Wednesday, May 21, 2025

पुस्तक क्र . ८५ गोंदणखुणा



 



वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ८५
पुस्तकाचे नाव - गोंदणखुणा
लेखकाचे नाव - डॉ. प्रिया निघोजकर
प्रकाशन  व आवृत्ती-  राजहंस प्रकाशन पुणे पहिली आवृत्ती २०२४
पृष्ठे संख्या–  २३२
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ३००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
८५||पुस्तक परिचय
गोंदणखुणा
डॉ. प्रिया निघोजकर

इयत्ता पहिली अभ्यासक्रम बदलाचे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आयोजित केले होते .या प्रशिक्षणासाठी मी एक प्रशिक्षणार्थी म्हणून तिथे हजर होते .आमच्या सातारा डायटचे आदरणीय कृष्णा फडतरे साहेब यांना लेखिकेने हे पुस्तक भेट म्हणून दिले .साहेबांच्या हातात ती पुस्तक पाहून मलाही ते पुस्तक वाचण्याचा मोह आवरला नाही .त्यामुळे मी साहेबांकडून ते पुस्तक वाचण्यासाठी आवर्जून मागून घेतले .प्रशिक्षणाचे वेळापत्रक खूप व्यस्त असूनही मी हे पुस्तक अतिशय मनापासून आणि आवडीने वाचले .प्रशिक्षणात वाचलेली ही एक सुंदर गोंदण खून काळजावर कायमस्वरूपी कोरली गेली .साध्या साध्या घटनांमधून उच्च श्रेणीचा ललित लेखन कसे लिहिले जात याची मूर्तीमंत  उदाहरण म्हणजे हे पुस्तक .कदाचित माझं मोठं नशीब असेल किती पुस्तक माझ्या दृष्टीस पडलं माझ्या हातात आलं माझ्या डोळ्यात साठवले गेले आणि माझ्या मनाच्या कुपीत कायमस्वरूपी चे बंदिस्त झालं .
दैनिक तरुण भारत सारख्या प्रतीत यश वर्तमानपत्रातून संवाद यामधून लेखिकेने जे लेख लिहिले त्या लेखांचे हे पुस्तक मूर्तीमंत उदाहरण .या पुस्तकाला सोलापूरच्या हेमकिरण पत्की यांची प्रस्तावना लाभलेली आहे .
या पुस्तकाच्या लेखिका निघोजकर मॅडम यांचंहे दुसरं पुस्तक आहे पण ललित लेख . संग्रहाचं हे पहिलंच पुस्तक आहे .खरंतर मी हा पुस्तक परिचय माझ्या शब्दात पण हे पुस्तक जन्माला घालताना लेखिकेला काय वाटलं हे त्यांनी खूप छान शब्दात मांडल आहे .ते शब्द तुम्हाला जसेच्या तसे मला सांगावेसे वाटतात, लेखिका निघोज कर मॅडम आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,
आपल्या आतही एक जग नांदत असतं. आपण बाह्य जगाचे असतो, तसेच आपल्या या आतल्या जगाचेही असतो. किंबहुना या आतल्या जगाशी आपण जितकं अधिक जोडलं जातो, संवादी होतो; तितकं अधिक आपल्या अभिव्यक्तीला धुमारे फुटतात. आपला आत्माविष्कार चैतन्याचा कंद होतो.

स्फुरणाचे क्षण चिमटीत पकडताना, ते शब्दांकित करताना माझ्या आतलं जग असं उत्कट-तरल होऊन नवनीतासारखं लौकिक जीविताच्या पृष्ठभागावर आलं आणि त्यातून इवलासाच जीव असणारी चैतन्याची छोटी छोटी बेटं तयार झाली. या संग्रहातील एकेक लेख असं चैतन्यबेट आहे.

त्यांच्या या चैतन्य बेटावरच मी आज माझ्याच विश्वात मुक्त संचार करून आले. मी चैतन्य बेटाचे विश्वात कधी रममाण झाले ते मला कळलेच नाही .

गोंदण स्त्रीसाठी तिच्या स्वतःच्या ओळखीचं एक प्रतीक. पूर्वी ग्रामीण भागात गोंदण हे जाती, समुदाय, लग्न, आईपण यांचं प्रतीक होतं. आजच्या काळातही गोंदण स्त्रीच्या आत्मभानाचं, स्वतःच्या निवडीचं आणि तिच्या मनातल्या भावना मांडण्याचं माध्यम झालं आहे.
अनेक स्त्रिया गोंदण हे एखाद्या खास व्यक्तीची आठवण, एखाद्या घटनेची स्मृती किंवा स्वतःच्या संघर्षाचं प्रतीक म्हणून करून घेतात. त्यामुळे गोंदण तिच्या अंतर्मनाशी जोडलेलं असतं.
गोंदण केवळ शरीरावरचं चित्र नसून, अनेकदा ते स्त्रीच्या स्वातंत्र्याची घोषणा असते. ती स्वतःच्या शरीरावर काय असेल हे स्वतः ठरवते, हा तिच्या मानसिक स्वातंत्र्याचा एक भाग असतो.
गोंदण हे सौंदर्याची पारंपरिक चौकट मोडून टाकून एक नवीन सौंदर्यभाव निर्माण करतं. स्त्रीचं मन सौंदर्याविषयी, आकर्षणाविषयी किंवा स्वतःच्या शरीराविषयी काय वाटतं, हे गोंदणातून दिसून येऊ शकतं.
कधी कधी गोंदण हे वेदनेचं, हरवलेल्या प्रेमाचं, दुःखाचं प्रतीकही असतं. स्त्रीच्या मनातील अस्वस्थता, शोक, किंवा कठोर अनुभव ती गोंदणाच्या रूपाने बाहेर काढते.
अशाच काही गोंदण खुणा लेखिकेच्या मनातील आणि प्रत्यक्षात अनुभवलेल्या यांनी शब्दरूप धरून या पुस्तकाच्या पानापानात उमटल्या आहेत .
या पुस्तकातील कोणत्या खुणेबद्दल सांगू आणि कोणत्या नाही असं मला झालं आहे.लेखिकेचे हे पुस्तक वाचताना मलाच मी  लेखिकेच्या भावविश्वात हरवून जाते .
कधी सागर गोटे खेळते तर कधी भाव सखी बाभूळ हिच्या काट्यातून फुलात रमते . कधीकधी फुलांमध्ये जाऊन त्या सुगंधात मोहरून येते तर कधी कधी रांगोळी भोवती फेर घालत राहते .तसे तर या पुस्तकात लेखिकेला न सांगता तुझ्या भाव विश्वाचे चार भागात रूपांतर केले आहे .पहिल्या हे प्रेम पूर्ण मधुबाल्य अहा ते !म्हणजे लहानपण जिथे आपण सर्व काही विसरून जातो .
सौंदर्याच्या नव नव लीला सौंदर्य कशात नाही रस्त्यावरच्या साध्या दगडातही आपल्याला सौंदर्य दिसतं .लेखिकेला सौंदर्य कशाकशात दिसलं याच लेखन अप्रतिम केलेल आहे .
तिसऱ्या भागात मानवतेचे महन्मंगल गाणे या भागात लेखिका अगदी मन मोकळेपणाने लिहिताना दिसते .
पुस्तकाचे शेवटच्या टप्प्यात मात्र आपल्याच लेख माझ्या स्वानंदात किती राहून जाते ते मात्र कळत नाही .स्वानंदाच्या त्या रानात आपणही वाचत वाचत कधीही हरवून जातो तेच कळत नाही .मग आपल्या सोबत येतात लेखिकेच्या अंतरंगातील शब्द काजळरेखा नित्य उपासना आणि त्या शब्दांना मागचे अनेक भावभावनांचे मोल एक जीवनाचा उजेड शोधण्यासाठी !
कांदा जसा सोलला ना की एका एका पापुदऱ्यातून एक एक आठवण जशी बाहेर येते ना तशी लेखिकेच्या मनातील एकेक आठवण अशी अलगद एका एका पानातून उघडत गेलेली आहे . स्त्री मनाचा ठाव घेणारे अप्रतिम पुस्तक प्रत्येकानेच वाचावं .पुस्तकातीलअक्षरे मात्र माझ्या मनावर चांगलेच गोंदण खुणा करून गेले लेखिकेचे त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
          
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment