Sunday, October 26, 2025

पुस्तक क्र. १५० आयुष्याचे धडे गिरवताना


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १५०

पुस्तकाचे नाव - आयुष्याचे धडे गिरवताना

लेखकाचे नाव - सुधा मूर्ती

प्रकाशन व आवृत्ती- मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे

पृष्ठे संख्या– १५६

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१५०|पुस्तक परिचय

“आयुष्याचे धडे गिरवताना”  

लेखिका: सुधा मूर्ती

अनुवाद: मराठी अनुवादित आवृत्ती लीना सोहोनी

सुधा मूर्ती या भारतीय साहित्यविश्वातील एक संवेदनशील आणि व्यावहारिक लेखिका आहेत. त्यांची लेखनशैली अत्यंत साधी, थेट आणि माणसाच्या अंतःकरणाला भिडणारी आहे. “आयुष्याचे धडे गिरवताना” या कथासंग्रहात त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभव, समाजातील घडामोडी, माणसांमधले नाते, करुणा, प्रामाणिकपणा, शिक्षणाचे महत्त्व आणि साधेपणाचे सौंदर्य या सर्व गोष्टींवर विचारमंथन केलं आहे.

या पुस्तकात एकूण 23 कथा आहेत. प्रत्येक कथा ही एका छोट्या प्रसंगातून मोठा जीवनधडा शिकवते. काही कथा हास्यजनक, काही भावनिक तर काही आपल्याला स्वतःकडे आरसा दाखवणाऱ्या आहेत.

लेखिका एका शिक्षक, समाजसेविका आणि आई म्हणून जीवनात अनुभवलेली सत्य प्रसंग आपल्यासमोर मांडतात. त्यामुळे या कथा काल्पनिक नसून जीवनाच्या प्रत्यक्ष शिकवणी आहेत. त्यांच्या लेखनातून “माणूस चांगला असेल तर जगही सुंदर आहे” असा सकारात्मक संदेश मिळतो.

या कथांमधून सुधा मूर्ती यांनी आयुष्याच्या विविध पैलूंना—संवेदना, संस्कार, नाती, समाजसेवा, आणि मानवी मूल्ये खूप साध्या पण हृदयस्पर्शी पद्धतीने मांडले आहे.

१. बाँबे टू बंगळुरू

२. रहमानची अव्वा

३. गंगेचा घाट

४. उपवास

५. बदलता भारत

६. गुणसूत्रे

७. मृतांसाठी मदतीचा हात

८. तीन जलाशय

९. नो मॅन्स गार्डन

१०. चिकटगुंडा

११. प्रश्न, प्रश्न, प्रश्न!

१२. त्याग

१३. मदत

१४. भुताबरोबर वाटणी

१५. हसं

१६. दुःखी यश

१७. श्राद्ध

१८. आळशी पोर्टाडो

१९. अंकल सॅम

२०. आयुष्याचे धडे

२१. तुम्ही मला विचारायला हवं होतं

२२. सव्हायव्हल इन्स्टिंक्ट

२३. तुम्हाला आठवतं?


या प्रत्येक कथेतून एक जीवनमूल्य किंवा धडा समोर येतो — कधी करुणा, कधी जबाबदारी, तर कधी विनम्रता.

यातील त्याग ही कथा मला विशेष आवडली .

भागीरथी नावाची एक मुलगी जी आपल्या गावासाठी पाणी लागावे म्हणून तळ्यात स्वतःच्या आहुती देते .आपल्या पती सीमेवर रक्षणासाठी गेलेला असताना आपणही आपल्या गावासाठी काहीतरी करू शकतो ही विचारधाराच तिची खूप मोठी आहे आणि खरोखर तिच्या बलिदानामुळे त्या गावातील तयाला पाणी लागते आणि तिचा पतीही आपल्या पत्नीच्या विरोधात त्या तळ्यात आपला जीव देतो अजूनही त्या गावात ते तळ आहे याचे जिवंत उदाहरण सुधाताई आपल्या या कथेत देतात त्या काय असतो याचा सुंदर उदाहरण या कथेतून आपल्याला मिळते .

प्रश्न प्रश्न प्रश्न एक वेगळी कथा म्हणजे सत्य प्रसंग आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतो तेथील कर्मचाऱ्यांना काहीतरी दिवाळी भेट देणार असतात पण तेथील मॅनेजर सुधाताईंना नेहमी प्रश्न विचारून भंडावून सोडतो . काय गिफ्ट देणार याविषयी त्याची आतुरता आणि त्याचे प्रश्न एवढे असतात की सुधाताई स्वतः वैतागून जातात .शेवटी सुधाताई त्यांना जे गिफ्ट द्यायचं असतं त्याच साडी दिसते आणि त्यातील एकही साडी शेवटी शिल्लक उरत नाही .प्रश्न हे काही शेवटी प्रश्नच राहतात .

या पुस्तकाला आयुष्याचे धडे फिरवताना खूप छान समर्पक नाव दिलेला आहे यात आयुष्याचे धडे गिरवताना हा एक वेगळा स्वतंत्र कथानक लिहिलेला आहे आणि त्यात एकूण आठ छोटे छोटे कथा लिहिलेले आहेत सगळे सुधाताईंची पुस्तक ही वाचण्यासारखी आहेत आणि याचे परीक्षण आपण काय करणार ना ? सारा समाज त्यांची पुस्तक वाचतो त्यांना ती आवडतात .अतिशय सुंदर एक से बढकर एक पुस्तके आहेत . आपल्याही संग्रहात अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची पुस्तक असलीच पाहिजेत .

आपल्याही आयुष्याचे धडे फिरवताना अशी प्रेरणादायी पुस्तके वाचले तर नक्कीच आपल्याही भविष्य उज्वल होईल यात शंका नाही .

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment