Thursday, October 8, 2020

Letter writing हरवलेले पत्र


 *हरवलेले पत्र* 📧

 पत्र हरवलय माझं 
शोधून कोणी देईल का
शब्दांमागची ती भावना
डोळ्यांनी टिपता येईल का


 आदरयुक्त शब्दांची सुरुवात
 आधुनिक Sms मध्ये मिळेल का 
Hi Hello च्या जमान्यात
प्रिय तीर्थरूप यांना जागा मिळेल का


 अक्षर अक्षरांची खूणगाठ 
कागदावरती पडेल का 
शब्द रेखाटताना त्यावर
अश्रू हळूवार टिपकेल का


सुखदुःखाची सांगड घालताना 
भावना मनीची जुळेल का
आधुनिक या तंत्रज्ञानाला 
स्पर्शाची भावना कळेल का


जपून ठेवलेल्या शब्दांना 
मेमरी मध्ये जागा मिळेल का 
आठवणींबरोबर पुन्हा वाचताना 
स्मृतिगंध  ई-मेल मध्ये  विरेल का 


आतुरतेने पत्राची वाट पाहतानाची 
दृष्टी इनबॉक्सला लाभेल का 
पोस्टमन आल्यानंतरची लगबग
खणखणणाऱ्या मोबाईलला समजेल का


✍🏻🚩✉️💌

 *सौ.अंजली शशिकांत गोडसे शिर्के* 
 *मर्ढे सातारा*

10 comments: