Tuesday, May 13, 2025

पुस्तक क्र . ७६ देशोदेशीचे शालेय शिक्षण

 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ७६

पुस्तकाचे नाव - देशोदेशीचे शालेय शिक्षण

लेखकाचे नाव - संपादक धनवंती हर्डीकर अजित तिजोरे डॉ . माधव सूर्यवंशी

प्रकाशन व आवृत्ती- निर्मिती यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई सतीश दत्तात्रय पवार पुणे

पृष्ठे संख्या– २८७

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ४९९

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

७६||पुस्तक परिचय


देशोदेशीचे शालेय शिक्षण


शाळा ही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील पहिली ज्ञानप्राप्तीची जागा असते. शालेय शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसते, तर ते विद्यार्थ्याला सर्वांगीण विकासासाठी तयार करते.

शालेय शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे. म्हणूनच, प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा.

शालेय शिक्षण ही एक प्राथमिक गरज आहे .आपल्या देशात शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचा आहे पण बाहेरील देशात नक्की शालेय शिक्षण शिक्षण प्रणाली कशी आहे याविषयी माहिती आज आपण देशोदेशीचे शालेय शिक्षण या पुस्तकातून जाणून घेणार आहोत .

या पुस्तकाच्या रूपातून आपण वेगवेगळ्या देशातील शालेय शिक्षणाची एक सुंदर सफर करून येऊया .यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी या पुस्तकाची निर्मिती शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या सर्वांसाठी केली आहे .

देशोदेशीचे शालेय शिक्षण” हे यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित केलेले एक महत्त्वपूर्ण मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक २०२२ साली प्रकाशित झाले असून, भारतासह पाच खंडांतील २१ देशांच्या शालेय शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास सादर करते.

धनवंती हर्डीकर (मुख्य संपादक), अजित तिजोरे (उपसंपादक), डॉ. माधव सूर्यवंशी, डॉ. वसंत काळपांडे, दत्ता बालसराफ आणि योगेश कुदळे यांनी संपादनात योगदान दिले आहे .

२८८ पानांचे, मोठ्या आकाराचे आणि संपूर्ण रंगीत छपाई असलेले पुस्तक आहे .पुस्तकात विविध देशांच्या शालेय शिक्षण प्रणालींचे तुलनात्मक विश्लेषण केले आहे. त्यात संबंधित देशांतील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांचा विचार करून शिक्षण प्रणालींचे सखोल आकलन सादर केले आहे .या पुस्तकात विविध देशांतील शिक्षणतज्ज्ञ, पालक, शिक्षक आणि परदेशात शिक्षणाचा अनुभव असलेल्या भारतीयांचे लेख समाविष्ट आहेत. त्यामुळे पुस्तकात अनुभवकथन, डेटा आणि विश्लेषण यांचा समृद्ध संगम आहे.

पुस्तकाची रचना तीन विभागांमध्ये करण्यात आली आहे .शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांसाठीच हे पुस्तक फायद्याचा आहे .शिवाय विद्यार्थी पालक शिक्षण क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठीच हे पुस्तक उपयोगी आहे .पुस्तक तीन विभागांमध्ये विभागलेला असलं तरी त्यात एकसंधपणा दिसून येतो .

हे पुस्तक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक, शिक्षण धोरणकर्ते आणि शालेय शिक्षणाच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जगभरातील विविध शिक्षण प्रणालींचा अभ्यास करून भारतीय शिक्षण प्रणालीसाठी उपयुक्त धडे घेण्याची संधी हे पुस्तक प्रदान करते.

“देशोदेशीचे शालेय शिक्षण” हे यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित केलेले एक महत्त्वपूर्ण मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक तुलनात्मक शिक्षणशास्त्र या विषयावर मराठीत प्रकाशित झालेले पहिलेच सविस्तर पुस्तक मानले जाते .

दैनिक लोकसत्ता मध्ये या पुस्तका विषयी सविस्तर माहिती छापून आली होती त्यापैकीच पुढील काही भाग .

या पुस्तकात भारतासह पाच खंडांतील २१ देशांच्या शालेय शिक्षण व्यवस्थेचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची रचना तीन विभागांमध्ये करण्यात आली आहे

संकल्पना आणि पार्श्वभूमी: या विभागात डॉ. वसंत काळपांडे आणि किशोर दरक यांनी तुलनात्मक शिक्षणशास्त्राची ओळख करून दिली आहे. त्यांनी भारतीय शालेय शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा आढावा घेतला आहे .


देशनिहाय शिक्षणपद्धतीचे विश्लेषण: या विभागात विविध देशांच्या शिक्षणपद्धतींचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. लेखकांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित लेख लिहिले आहेत, ज्यात काही लेख मूळ इंग्रजीतून भाषांतरित करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, कॅनडातील 'सहिष्णुता', दक्षिण आफ्रिकेतील 'उबंटू भान', ऑस्ट्रेलियातील 'स्वयंपूर्ण व्यक्तिविकास पद्धती', नेदरलँडमधील 'माणूस घडवणारी शिक्षणपद्धती' यांचा समावेश आहे .

कोरोनाकाळातील शिक्षणाचे विश्लेषण: या विभागात अजित तिजोरे यांनी करोनाकाळातील शालेय शिक्षण, त्या काळात झालेली शिक्षण क्षेत्राची हानी, विविध देशांनी त्या संदर्भात योजलेले उपाय अशा घटकांचा संख्याशास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडला आहे .

आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांनी या पुस्तकात आपल्या मनोगतात या पुस्तकाचे निर्मिती विषयी खूप सुंदर माहिती सांगितलेली आहे .यशवंतराव चव्हाण सेंटर नेहमीच शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण अशा बाबींची दखल घेत असते .या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे शिक्षण परिषदेला आवर्जून उपस्थित होतो .याच शिक्षण परिषदेमधून आम्ही हे पुस्तक प्राप्त केले अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण असे हे पुस्तक प्रत्येक शिक्षकांच्या तर संग्रही असावे .नक्की वाचा हे पुस्तक .

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment