी विस्तृत माहिती या पुस्तकात दिलेली आहे .म्हणजे आपल्याला रस्ते वाहतूक वाहन याविषयी सर्व नियमावली आणि माहिती या पुस्तकात भरभरून मिळते प्रत्येक पानाच्या खाली वाहतुकीचे चिन्ह आणि त्याचे अर्थ यांची माहिती दिलेली आहे .तेव्हा रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं .
शेवटी आपला आयुष्य आपल्याच हातात आहे.
A good driver's indication
Care,courtesy and consideration.
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment