Wednesday, January 1, 2025

पुस्तक क्र ३ ७ स्वातंत्र्यलढ्यातील कवने

 



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ३६

पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यलढयातील कवने

संपादक -राजा मंगळवेढेकर

प्रकाशन  व आवृत्ती-  १९९२ . आवृत्ती ३री 

पृष्ठे संख्या–  १०५

किंमत /स्वागत मूल्य-- ८५₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

३ ७ ||पुस्तक परिचय 


स्वातंत्र्यलढ्यातील कवने🇮🇳🚩


इंग्रजांच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला . परक्या इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. जगाच्या नकाशात गुलाबीचा रंग बसून आणि स्वातंत्र्याचा मंगल लादी मारून एक सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र म्हणून तो उदित प्रतिष्ठित झाला .परंतु हा महान मंगल दिवस काही सुखा सुखी उजाडलेला नव्हता . या उजाडण्याच्या मागे त्याने पर सत्तेशी दिलेल्या प्रदीर्घ झुंजीची इतिहास होता. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचा प्राणवायूच ! इंग्रजांची सत्ता या देशात रुचली वाढली आणि सुमारे दीडशे वर्षाहून अधिक काळपर्यंत भारतातला हा प्राणवायु लुप्त झाला होता. गुलामगिरीच्या वातावरणात गुदमरलेले जीवन त्यांच्या वाट्याला आलं हा काळ कठीण आणि खडतर खरंच पण या काळातही स्वातंत्र्याचा प्राणवायू परत मिळवण्याची भारतीयांतची धडपड चालूच होती आणि या धडपडीची पहिली ठिणगी पेटली ती 1857 साली पहिल्या स्वातंत्र्य युद्धात !

या पुस्तकाचे संपादक आदरणीय राजा मंगळवेढेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात अतिशय परखड आणि समर्पक शब्दात या पुस्तक निर्मिती मागचं महत्त्वाचं कारण लिहिलेले आहे .अतिशय पोट तिडकीने ते आपल्या स्वातंत्र्याबद्दल लिहिताना दिसतात .स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे .अलीकडे मात्र या स्वातंत्र्याचा स्वैराचार होताना दिसत आहे .त्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे पुस्तक अतिशय स्फूर्तीदायक आणि देशभक्तीपर अशी कवने या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतील .

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडणारा तो काळ आठवला तरी अंगावर शहारे उभे होतात .त्या काळातील स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या या क्रांतिवीरांनी समाज सुधारकांनी किती हाल अपेष्टा यातना सोसल्या असतील याची प्रचिती येते .

खरोखरच तो काय तसा मंत्रलेला होता स्वातंत्र्याच्या भावनेने भारावलेला होता देशावरचा पारतंत्र झुगारून देण्यासाठी काहीतरी करावं असं मनोमणी वाटणार होता आबालवृद्धात एक प्रकारची चैतन्य लाटत उचंबळून आलेली होती .

या चैतन्याचा अविष्कार विविध रूपाने विविध अंगाने विविध रंगांनी फुलून येताना दिसत होता अशा कुठल्याही दिव्य भव्य अविष्कारात गीत गाण्यांना आणि कवितांना त्यांचे एक असं वेगळ स्थान असतं .अशाच गाण्यांमधून आपल्या अव्यक्त भावनांना हुंकार फुटतो आणि हीच गाणी आपलीशी होऊन जातात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग होतात .यालाच आपण गीत संस्कार असे म्हणतो .

अशाच विविध स्वातंत्र्यलढ्यातील गीत गाण्यांवरचं हे स्वातंत्र्य लढ्यातील कवने पुस्तक खूप प्रसिद्ध आहे .अनेक दिग्गज कवींनी यामध्ये आपली कवने लिहिलेली दिसून येतील .या पुस्तकाचे संपादक राजा मंगळवेढेकर यांनी अशाच स्वातंत्र्यलढ्यातील विविध गीतांचा गाण्यांचा संग्रह एकत्र केला आणि त्याला हे पुस्तक रुपी मूर्त स्वरूप लाभले .

