गुवाहाटी एक समृद्ध करणारा प्रवास 🌿🎼✒️📚
मला नेहमीच बा.भ. बोरकर यांची 'असे देखणे होऊया', ही कविता खूप आवडते. या कवितेत ते म्हणतात,
"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे,
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे,
देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती,
वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥"
या शब्दाप्रमाणेच गुवाहाटी (आसाम) येथील सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित कार्यशाळेत अजूनच देखणे होण्याचा योग आम्हाला लाभला. "रोल ऑफ पपेट्री इन एज्युकेशन इन लाईन विथ एन इ पी 2020" या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून माझी निवड करण्यात आली. याद्वारे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची एक सुवर्णसंधीच माझ्या आयुष्यात चालून आली. 5 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत पंधरा दिवस ही कार्यशाळा सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र यांच्या गुवाहाटी (आसाम) येथील विभागीय केंद्रावर मी पूर्ण केली. सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्राचे भारतात चार ठिकाणी अशी विभागीय केंद्रे आहेत. या केंद्रांना शिक्षकांचे चारधाम असेही म्हटले जाते. दिल्ली, उदयपूर, हैदराबाद आणि गुवाहाटी या ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयातर्फे शिक्षकांसाठी अशा कार्यशाळा घेण्यात येतात. माझ्यासमवेत महाराष्ट्रातील अजून आठ प्राथमिक शिक्षक यासाठी निवडले गेले होते. त्यात मुंबईच्या वैशाली काकडे, पुण्याच्या शुभांगी पलांगे, आमच्या सातारच्या मी स्वतः अंजली गोडसे, वृषाली घोरपडे, परभणीचे संतोष सकनूर आणि नंदूरबारचे देवेंद्र बोरसे, पंकज भदाणे, हेमकांत मोरे, हमीद खाटीक यांचा समावेश होता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रशिक्षण फक्त प्राथमिक शिक्षकांसाठीच होते. मी गुवाहाटीमध्ये घेतलेल्या कार्यशाळेत 12 राज्यातील 62 प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते. हे प्रशिक्षणच राष्ट्रीय एकात्मतेच प्रतिकच आहे . पहिला विमान प्रवास सगळी अनोळखी ठिकाण आणि या सगळ्या अनुभवांना माझ्या वतीने मी दिलेलंआपलेपण खरोखर हा एक समृद्ध ठेवाच म्हणावा लागेल . फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात नावाजलेलं आसाम राज्य आणि त्यातील हे गुवाहाटी शहर यामध्ये माझं होणार प्रशिक्षण म्हणजे सुवर्ण मुकुटात रत्नजडीत हिराच जडवण्यासारख आहे . याच जडवलेले हिऱ्याची विविध पैलू आज माझ्या या शैक्षणिक प्रवासात मला ज्ञानाचे अंधारलेले कोपरे आणखी लख्ख करण्यासाठी सूर्यासारखे तेजस्वी करतील. खरंच या प्रशिक्षणाने माझ्या ज्ञानामध्ये कलेविषयी असलेली मृत्युंजय भरभरून दान देऊन गेले हेच दान मी माझ्या लेकरांच्या ओंजळीत भरणार आहे तुम्हा सर्वांना माहीत असावं हे प्रशिक्षण नक्की होतं तरी काय त्यामुळे या प्रशिक्षणाची तुम्हा सर्वांना माहिती देणे माझे परम कर्तव्य आहे.
आताही तुम्ही म्हणत असाल कठपुतली म्हणजे काय ? याचा आणि शिक्षणाचा काय संबंध? तर या प्रशिक्षणाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. छत्री बाहुल्यांचा खेळ नेहमीच खेळला जातो अशाच या ज्ञानाच्या कळसुत्री बाहुल्या आता शिक्षणाच्या प्रांगणात आम्हाला आणायांच्या आहेत. म्हणूनच
NEP-2020 च्या अनुषंगाने "शिक्षणातील कठपुतळीची भूमिका" या विषयावर कार्यशाळा
आयोजित करण्यात आली.
कठपुतळीने जगाच्या बहुतांश भागात ज्ञानाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कठपुतळी साहित्य, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाटक यासारख्या सर्व कला प्रकारांचे घटक आत्मसात करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमता विकसित करण्यास सक्षम करते. भारतीय दंतकथा आणि दंतकथांबद्दलचे ज्ञान प्रसारित करण्यासाठी कठपुतळीचा वापर पारंपारिकपणे भारतात लोकप्रिय आणि स्वस्त माध्यम म्हणून केला जातो.
कठपुतळी हा सर्व वयोगटांना आकर्षित करणारा एक गतिमान कला प्रकार असल्याने, संवादाचे हे माध्यम शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी मदत म्हणून निवडले गेले आहे. CCRT अशा कठपुतळी कार्यक्रमांची तयारी, हाताळणी आणि उत्पादन यासाठी सर्वसमावेशक आणि एकात्मिक प्रशिक्षण प्रदान करते जे विविध औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण परिस्थितींमध्ये वापरले जाऊ शकते. "शिक्षणातील कठपुतळीची भूमिका" या विषयावरील कार्यशाळा वर्षभर देशाच्या सर्व भागातील सेवारत प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केली जाते. हा 15 दिवसांचा कालावधी आहे.
