*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनानिमित्त*
*सावित्रीबाईंची थोरवी*
🙏🏻📚✒️🌹
नायगावच्या कुशीत जन्मली
स्त्री शिक्षणाची जननी
सावित्रीबाईंची थोरवी गाते
सदैव माझी ग वाणी ॥ धृ॥
स्त्रियांच्या उद्धारासाठी
पती राजाच्या मागे गेलीस झणी
सत्यवानाच्या सावित्रीपेक्षाहि
सत्य सावित्री झालीस ग राणी ॥१॥
कर्मठ निष्ठूर समाजकंटकांनी
किती केली ग मनमानी
सभ्य संयमी वर्तणुकीतून
भल्याभल्यांना पाजलेस तू पाणी ॥२॥
स्त्रीशिक्षणाची आणलीस गंगा
खेडोपाडीच्या लेकींच्या अंगणी
दिन दुबळयांची सेवा करून झालीस
विद्येची देवता तू ज्ञानदायीनी ॥ 3॥
अक्षरलेखणीशी जोडून नाते
काव्यफुलांतून गायिलीस गाणी
स्मरण तुझे अखंड राहते
प्रत्येक स्त्रीच्या ह्रदयातुनी ॥४॥
सावित्रीबाईची थोरवी गाते
सदैव माझी ग वाणी
✒️ 🙏🏻📚🌹
Very nice 👌👌👌
ReplyDeletevery nice
ReplyDeleteखूपच छान कविता 👌👌👌🌹🌹
ReplyDelete