वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२६
पुस्तकाचे नांव- पत्रास कारण की
लेखकाचे नांव- अरविंद जगताप
प्रकाशन व आवृत्ती- ग्रंथाली प्रकाशन , मुंबई, २०१९ बारावी आवृत्ती
पृष्ठे संख्या– १६६
किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२ ६||पुस्तक परिचय
पत्रास कारण की
लेखक - अरविंद जगताप
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
पत्र म्हणजे सजीव वस्तूच .येथे आपल्या भावनांना रूप देतात शब्द, रेषा आणि टिंब त्यातून व्यक्त होत जातात आपल्या मनीच्या भावना ज्या दुसऱ्या पर्यंत निश्चितच भावनिक रूपात पोहोचतात. अशाच पत्राचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे.
पत्रलेखनाला खूप छान इतिहास आहे. कागदांचा शोध लागण्याच्या आधी पत्र ही पानांवर, दगडांवर, तांब्याच्या पट्ट्यांवर, कापडावर लिहिली जात. अशा विविध माध्यमांत लिहिलेल्या पत्रांना खूप छान नाव आहेत. पानांवर लिहिलेल्या पत्रांना ‘भूर्जपत्र’ असे म्हणतात. दगडांवर काही ऐतिहासिक घटना कोरून ठेवल्या जात, त्याला ‘शिलालेख’ म्हणतात.
तांब्याच्या पट्टयांवर लिहिलेल्याला ‘ताम्रपट’ म्हणतात. याची भाषाही वेगवेगळी. असे अनेक शिलालेख/ताम्रपट आपल्या देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. प्राचीन इतिहासाच्या धड्यातही यांचा उल्लेख आहे.
आपण पाहिले मोबाईलचे योगापूर्वी पत्राला किती महत्त्व होते. अनेक सुख दुःखाच्या प्रसंगात पत्रानेच आपल्याला साथ दिली आहे. आता मात्र आधुनिक युगाच्या आणि तंत्रज्ञानाच्या कचाट्यात हेच पत्र हरवून गेलं आहे.
पत्रास कारण की या अरविंद जगताप यांच्या लेखणीतून उतरलेल्या अनेक पत्रांमधून हरवलेलं पत्र मला पुन्हा सापडल.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पत्रपेटीचे सुंदर चित्र दिले आहे . मलपृष्ठावर थोडक्यात जगताप सरांचे पत्राविषयीचे मत नोंदविलेले आहे .
अरविंद जगताप सरांनी हे पुस्तक आपल्या आईला समर्पित केले आहे आपल्या आईला ते जिजी असं म्हणत . ते म्हणतात आई मुळे मी कायमच जमिनीवर राहिलो .
चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या कार्यक्रमात अरविंद जगताप यांचं पत्र खूपच गाजलेला आहे .पत्र वाचनाशिवाय तो कार्यक्रम म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असेल .अरविंद जगताप सर आपल्या मनोगतात खूप छान म्हणतात की ,पत्रही जोडणारी गोष्ट होती .ई-मेल वैयक्तिक गोष्ट आहे . ई-मेल वाईट आहे असं नाही .पणआंतरदेशीय पत्रात आपली टिकली पाठवणारी बायको ,आपल्या लिपस्टिकचा ठसा पाठवणारी प्रेयसी ,आणि आपल्या गावातील माती पाठवणारा मित्र मी पाहिलाय .तो आपलेपणा ई-मेल मध्ये येऊ शकत नाही .म्हणून पत्र खास आहेत .अजूनही जी माणसे भेटू शकत नाही त्यांच्याशी मनातलं बोलणं आपल्याला खूप आवश्यक वाटतं .अशा जवळच्या माणसांसाठी पत्र हेच माध्यम आहे .पत्र इतिहास होतात .पत्र संदर्भ होतात .पत्र लिहिणाऱ्या माणसाच्या आयुष्याचा अभ्यास करतात .आपल्याला माहित आहे की आपला खूप मोठा इतिहास आपल्या पत्रांमुळेच कळलेला आहे .
या पुस्तकात एकूण ५० पत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे . प्रत्येक पत्र खूपच छान आणि वैचारिकतेने प्रगल्भ आहे .
गेले द्यायचे राहून या आपल्या पत्रात ते म्हणतात . जाता जाता एक गोष्ट .बरेच लोक विचारतात .आम्हाला पण मदत करायची आहे कशी करू ? मुळात ही मदत नाही .आपलं अन्न टिकवण्यात आपला सहभाग आहे . आणि प्रत्येकाने पैसे द्यावेत ही अपेक्षा नाही . तरी ती सगळ्या देशासाठी मोठी कामगिरी आहे . गाडी थांबून एखाद्या शेतकरी कुटुंबाशी प्रेमाने गप्पा मारल्या तरी खूप आहे .पैसे पुरत नसतात कधीच .झाड मात्र पिढ्यान पिढ्या जगतात .छोटी छोटी तळी, तलाव बनवता येऊ शकतात . धान्य शेतकऱ्याकडे जाऊन थोडी जास्त किंमत देऊन खरेदी करता येऊ शकत . कारण जेवढ्या शेतकऱ्यांना भेटलो त्यांचं म्हणणं होतं हा त्याला काम द्या . त्यांना फुकट मदत नकोय .
शेतकरी जीवनाविषयी त्यांच्या आत्महत्या विषयी यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर आणि वास्तव चित्रण आपल्या पत्रांमधून केलेला आहे तुम्हाला काय काय द्यायचं आहे ते त्यांच्या शैलीत खूपच छान सांगितले आहे अशीच प्रत्येक पत्र त्यांची शैलीदार आणि एकाहून एक सरस आहेत .तेव्हा सर्वांनी वाचलं पाहिजे पत्रात कारण की हे पुस्तक . धन्यवाद .
सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के
मर्ढे सातारा .

No comments:
Post a Comment