उद्दिष्टे:
शिक्षणासाठी मदत म्हणून कठपुतळीची ओळख करून देणे, हातमोजे, सावली, रॉड, स्ट्रिंग आणि इतर कठपुतळी तयार करणे आणि हाताळणे शिकवणे, कमी किमतीच्या सामग्रीतून आणि वर्गात वापरण्यास सुलभ,कठपुतळीच्या माध्यमातून अभ्यासक्रमाचे विषय शिकवण्यासाठी शैक्षणिक स्क्रिप्ट आणि कार्यक्रम तयार करणे आणि मूल्यमापनासाठी प्रशिक्षणाच्या प्रभावाचा अभ्यास करणे, शिक्षकांना भारतातील पारंपारिक कठपुतळी नाट्यप्रकारांबद्दल ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम करणे आणि त्यांना पारंपारिक कठपुतळ्यांशी संवाद साधण्याची संधी प्रदान करणे,
शिक्षकांना स्वस्त अध्यापन सहाय्य सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील क्रियाकलाप वर्गातील अध्यापनाचा अविभाज्य भाग बनवणे.
वर नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, प्रशिक्षण कार्यक्रम चार भागांमध्ये विभागलेला आहे:-
: विविध प्रकारच्या कठपुतळ्या आणि त्यांच्या हाताळणीचे तंत्र तयार करणे, शैक्षणिक लिपी तयार करणे,
संवादात्मक सत्राद्वारे व्यावहारिक अनुभव असलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कथा-कथन, भूमिका बजावणे, व्हॉईस मॉड्युलेशन/स्पीच, माइम आणि मूव्हमेंट, संगीत आणि त्याची सुधारणा, उत्पादन आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे सादरीकरण यासारख्या संबंधित कलांचे व्यावहारिक प्रशिक्षण.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी "कठपुतळ्यांची संकल्पना आणि स्क्रिप्ट रायटिंग" या विषयावर प्रास्ताविक व्याख्यान सत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. एक चांगला शैक्षणिक संदेश हा कठपुतळी खेळाचा गाभा आहे. कठपुतळी नाटकांसाठी पटकथा लिहिण्यावर मोठा भर दिला जातो. कठपुतळी नाटकांसाठी योग्य थीम लक्षित प्रेक्षकांनुसार सुचवल्या जातात आणि सहभागींनी विकसित केलेल्या कथांवर चर्चा सत्रानंतर काही चांगल्या कथा निवडल्या जातात.
शिक्षकांना कठपुतळीच्या प्रादेशिक पारंपरिक प्रकारांची ओळख करून देण्यासाठी देशाच्या विविध भागांतील पारंपारिक कलाकारांना वेळोवेळी आमंत्रित केले जाते. सहभागींना देशातील कठपुतळी थिएटरच्या विविध शैलींचा परिचय करून देण्यासाठी भारताच्या पारंपारिक पपेट थिएटरवर व्याख्यान-प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. सहभागींना फिंगर पपेट्स, मास्क आणि पेपर रॉड पपेट्स सारख्या साध्या कागदाच्या बाहुल्या बनवण्यास आणि हाताळण्यास शिकवले जाते.
तसेच सहभागींना माहिती देण्यात आली आहे की कार्यशाळेचे उद्दिष्ट सहज उपलब्ध असलेल्या आणि टाकाऊ साहित्यातून साध्या कठपुतळ्या तयार करणे आणि शैक्षणिक संकल्पना पोहोचवणे आणि वर्गात सामाजिक समस्यांची जाणीव निर्माण करणे हा आहे. प्रत्येक प्रात्यक्षिक सत्रानंतर या सर्व कठपुतळ्यांची हाताळणी शिकवली जाते. शिक्षक शैक्षणिक कठपुतळी तयार करायला शिकतात.
या विविध प्रकारच्या कठपुतळ्यांच्या मदतीने कार्यक्रम घेतले जातात.सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना शैक्षणिक भेटी आणि संग्रहालये आयोजित केली जातात.
रंगभूमीसाठी लोकसंगीत/संगीताची सत्रेही आयोजित केली जातात.
केंद्राने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कठपुतळीवरील साधनसामग्रीचाही वेळोवेळी वापर केला जातो.
ऑडिओ-सीडीसह काही CCRT शैक्षणिक प्रकाशने आणि एक 'पपेट्री किट' शाळेला भेट म्हणून देते.
सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सहभागी शिक्षक त्यांना एक किट मोफत दिले गेले .पुढील सुंदर आणि व्यापक शैक्षणिक प्रवासात सोबती होण्यासाठी याचा वापर होईल.
