*असाही असतो वाढदिवस* 🎂🍫💫🌹
मनात आलं तर सर्व काही शक्य आहे. ही उक्ती खरी करून दाखवणारी आपली ही भारतीय सुकन्या. सौ.तृप्ती रुपेश सरोदे (लोखंडे)बी. टेक., एम टेक.अशी यशाची शिखरं पादाक्रांत करत मे 2022 ला तर तू मिशीगन युनिव्हर्सिटीतून(USA) हायेस्ट स्कोर घेऊन एम. एस. झाली.
अमेरिकेत राहूनही भारतातील मुलींशी तिची नाळ अजूनही जुळली आहे. आपल्या मुलींविषयी आपल्या भारतातील खेडोपाड्यात राहणाऱ्या मुलांविषयी आस्था असणारी ही सुकन्या. आज एवढ्या आधुनिक देशात राहूनही आपल्या भारतातील मुलांसाठी आपल्या वाढदिवसानिमित्त तिने आज आम्हा बिरामणेवाडी शाळेतील दुर्गम असणाऱ्या शाळेत वाचन मेवा पाठवला .खरंतर हा वाचनमेवा 11 फेब्रुवारीला पोहोचला होता .पण पिन कोड मधील चुकीमुळे तो वाचनमेवा चाफळला गेला आणि साक्षात श्रीरामाचे दर्शन घेऊनच आमच्या गावी तो पोहोचला असावा. कदाचित त्या पुस्तकांनाही वाटलं असावं एखाद तीर्थक्षेत्र फिरून यावं आणि नंतर या बालचिमुकल्यांच्या हातात आपण आशीर्वाद रुपी हा वाचनमेवा पडावा .खरच आमची मुलं खूपच तृप्त झाली. आणि त्या तृप्ती नावाचं सार्थक झालं .अशी जर कळवळ प्रत्येक भारतीयाला आपल्या मुलांविषयी असली तर नक्कीच आपला भारत देश एक उज्वल क्रांती घडेल यात शंका नाही. राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त आदरणीय प्रतिभा लोखंडे मॅडम नागपूर यांची ही सुकन्या आणि माझी छोटी बहीण. पुन्हा एकदा ही पुस्तकं नागपुर टू सातारा, सातारा टू चाफळ, चाफळ टू मर्ढे आणि मर्ढे टू बिरामणेवाडी अशी मुलांच्या हातात पोहोच झाली. पुन्हा एकदा तृप्ती दीदीला आम्हा सर्व बालचमूच्यातर्फे खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझा पाठवलेला वाचनमेवा नक्कीच आमची वाचन संस्कृती समृद्ध करेल यात शंका नाही. पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडीतील सर्व बालचमू, शिक्षक, ग्रामस्थ या सर्वांतर्फे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असंच सहकार्य राहू दे धन्यवाद
🙏🏻🥰🍫🎂
*तुझीच छोटी भावंडे*
*शाळा बिरामणेवाडी*






Khupch chan
ReplyDelete