वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२४
पुस्तकाचे नांव- भारतरत्न विजेते
लेखकाचे नांव- पल्लवी आपटे
प्रकाशन व आवृत्ती- रिया प्रकाशन , कोल्हापूर, २०१६ प्रथम आवृत्ती
पृष्ठे संख्या– १६८
किंमत /स्वागत मूल्य-- २००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२ ४||पुस्तक परिचय
भारतरत्न विजेते
लेखक - पल्लवी आपटे
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे.
कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, विश्वशांती, मानव-विकास इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि त्यासाठी आपले जीवन पणाला लावणाऱ्या भारतीयाला 'भारतरत्न' हा पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये भारत सरकारतर्फे घेण्यात आला आणि २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून 'भारतरत्न' एक अमूल्य सन्मान आहे. इ. सन २०१३ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जाऊ शकतो. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत.
भारतरत्न विजेते या पुस्तकात आतापर्यंत ज्यांना ज्यांना भारतरत्न हा किताब मिळाला त्या सर्वांची विस्तृत माहिती पुस्तकात दिली आहे. मुखपृष्ठावर भारतरत्न या पुरस्काराच्या मेडलचे चित्र दिलेले आहे . मलपृष्ठावर भारतरत्न विजेत्यांची काही छायाचित्र देण्यात आलेले आहेत .हे पुस्तक हे पुस्तक रिया प्रकाशन कोल्हापूर या ठिकाणाहून प्रकाशित झालेल आहे .
सुरुवातीलाच भारतरत्न पुरस्काराची सविस्तर माहिती ,पुरस्काराचे स्वरूप मेडल कसे असते याची सुंदर माहिती दिलेली आहे . पुरस्काराचे स्वरूप ,मेडल कसे असते याची सुंदर माहिती दिलेली आहे .
या पुस्तकात एकूण ४५ भारतरत्न विजेत्यांची माहिती दिलेली आहे .
चक्रवर्ती राजगोपालाचार्य
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉ. भगवान दास
डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया
पंडित गोविंद वल्लभ पंत
महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे
पुरुषोत्तम दास टंडन
डॉ. विधानचंद्र राय
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. जाकिर हुसैन
पांडुरंग वामन काणे
लालबहादूर शास्त्री
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी वराहगिरी वेंकट गिरी
कुमारस्वामी कामराज
मदर टेरेसा
विनोबा भावे
खान अब्दुल गफार खान
मरुदूर गोपालन रामचंद्रन
डॉ. भीमराव आंबेडकर
नेल्सन मंडेला
मोरारजी देसाई
सरदार वल्लभभाई पटेल
राजीव गांधी
सत्यजित राय
जे. आर. डी. टाटा
मौलाना अबुकलाम आजाद
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
अरुणा आसफ अली
गुलजारीलाल नंदा
चिदम्बरम् सुब्रह्मण्यम्
एम. एस.
सुब्बुलक्ष्मी
प्रो. अमर्त्य सेन
जयप्रकाश नारायण
पंडित रविशंकर
गोपीनाथ बोरदोलाई
लता मंगेशकर
उस्ताद बिस्मिल्ला खान
पंडित भीमसेन जोशी
चिंतामणी नागेश रामचंद्र राव
अटल बिहारी वाजपेयी
सचिन तेंडुलकर
पंडित मदन मोहन मालवीय
वरील सर्व जणांची माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे . अतिशय सुंदर आणि वाचनीय असे हे पुस्तक आहे .आपल्या भारतातील कोणाकोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि त्यांचं कार्य कसं महान होतं याची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते .सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे हे पुस्तक आहे . आणि या पुस्तकातील एकेक कर्तृत्व भारतातील रत्नच आहेत.
तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक पल्लवी आपटे यांनी लिहिलेलं. अतिशय सुंदर आणि आपल्या ज्ञानात भर घालण्याबरोबरच आपल्या मनात त्यांच्याविषयी अभिमान आणि स्वाभिमान जागृत करणार.
सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

No comments:
Post a Comment