मराठी काव्यप्रांतात आधुनिक कवितेची 'तुतारी' फुंकली ती केशवसुतांनी. केशवसुती कवितेचं वळण हे तत्पूर्वीच्या संत, पंत किंवा तंत यांच्या काव्याहून वेगळंच आहे. हे त्यांचं वेगळंपण रचनेच्या बाबतीतच नसून ते आशयाच्या संदर्भातही असल्याचं आढळतं केशवसुतांचा 'नवा शिपाई' हा खरोखरच नव्या जाणिवांचे व नव्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. संकुचित विचार, जुन्या दुष्ट रुढी पायदळी तुडवणारा आणि जात, पात, धर्म, पंथ यांच्या बेड्या झुगारून देणारा आहे. त्याची विचारदृष्टी भव्य आणि व्यापक आहे. अवघ्या मानवतेलाच कवटाळणारी आहे. हा नवा शिपाई म्हणतोः


नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे । ब्राम्हण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा तेच पतित की जे आखडिती प्रदेश साकल्याचा । खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सूख कूपातिल मी नच मंडूक मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे । कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे ।

अशी अनेक स्वातंत्र्यलढ्यातील कवने या पुस्तकात दिलेली आहेत . कुसुमाग्रज यांना 'क्रांतिकवी' म्हणायला काहीच हरकत नाही. रचनासौंदर्य, काव्य-सौंदर्य आणि शब्दसौंदर्य यासह स्वातंत्र्यसौंदर्याचं मनोहर दर्शन घडवणारी काव्यसृष्टी कुसुमाग्रजांच्या प्रतिभेत समर्थपणानं आढळते. या काळात स्वातंत्र्यभावनेबरोबरच सामाजिक जाणीवही कुसुमाग्रजांच्या कवितेनं अधिक सुस्पष्टरीतीनं दिली. मानवतेचा भव्य संस्कारही त्यांच्या कवितेनं दिला. 'आगगाडी आणि जमीन, 'अहि-नकुल,' इत्यादी कुसुमाग्रजांच्या रूपकात्मक कवितांनी एक वेगळीच ओजस्वी दृष्टी दिली. 'कोलंबसाच्या गर्वगीता'तील शेवटच्या ओळी तर एखाद्या सुभाषितासारख्या देशभक्तांच्या तोंडी घोळत होत्या. कितीतरी तरुण देशभक्तांनी स्वतःला कोलंबसाच्या भूमिकेत पाहिले होते आणि साम्राज्याच्या उद्दाम सागराला उद्देशून म्हटले होते :


अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा


किनारा तुला पामराला !..


'मेघास' उद्देशून कुसुमाग्रजांची रूपकाच्या अंगानंच जाणारी एक कविता आहे. या कवितेतल्या पुढील ओळीदेखील तितक्याच स्फूर्तिदायक आहेतः


गर्जत ये, ओढित ये आसुड तडितेचा


गर्वोन्नत माथा तो नमव भास्कराचा


लोकाग्रणि नमवि जसा मातल्या नृपाळा !

अशी एकाहून एक सरस दिग्गज कवींची कवने या पुस्तकात दिलेली आहेत .75 गीते या पुस्तकात समाविष्ट आहेत .स्वातंत्र्य लढ्यातील सर्व इतिवृत्तान्त या कवणातून आपल्याला दिसून येतो आणि अंगावर रोमांच उभा राहतो .प्रत्येकानेच हे पुस्तक वाचावे .आपल्या स्वातंत्र्याविषयी ज्यांना माहिती हवी असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक संग्रही हवेच.राजा मंगळवेढेकर यांनी अतिशय सुंदर नजराणा या पुस्तकातून आपल्याला दिला आहे  . 🙏🏻🇮🇳धन्यवाद !



सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment