Tuesday, March 21, 2023

गुलाब🌹🌹


 

🌹 *गुलाब* 🌹

तू दिलेला गुलाब
केसात माळावा  वाटला
का कोणास ठाऊक
मी पुस्तकाच्या पानात जपून ठेवला

रोज एक एक पान
मी वाचत होते आयुष्याचे
तो मात्र पानात राहून
मलाच बघत राहिला

एक दिवस पुस्तकातील
गुलाब हाती मी घेतला
अलगद माझ्या स्पर्शाने
सुकल्यावरही तो मोहरला

हसणं पाहून त्याचं
मी विचारलं त्याला
जगापासून दूर राहून
एकटेपणा नाही वाटला

थोडं गालात हसून पुन्हा
तो माझ्याशी बोलला
तुझ्या पुस्तकात राहूनच
मला माझा स्वर्ग भेटला

✒️💕🌹🌹
सौ. अंजली शशिकांत गोडसे(शिर्के),
मर्ढे सातारा

7 comments: