Wednesday, August 12, 2026

कुडाळ शाळेचा कार्यक्रम आकाशवाणीवर













 जावळी प्रतिनिधी

पीएमश्री जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा, कुडाळ, ता. जावळी, येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनांच्या कार्यक्रमांचे प्रसारण आकाशवाणी सातारा केंद्राच्या 'क कमाल, ध धमाल' या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम साकारण्यात आला १ आहे.

यानिमित्ताने चिमुकल्यांची चिकाटी, जिद्व, साहस आणि आत्मविश्वास पहायला मिळणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणात उत्साह, शिस्त, आत्मविश्वास आणि उत्कुष्टता यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे. त्यांच्या निरागस आवाजाने आणि अप्रतिम सादरीकरणाने उपस्थित सर्वांची मने जिंकली.

प्रसार भारती

कार्यक्रमाची वैशिष्टये

चिमुकल्यांची चिकाटी, जिद्व, साहस आणि आत्मविश्वास यांचे दर्शन

उत्साह, शिस्त, आत्मविश्वास आणि उत्कुष्टत्तेचा सुंदर संगम

निरागस आवाज आणि अप्रतिम सादरीकरण

जावळी तालुक्यातील जिल्हा

परिषद शाळेतील मुलांना पहिल्यांदाच संधी

प्रत्येक लहानग्या कलाकारांचे सर्व स्तरातून कौतुक

AR BHARAT

PRASAR

प्रसार भारती भारत का लोकसेवा प्रसारक)

आकाशवाणी सातारा FM 103.1 Mhz

(आकाशवाणी )

निवेदन

वसुंधरा खांडके करणार

रविवार, ता. २३ ऑगस्ट २०२६

आकाशावाणी सातारा FM 103.1 MHz

वेवज ॲप वर आकाशवाणी सातारा शोधूनही हा कार्यक्रम ऐकता येणार

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा हा सुरेल आणि रंगतदार अविष्कार रसिकांनी आवर्जून ऐकावा.


- शाळेच्या वतीने आवाहन

No comments:

Post a Comment