वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२३
पुस्तकाचे नांव- एकच मुलगी
लेखकाचे नांव- अरुण शेवते
प्रकाशन व आवृत्ती- ऋतूरंग प्रकाशन , मुंबई, २०१३ प्रथम आवृत्ती
पृष्ठे संख्या– २०७
किंमत /स्वागत मूल्य-- २५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२३||पुस्तक परिचय
एकच मुलगी
लेखक / संकलक - अरुण शेवते
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
आपल्या धार्मिक ग्रंथात लिहिले आहे “यत्र नार्यस्तु पुजयन्ते रमन्ते तंत्रज्ञ देवता” याचा अर्थ होतो की जेथे नारीचा अर्थात स्त्रीचा आदर सन्मान केला जातो तेथेच परमेश्वराचा वास असतो. परंतु वैदिक काळातील आपली ती संस्कृती आता मात्र पुस्तकांपुरती मर्यादित झाली आहे. बदललेल्या परिस्थितीची भयंकर परिणाम आपण आता सध्या पाहतच आहोत.आधुनिक भारत एवढा आधुनिक झालाय की आता याने मुलींकडून जगण्याचा अधिकार देखील हिसकावून घेतला आहे. जन्म मृत्यू परमेश्वराच्या हातात असते. परंतु आपल्यामधील काही लोक स्वतःला परमेश्वर समजत गर्भात असणाऱ्या बाळाला फक्त एवढ्यासाठी मारून टाकतात कारण ती एक मुलगी असतें .
आपले समाजात वंशाला दिवा लागतो पण वंश चालवण्यासाठी पण तिला मात्र तो विसरत जातो.
मात्र याला काही असामान्य व्यक्तिमत्व अपवाद आहेत ज्यांनी आपल्या कर्तुत्व नेतृत्वाबरोबरच सामाजिक सलोखा राखून सर्व समाजापुढे एक मोठा आदर्श दिला आहे. आणि तू आदर्श म्हणजेच स्वतःला एकच मुलगी असल्याचा तुम्हाला मी बरीच उदाहरण देईन तुमच्या या उदाहरणावरून लक्षात येईल की या माणसाकडे पैसा अडका धन दौलत गाडी यांची कशाचीच कमतरता नाही तरीही त्यांनी आपल्या पोटी एकाच मुलीला जन्म दिला हे विशेष कौतुकाच आणि प्रेरणादायी!
असंच प्रेरणादान देणार पुस्तक माझ्या हाती लागलं आणि मी ते झपाटल्यासारखं वाचून काढलं. त्या पुस्तकाचे नाव आहे एकच मुलगी या पुस्तकाचे संपादन केल आहे अरुण शेवते यांनी. मुखपृष्ठ तितकच देखणं आहे! मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर एकच मुलगी असणाऱ्या दिग्गज लोकांचे छायाचित्र देण्यात आलेली आहेत.
लेखक अरुण शेवते या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणतात,
मुलगा असो की मुलगी असो, ते आपल्या आयुष्याचे नंदनवन असते. आपल्या आयुष्याची वाटचाल त्या इवल्या इवल्या चेहेऱ्यांची वाढ पाहूनच आपण करत असतो. चांगले विचार, चांगल्या जाणिवा एकाकडून दुसऱ्यांकडे जाणे हा खरा दिव्यांचा प्रवास असतो. बुद्ध काय म्हणाले? महावीर काय म्हणाले? येशू काय म्हणाले? पैगंबर काय म्हणाले? गांधी काय म्हणाले? त्यांच्या विचारांचा प्रवास जगाला विनाशाकडून वाचवणारा असतो. ते महामानव खऱ्या अर्थाने मानवजातीचे वंशज आहेत. त्यांचे विचार अंधारातून प्रकाशाकडे नेणारे दिवे आहेत. आपला मुलगा हा वंशाचा दिवा आहे या भ्रामक कल्पनेपायी आपण राक्षसी मनोवृत्ती मनात बाळगतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
खरोखर अतिशय सुंदर असं पुस्तक आपल्या ह्या संग्रही असावं असा आहे वाचताना अभिमानाने उर भरून येतो. मी स्वतः एक मुलगी असल्याचा नक्कीच अभिमान वाटत राहतो.
पंडित जवाहरलाल नेहरू, हिलरी क्लिटन, गुलजार, शरद पवार, निळू फुले, सुलोचना, मृणाल गोरे, रिमा, ना. सं. इनामदार, बेगम परवीन सुलताना, आरती अंकलीकर-टिकेकर, नीलम गोऱ्हे, रझिया पटेल, सदा कऱ्हाडे, अरुण शेवते या सर्वांना एकच मुलगी आहे. वंशाला दिवा पाहिजे. म्हणजे मुलगा हवा, ही सनातन परंपरा त्यांनी नाकारली आहे. ह्या साऱ्यांनी आपल्या एकाच मुलीच्या सुंदर आठवणी मनोमोकळेपणाने सांगितल्या आहेत.
आपल्या 'मेघना' या कवितेत गुलजार म्हणतात-
समंदर देख रहा था
समंदर से, मेरी अमृत की कुंभी आने वाली थी समंदर कर्वटें लेता था, रह रह कर, तो बल पडते थे पानी में मेरी बच्ची की नाजुक कोख से टीसें गुजरती थीं मुझे उस वक्त डर लगता था, 'अमृत' माँगने से। उसे जब कपकपी आती थी तो मैं काँप जाता था।
वो प्यासी थी - मगर पानी मना थी बर्फ की डलिया फिरायी जा रही थीं खुश्क होंटो पर समंदर अपने पानी में ही गोते खाने लगता था समंदर काट के 'कुंभी' निकालो ना काटोगे तो मर जायेगी बच्ची । मेरे 'अमृत की कुंभी' को वो जब गोदी में लेकर अब खिलाती है मेरे अंदर से कोई मर्द कहता है, "तुम्हें तोफीक ही ना थी,
कि तुम ये दर्द सहते और इक इन्सान की तखलीक करते! प्रत्येक घरात गुलजारांची ही कविता हवी म्हणजे स्त्रीचे दुःख काय असते, हे समजेल.
या पुस्तकाचं पान अन पान प्रेरणा, अभिमानाने भरलेल आहे . नक्की वाचा हे पुस्तक आणि प्रतिक्रिया द्या.
✒️©️
सौ.अंजली शशिकांत गोडसे शिर्के
मर्ढे सातारा .


No comments:
Post a Comment