*हरवलेले पत्र* 📧
पत्र हरवलय माझं
शोधून कोणी देईल का
शब्दांमागची ती भावना
डोळ्यांनी टिपता येईल का
आदरयुक्त शब्दांची सुरुवात
आधुनिक Sms मध्ये मिळेल का
Hi Hello च्या जमान्यात
प्रिय तीर्थरूप यांना जागा मिळेल का
अक्षर अक्षरांची खूणगाठ
कागदावरती पडेल का
शब्द रेखाटताना त्यावर
अश्रू हळूवार टिपकेल का
सुखदुःखाची सांगड घालताना
भावना मनीची जुळेल का
आधुनिक या तंत्रज्ञानाला
स्पर्शाची भावना कळेल का
जपून ठेवलेल्या शब्दांना
मेमरी मध्ये जागा मिळेल का
आठवणींबरोबर पुन्हा वाचताना
स्मृतिगंध ई-मेल मध्ये विरेल का
आतुरतेने पत्राची वाट पाहतानाची
दृष्टी इनबॉक्सला लाभेल का
पोस्टमन आल्यानंतरची लगबग
खणखणणाऱ्या मोबाईलला समजेल का
✍🏻🚩✉️💌

फारच छान.
ReplyDeleteVery nice 👌👌👌
ReplyDeleteApratim
ReplyDeleteखूपच सुंदर,आणि वास्तव
ReplyDeleteखूप हृदयस्पर्शी
ReplyDeleteखूप हृदयस्पर्शी
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteShubh prabhat🥀🌷
ReplyDeleteखूप छान 💐💐
ReplyDeleteThanks all
ReplyDelete