Tuesday, October 15, 2024

पुस्तक क्र.३५ डॉ.ए . पी . जे . अब्दुल कलाम

 



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ३५

पुस्तकाचे नाव - डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम

प्रकाशन  व आवृत्ती-  विद्याभारती प्रकाशन लातूर

पृष्ठे संख्या–  १ २६

किंमत /स्वागत मूल्य-- १०० ₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

३५ ||पुस्तक परिचय


डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम✒️📚


       वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो पण हा दिवस एका महान व्यक्तीचा जन्मदिवस आहे आणि तो त्या व्यक्तीचा जन्मदिवस आहे म्हणूनच वाचन प्रेरणा दिन त्यांच्या नावाने साजरा केला जातो आणि ते महान व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

आदरणीय कलाम साहेबांना फोन ओळखत नाही लहानांपासून थोरांपर्यंत त्यांची पुस्तके त्यांचे कार्य हे सर्व काही प्रसिद्ध आहे. आज त्यांचा जन्मदिवस म्हणूनच त्यांच्या या पुस्तकाचे परीक्षण करण्याचा भाग्य मला या वाचन साखळी समूहात मिळालं .आदरणीय अनुसया कुंभार यांनी आपल्या या पुस्तकात कलमान विषयी अतिशय थोडक्यात पण सुंदर अशी माहिती सर्वांना समजेल अशी दिलेली आहे अब्दुल कलाम यांचेही संक्षिप्त चरित्र आणि प्रेरक विचारधन तुम्हा सर्वांसमोर ठेवताना त्यांना मनस्वी आनंद झालेला दिसून येतो .ज्यांना आजही कलाम कळले नसतील त्यांनी हे पुस्तक वाचल्यावर त्यांना नक्कीच कलमांचे कार्य किती मोठा आणि थोर होतं हे समजेल .पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक आणि बोलके आहे .एक मिसाईल मॅन आणि साधी राहणे या मुखपृष्ठावरून आपल्याला लगेच समजुन येते .मलपृष्ठावर या पुस्तकात वेचक आणि वेधक असं काय आहे याची माहिती दिलेली आहे . विद्याभारती प्रकाशन लातूर यांनी अतिशय सुंदर कागदांचा वापर करून या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे .

 कलामांच्या या पुस्तकात त्यांचे सारे जीवन चरित्र थोडक्यात रेखाटले आहे .या पुस्तकात एकूण सोळा प्रकरणे आहेत आणि शेवटी डॉ . कलाम यांचे पुरस्कार आणि मानसन्मान तसेच डॉ . अब्दुल कलाम यांची ग्रंथ संपदा याची माहिती दिलेली आहे .

पुढील प्रमाणे या पुस्तकात एकूण सोळा प्रकरणे आहेत .

१) बालपण - रामेश्वरम्चे रम्य जीवन


२) शिक्षण


३) पहिले काम व हॉवरक्राफ्ट रॉकेटस्


४) रॉकेट इंजिनीअर कलाम


५) इस्रो, सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल आणि कलाम


६) क्षेपणास्त्र निर्मितीतील सुयश अर्थात मिसाईल मॅन कलाम३०


७) पोखरण येथील अणुस्फोट


८) विद्यार्थी-तरुणांचे प्रेरणास्थान


९) डॉ. कलामांचे वृक्षप्रेम आणि कवित्व


१०) शरीराला भोजन तसे मनाला वाचन


११) मानवतावादी कलाम


१२) विविधरंगी व्यक्तिमत्त्व, नेतृत्व


१३) प्रेरक भाषणे, व्याख्याने


१४) राष्ट्रपती - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम


१५) निवृत्तीनंतरही कार्यशील


१६) डॉ. कलाम यांचे विचारधन

डॉ. कलाम यांचे पुरस्कार आणि मानसन्मान

डॉ. अब्दुल कलाम यांची ग्रंथसंपदा

अशी या सोळा प्रकरणात अनुसया कुंभार यांनी अब्दुल कलाम यांची चरित्र पर थोडक्यात माहिती दिली आहे .

भारतातील प्रमुख चार धाम या तीर्थक्षेत्रांपैकी दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील 'रामेश्वरम्' हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. चारी बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. निळ्याशार आकाशाची गहराई आणि वाऱ्यावर झुलणाऱ्या माडांची हिरवाई पांघरलेल्या या सुंदर बेटावर देश-परदेशातून हजारो लोक रामेश्वर मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तिभावाने येत असतात. अशा पवित्र तीर्थक्षेत्री, छोट्या अनुष्कोडी गावातील एका मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबात अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला.

