वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२९
पुस्तकाचे नांव- किलबिलणारे विश्व
कवयित्री - सौ . शुभांगी तरडे
प्रकाशन व आवृत्ती- शब्द शिवार प्रकाशन आवृत्ती पहिली
पृष्ठे संख्या– ९२
किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२९||पुस्तक परिचय
*किलबिलणारे विश्व*
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
किलबिलणारे विश्व माझे
खुणावते मज नित्य नवे
आनंदाच्या क्षितिजावरती
चैतन्याचे उडती थवे
हास्य नवे भाव नवे
ओथंबते प्रेम सवे
ध्यासाच्या वाटेवरती
कर्तृत्वाचे पंख नवे
किलबिल हा शब्दच मोठा लेकुरवाळा आहे. पक्षांची किलबिल असो नाहीतर लहान चिमुकल्यांची किलबिल असो प्रेम आपुलकी देऊन जाते.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे . समाजापासून तो दूर राहू शकत नाही .माणसाला दुसऱ्या माणसाची गरज ही लागते पूर्वांपार चालत आलेली ही कुटुंब पद्धती आपण पाहिले असेल .कुटुंबात लहान मुलं असली की कुटुंब चैतन्याने भरलेले असते .असं मनुष्याचे तसंच इतर प्राण्यांचे आपल्या आज आवाजाने किलबिलाट करणार ही पाखर जेव्हा निसर्गात विहार त असतात .तेव्हा त्यांची देखील किलबिल आपल्याला परमानंद देते .अशीच आपल्या शब्दांची किलबिल माझी मैत्रीण सौ शुभांगी तरडे यांनी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आपल्या काव्यसंग्रहाच्या रूपातून सादर केले .नक्कीच ही किलबिल तुम्हा सर्वांच्या कानावर, मनावर , हृदयावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही .शुभांगी चा लेखनाचा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेला आहे अतिशय मार्मिक वास्तववादी असं तिचं लिखाण मनाला नेहमीच भुलवत असत . आम्ही दोघींनी कॉलेज आयुष्यात एकमेकींच्या सोबतीने बऱ्याच कविता केलेल्या आहेत .तिच्या कवितेला कोणताही विषय लागत नाही . तिला भावलं पटलं की तिने ते लिहिलं असा तिचा व्यासंग .स्वतः एक अध्यापक असल्यामुळे तिची आणि लहान लेकरांची नाळ कायमच जोडलेली .त्यामुळे किलबिलणारे विश्व तिने तिच्या लेखणीतून आपल्यासमोर प्रकट केले आहे .
किलबिलणारे विश्व हे ९२ पानांचे असून यात एकूण ७५ कविता आहेत .शब्द शिवार प्रकाशन यांनी अतिशय सुंदर असे हे पुस्तक निर्माण केलेले आहे .या पुस्तकाचे मुखपृष्ठ संजय लोखंडे यांनी तयार केलेले आहे .तर या काव्यसंग्रहातील आतील चित्रे व रेखाटने गणेश पुंडेकर यांनी केलेले आहेत .
शुभांगी मॅडमनी हे पुस्तक आपल्या आईला समर्पित केलेले आहे . त्या म्हणतात ,
जिने मला आयुष्य सकारात्मकतेने जगायला शिकवलं त्या माझ्या प्रिय आईस . . . .
त्यांच्या आईचं नाव मंदाकिनी किसन शेलार असे आहे . या कविता लेखनाच्या प्रवासात त्यांना ज्यांनी ज्यांनी मुलाचे सहकार्य केले प्रेरणा दिली त्यांचेही नाव घ्यायला त्या अजिबात विसरल्या नाहीत .त्यांच्या या कवितासंग्रहाच्या प्रकाशाला जाण्याचा योग मला आला होता त्यावेळेस मनोगतात मी त्यांच्याविषयी भरभरून बोलले होते .त्यांचे पती जयवंत यांचाही त्यांच्या या काव्यसंग्रहाच्या निर्मितीत विशेष सहकार्य नव्हे तर भक्कम पाठिंबा आहे .निसर्ग , सूर्योदय, सावली, सांज ,आभाळछाया ,नक्षत्रांची लेणे, श्रावणसरींनो ,नदी माय , रानवाटा , सकाळ अशा कितीतरी कवितेतून त्यांच्या निसर्ग डोकावताना आपल्याला दिसतो .
या निसर्ग स्मृती या कवितेत त्या म्हणतात,
झाकाळल्या सावल्या
झुळकाही मंद झाल्या
तरीही अजून वाऱ्याचा
स्पर्श तसाच आहे
निसर्गाशी त्यांची जवळीकता किती आहे हे दिसून येते .प्रत्येकालाच आपल्या जन्मभूमीचा आपल्या मायभूमीचा गर्व असतोच . म्हणूनच काय त्या आपल्या कवितेतून सफर साताऱ्याची आपल्याला घडवतात . आपल्या तालुक्याविषयी ही त्यांनी कविता केलेली आहे .पुण्यभूमी भारत या कवितेतून आपल्या भारतभूचे गुणगान गायलाही त्या विसरल्या नाहीत .आई आणि बाप यांच्याशिवाय आपण सारेच अनाथ . त्यांना या कवितेत प्रत्येकजण ओवत असतो .माझी मैत्रीण शुभांगी ही तर संवेदनशील .म्हणूनच तिच्या कवितेतून बाप आणि आई ही आपल्या सर्वांसमोर शब्दातून उभी राहते .याशिवाय प्रासंगिक समाज प्रबोधन पर असं अनेक लेखन त्यांनी केलेल आहे .मुलांच्या मनाला भावतील अशा कविताही त्यांनी आपल्या शब्दातून रेखाटल्या आहेत .त्यांच्या लेखणीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे .स्वतः हाडाचे शिक्षक असल्यामुळे मुलांच्या भावविश्वातील ,शाळेतील काही कविता त्यांनी आपल्या शब्दात रेखाटलेल्या आहेत .
माझ्या या मैत्रिणीचे लेखणी सलाम अशीच नवनवीन काव्य फुले तुझ्या लेखणीतून फुलावीत या मनोमन शुभेच्छा .
शेवटी त्यांच्याच कवितेत एक प्रेरणादायी ,आशावादी विचार त्या घेऊन येतात .आपल्या प्रार्थना या कवितेत खूपच छान देवाला मागणी घातलेली आहे . त्या म्हणतात,
स्वप्नांचे आभाळ खुलू दे जीवनी प्रयत्नांचा पिसारा फुलू दे अंगणी
देवा तुझ्या चरणी इतुकीच मागणी
देवा तुझी या चरणी इतुकीच मागणी .
धन्यवाद
सौ .अंजली शशिकांत गोडसे (शिर्के ) मर्ढे सातारा .


Thanks dear Anju...🥰
ReplyDelete