Thursday, March 21, 2024

कवयित्री कविता

 कवयित्री


कान आणि डोळे यांच्यामध्ये असणाऱ्या 

अंतराची जी करते खात्री 

तिलाच म्हणावे कवयित्री 

कल्पनेच्या विश्वात रमणारी 

आकाशगंगेलाही पृथ्वीवर

 अवतरण्यास लावणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री 

कधी इथे तर कधी तिथे हुंदडणारी

 प्रत्येकाचे भावविश्व ओळखणारी

 तिलाच म्हणावे कवयित्री 

स्वप्नातलं सारं सत्यात उतरवणारी

 सत्य सारं अलगद मांडणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री 

उच्च-नीच जातभेद न मानणारी 

तुटक्या फुटक्या वाड्यातही सौंदर्य पाहाणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री 

ताल, सूर, लयबद्धता टिपणारी 

दगडालाही देवत्व आणणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री

 शब्दांचे सामर्थ्य लीलया पेलणारी

 लेखनशैलीतून स्वतःचं वेगळेपण जपणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री 

प्रतिभेचा अमृत कलश पिणारी

 कवितेसाठीच जीवन समर्पित

करणारी 

तिलाच म्हणावे कवयित्री

✒️📖

सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के

 मर्ढे सातारा

No comments:

Post a Comment