सर्वांनाच समृद्ध करणारा असा हा गुवाहाटीचा प्रवास कलेच्या नगरी घेऊन गेला. जणू काही कलेचा अक्षय पात्रच आमच्या हाती या प्रशिक्षणाने दिल. खरोखर काय घ्यायचं आणि काय द्यायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. मी तर पूर्णतः समृद्ध होऊन गेले .या प्रशिक्षणात प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक ठेवा मी माझ्यासोबत घेऊन आले माझ्या लेकरांना अधिक समृद्ध करण्यासाठी ! हाच एक प्रशिक्षणाचा खरा उद्देश असेल. एक भारत श्रेष्ठ भारत हा उद्देश सूफळ संपूर्ण झाला असेच वाटत आहे. बारा राज्यातील आलेल्या प्रशिक्षकांनी आपल्या राज्यातील सांस्कृतिक ठेव्याची देवाण-घेवाण केली. भाषिक संवाद करताना होणारी फसगत, हिंदी आणि इंग्रजी यांचा प्रभावी वापर; यांचं संचित या प्रशिक्षणात दिसून आले. म्हणजेच एकोपा कसा टिकवावा या प्रशिक्षणाने आम्हाला दाखवून दिले आणि जणू काही या प्रशिक्षणात आमचा मिनी इंडिया त्या ठिकाणी बहरला होता. प्रत्येक जण एकमेकांना मदत करणं, काळजी घेण यातूनच राष्ट्रीय एकात्मतेच अनोख दर्शनच त्या ठिकाणी घडत होतं. "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमांतर्गत गुवाहाटीमधून संपूर्ण राज्यातील सर्व शिक्षकांनी त्या त्या राज्याच्या वेशभूषित काढलेली रॅली आम्ही सर्व एक आहोत, हाच संदेश देऊन गेली. प्रत्येक राज्याने आपल्या सांस्कृतिक ठेव्याची व्यासपीठावर केलेली मांडणी यातून प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक कला आणि संस्कृती यांचे दर्शन आम्हा सर्वांनाच झालं .त्याची विस्तृत माहितीही कळली. प्रत्येक राज्याच्या या अनोख्या प्रदर्शनानंतर एकत्र येऊन केलेला जल्लोष हा खरोखरच राष्ट्र प्रेरणेने अंगावर रोमांच उभा करणारच होता. राष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्याचे नेतृत्व करणं हे भाग्य आम्हा सर्वांना मिळालं याचा खूप अभिमान वाटतो. या कार्यशाळेमध्ये बरंच काही शिकायला मिळालं प्रेम, आपुलकी, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव हा तर या प्रशिक्षणात ओतप्रोत भरला होता. शोधूनही सापडणार नाहीत अशी लाख मोलाची माणसं या प्रशिक्षणात दैवयोगाने जुळली गेली. कोणत्याही ज्ञान आपण कोणत्याही माध्यमातून सहज प्राप्त करू शकतो पण मनात प्रेम भरलेली आणि आपुलकीने काळजी घेणारी माणसं भेटायला मात्र नशीबच लागतं. या ठिकाणच्या लोकांचे प्रेम पाहून तर खूपच छान वाटलं . गुवाहाटी आसाम मध्ये महिलांना खूपच मान आणि प्रतिष्ठा दिली जाते. याची प्रचिती त्याठिकाणी ठाई ठाई येत होती.नवरात्रीचे दिवस असल्यामुळे नवदुर्गा उत्सव मोठ्या जल्लोषात त्या ठिकाणी साजरा होत होता. गुवाहाटी एक अस शहर आहे ज्या ठिकाणी आसामचे सांस्कृतिक कलाकेंद्र मोठ्या आवडीने ते सांभाळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची संग्रहालय पाहण्यासारखी आहेत. स्त्री शक्तीचे शक्तीपीठ असलेलं माता कामाख्या देवीचे मंदिर हे पाहण्यासारख आहे. जिथून एक नवीन ऊर्जा आणि उर्मी तुमच्या मनाला एक नवी उभारी देऊन जाते .याशिवाय प्रत्येकाने गुवाहाटीला एकदा जरूर भेट द्यावी आणि तेथील सांस्कृतिक कलेचा वारसा आहे तोही जोपासावा. तोच वारसा आपापल्या राज्यात घेऊन यावा
आपल्या शाळेतील लेकरांना आपल्या भारतीय संस्कृती विषयी सजग करण्यासाठी तसेच आपल्या राज्यातील जनतेलाही आपल्या संस्कृतीविषयी प्रेम जागृत करण्यासाठी ! हेच या प्रशिक्षणाचे खरे सारं असेल . काळ आहे तो जात राहिलंच पण काळजात घर करून राहिलेली माणसं आणि कला चिरंतन प्रेरीत करत राहतील हे नक्की.
शेवटी एवढंच म्हणेन
हम प्राथमिक शिक्षक है
शिक्षा की नई तसवीर बदल देंगे
भारत के नन्हे मुन्नों की
हम तकदीर बदल देंगे I
"जय हिंद"
"एक भारत, श्रेष्ठ भारत"
✒️📚©️🌿
सौ.अंजली शशिकांत गोडसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा महाराष्ट्र





सुंदर👌👌👌👌
ReplyDelete