माझ्या विठुराया
संकटाचे मेघ येऊ किती देवा
अखंडित आषाढी वारी तुझी चालली
पावलांना मिळाला जरी विसावा
आधुनिकतेची चाके रस्त्यावरी धावली
पंढरीच्या नाथा करीतो मी धावा
तुझ्या दर्शनाची आस रे लागली
राहूनिया आता आमच्याच गावा
भक्ती तुझ्या चरणांवरी वाहीली
अक्षर वारी माझी तुझ्या नावा
पंढरपूरी विठ्ठलाच्या चरणी विसावली
विठुनामाचा गंध कपाळी लावा
माणुसकीतच पाहूया ज्ञानोबा माऊली
-- अंश--
छानच रचना
ReplyDelete🚩 राम कृष्ण हरी🚩
ReplyDeleteछान भक्ती रससात मंत्रमुग्ध.
ReplyDeleteअवघा रंग एक झाला
ReplyDeleteछानच..!!!
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete