अनाथ
अनाथ
अनाथ शब्दाचा अर्थ
आज मला कळला
माझं कोणीच नाही
नियतीने डाव साधला
लढायचं आता एकट्याने
ध्यास मनी धरला
खाच खळग्यांच्या वाटेने
यशाचा मार्ग चोखाळला
समजून घेणार कोणी
नसेल आता मला
हक्क माझ्यावर मात्र
सर्वांनीच का दाखवला
चुकतं असेल माझंही
मानव धर्म मी पाळला
खरा देव मात्र माझा
सर्वांनी सरणात जाळला
चंद्र ताऱ्यातच मी
शोधते आहे तुम्हाला
रात्रीच्या या एकांती
बांध हृदयाचा फुटला
✒️📚
सौ.अंजली शशिकांत गोडसे
मर्ढे सातारा.©️
Very nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteसुंदर शब्दरचना.
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteखूपच छान . !
ReplyDeleteखुप छान...
ReplyDelete