म्हणूनच 15 ऑक्टोबर हा अतिशय प्रेरणादायी प्रेरक असा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो .आज वाचन प्रेरणा दिन म्हणून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग येथे सांगावसा वाटतो .

एकदा एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला, "सर तुम्हाला सर्वांत जास्त आवडलेली पुस्तके कोणती बरं ?" डॉ. कलाम म्हणाले, "पहिलं पुस्तक आहे डॉ. अलेक्स कॅरल यांचे 'मॅन दी अन्नोन', ज्यांना डॉक्टर व्हायचे असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे आहे. दुसरे पुस्तक आहे 'तिरुक्कुरल', जीवन सुंदरतेने जगण्याविषयी यात मार्गदर्शन आहे.  पुस्तक आहे 'लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स' लिलियन वॅटसन यांनी लिहिलेले. जीवन कसे जगावे या विषयीचे विवेचन या पुस्तकात केले आहे आणि पवित्र कुरआनबद्दल तर काय सांगू ?" अशा अनेक पुस्तकांनी त्यांचे आयुष्य घडले होते. कलामांना हिंदी, उर्दूपेक्षा तामिळ आणि इंग्रजी भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यामुळे मुस्लिम असूनही हिंदी संभाषणासाठी त्यांना दुभाषिकाची मदत घ्यावी लागत असे. बरीच पुस्तके ते स्वतः विकत घेऊन वाचत असत. त्यातील महत्त्वाचे संदर्भ, काव्यात्म ओळी यांचा उल्लेख आपल्या व्याख्यानांमधून आवर्जून करीत असत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची वर्तमानपत्रांची बिले ऑफिस खर्चातून भागवायची सोय होती, तरीही कलाम त्यांच्या घरी येणाऱ्या वर्तमानपत्रांची बिले स्वतः भरत. ते म्हणायचे, 'सरकारकडून मला वेतन मिळते तर माझ्या वर्तमानपत्रांचा खर्च सरकारने का उचलावा?' इतके प्रगल्भ विचार अब्दुल कलाम यांचे होते .आज वाचन प्रेरणा दिन असल्यामुळे वाचनाशी संबंधितच त्यांनी मांडलेले विचार आपण या पुस्तकातून या ठिकाणी घेत आहोत .

ग्रंथ आपले चिरंतन सोबती' या परिच्छेदामध्ये त्यांनी म्हटले आहे-


'चांगला ग्रंथ हाती येणं आणि तो आपल्याजवळ असणं ही बाब म्हणजे जीवनातील समृद्धतेचेच लक्षण म्हणावे लागेल. कोणत्याही देशातील समृद्धी ही त्या देशातील कलावंत व लेखक यांच्या सर्जनशीलतेवर अवलंबून असते. लेखक समाजाची सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवण्याचे काम करीत असतात. पुस्तके मनुष्याला प्रतिकूलता सोसण्यास आणि जीवनात यशस्वी होण्यास साहाय्य करू शकतात. म्हणूनच लहान मुलांना, तरुणांना एक उपदेश करून प्रोत्साहित केले पाहिजे, तो असा की, दिवसभरात केवळ पुस्तक वाचनासाठी एक तास राखून ठेवा, अवघ्या काही वर्षात तुम्ही ज्ञानकेंद्र बनाल. लोकांनी भेटीदाखल इतरांना पुस्तकं देणं ही सवयच बनवली पाहिजे. अशा रीतीने तरुण आणि समाजही ज्ञानसमृद्ध बनेल' पुढे त्यांनी आपल्या कवितेतून म्हटले आहे, - 

ग्रंथ सदैव माझे मित्र होते

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ ग्रंथांनी मला स्वप्ने दिली स्वप्नांमधून जीवितध्येये गवसली ग्रंथांनी मला ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वासानं

सज्ज होण्यास साहाय्य केलं अपयशाच्या प्रसंगी ग्रंथानीच मला धैर्य दिलं उत्तम ग्रंथ माझ्यालेखी देवदूत होते काळजाला हळुवार स्पर्श करणारे होते म्हणूनच तरुण मित्रांनो ऐका जरा ग्रंथांशी मैत्री जोडून पाहा उत्तम मित्र 'ग्रंथ'च खरा !


अशा या ग्रंथप्रेमी डॉ. कलामांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस सर्व भारतभर 'वाचनप्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.तेव्हा हे पुस्तक तुम्हाला मिळालं तर नक्की वाचा . अतिशय सुंदर अशा शैलीत आदरणीय अनुसया कुंभार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे .डॉ . ए .पी . जे . अब्दुल कलाम यांच्या कार्याला माझे करोडो सलाम🙏✒️

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment