वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ३६
पुस्तकाचे नाव - झुंबर
प्रकाशन व आवृत्ती-
पृष्ठे संख्या– १२९
किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
३६ ||पुस्तक परिचय
झुंबर
काव्यसंग्रह
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
झुंबर
झुंबर हा शब्द किती सुंदर आहे. आपल्या घरातील दिवाणखान्यात हा झुंबर शोभून दिसत असतो. प्रत्येक राजवाडे ,मंदिर याठिकाणी हे झुंबर शोभून दिसत असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे यशाचे झुंबर येत राहोत. झुंबर या कवितासंग्रहाच्या कवयित्री आदरणीय शीला जाधव मॅडम या माझ्या गुरुवर्य अध्यापक विद्यालयात अतिशय सुंदर रीतीने मराठी हा विषय मला शिकवत होत्या आणि कवितेचे बाळकडू आम्ही त्यांच्याकडूनच घेतले.
झुंबर हा त्यांचा कवितासंग्रह खूपच छान आहे. एका गुरुच्या पुस्तकाचे माझ्यासारख्या शिष्याकडून परीक्षण होणे म्हणजे सागरात पाण्याचा थेंब पडण्यासारखे आहे.
आदरणीय शीला जाधव मॅडम यांच्या लेखनात आणि काव्यात एक वेगळीच ढब दिसून येते.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर असून त्यावर सुंदर अशा झुंबराचे छायाचित्र दिलेले आहे.
मलपृष्ठावर आदरणीय जाधव मॅडम यांची साथ सुंदर कविता दिलेली आहे.
साथ या कवितेमध्ये त्या व्यक्त होताना लिहितात ,
अत्तर झुंबरांनी
कोठी तेजोमय
घुंगराचे पदन्यास
क्षण क्षण नादमय
अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी साथ याबद्दल केलेले आहे.
झुंबर या कवितासंग्रहात एकूण 116 कविता आहेत. जाधव मॅडम यांचा झुंबर हा पहिलाच काव्यसंग्रह संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे. आशियाची दृष्टीने या कवितासंग्रहातील अनेक कविता खूप छान आहेत आदरणीय जाधव मॅडम यांची भाषा सहज सोपी सर्व वाचकांपर्यंत पोचणारी आहे. काही कविता गद्य स्वरूपातही आहेत. जाधव मॅडम यांनी काही कविता मुक्तछंदातही लिहिलेले आहेत त्यांच्या या कवितासंग्रहात बऱ्याच कविता या पावसावरच्या कविता आहेत. अति दुष्काळ तर कधी पाऊस असं वर्णन बऱ्याच कवितेतून दिसून येतं. विविध विषयांवरच्या त्यांच्या कविता या भावस्पर्शी आहेत.
देशभक्तीवरही त्यांनी बऱ्याच कविता यामध्ये लिहिलेल्या आहेत. काही काही ठिकाणी त्या विडंबन आणि विनोदही करताना दिसतात. रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांची महती व्यक्त करणारा पाळणा भाऊरावांचा हा पाळणाही या कवितासंग्रहात आहेत. या कवितासंग्रहात सगळ्याच कविता अर्थपूर्ण आहेत. जाधव मॅडम यांच्या काही कवितेत सामाजिक असे आणि चिंतन दिसून येते .
लहान मुलांसाठीही त्यांनी कविता लिहिलेल्या दिसून येतात. आम्ही रोज शाळेत जाणार या कवितेतून शाळेतील गमती जमती ते सांगतात.
शाळेत मजा असते की नाही
छान छान गोष्टी सांगतात बाई
डब्यात खाऊ रोज मिळतो
सारे मिळून भोजन करतो
घरी नाही कधी राहणार
शिकून मोठे मोठे होणार
अशा सुंदर कविता त्यांनी या कवित्यासंग्रहात लिहिलेल्या आहेत.
समाज बदलला तसा गावही बदलला पण जाधव मॅडमच्या मनातला गाव त्यांच्या कवितेतून आपल्याला दिसून येतो. मनातला गाव या कवितेत त्या म्हणतात,
कसे तुटले रेशीम बंधाचे धागे
मनातला गाव दूर राहिला मागे
नाही राहिली नागमोडी वळणाची वाट
आता तिथे लोकसंख्या झाली तर
लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम ही या कवितेतून त्या मांडताना दिसतात.
सर्वांनी वाचावा असा हा सुंदर कवितासंग्रह आहे.
असा हा सुंदर काव्यसंग्रह प्रत्येकाने वाचावयास हवा आणि आपल्या संग्रही ठेवायलाच हवा.
आदरणीय शीला जाधव मॅडम यांच्या लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment